Popular Posts

Saturday, July 7, 2012

तूच असतेस ...!!


कामात असलो तरी 
मनात माझ्या तूच असतेस,

स्वप्नात असलो तरी
स्वप्नात माझ्या तूच असतेस !


कविता माझ्या तरी
शब्दा-शब्दात तूच असतेस,

भावना माझ्या तरी
अर्था-अर्थात तूच असतेस !


जीवन माझे जरी
ध्येय जीवनाचे तूच असतेस,

जगतो मी तरी
जगविणारी मात्र तूच असतेस !


प्रेमात मी जरी
प्रेमात पाडणारी तूच असतेस,

वेडा वाटलो तरी
वेड लावणारी तूच असतेस ...!!


-- संजय कुलकर्णी .

पाउस ...!!

पाउस म्हणजे बालपण ..
उत्स्फूर्त निर्मळ निरागस आनंद .!


पाउस म्हणजे खट्याळपण ..
मनसोक्त मनमुराद भयमुक्त जीवनानंद ..!


पाउस म्हणजे तारुण्य..
एक अनामिक धुंद आकर्षण ..!


पाउस म्हणजे आठवण ...
एक अंतरीय रमणीय साठवण .. !


पाउस म्हणजे आंस ..
व्याकुळ तन-मनांचा आरक्त ध्यास ..!!


पाउस म्हणजे श्वास ..
कडू-गोड आठवांचा ओला प्रवास ..!


पाउस म्हणजे जीवन ..
प्रेमधारांत भिजणारं फुलणारं मधुमिलन ..!!


--- संजय कुलकर्णी .
 
नकार ...




मनमोकळे तुला करण्याचा 
मी प्रयत्न अनेकदा केला ,

पण कोशातून बाहेर पडण्यास
तू नेहमीच नकार दिला !


हसऱ्या तुझ्या चेहर्यामागचा
मी ठाव कितीदा घेतला , 


पण खरंखुरं सांगण्याचा
तू नेहमीच मार्ग टाळला !


पाहिलंस ते माझे छेडणं
तुला चिडवणं अन हसणं , 


पण माझ्या हरेक कृतीआडचा
उद्देश चांगला ना जाणला ..!!


--- संजय कुलकर्णी .

थेंब ... पावसाचा !!

पावसाचा प्रत्येक थेंब
आस जगण्याची लावतो ,
अन बरंच काही
प्रत्येकाला नकळत सांगून जातो ..


तापलेल्या अन तहानलेल्या
व्याकूळ धरेवर पडतो ,
अन गंध मातीचा
आसमंती धुंद दरवळून जातो ..


अस्तित्व स्वत:चे संपवितो
सर्वत्र जीवन फुलवितो ,
अन विरताना प्रत्येकास
आनंद देण्यातला शिकवून जातो ..


आरक्त गालावरून ओघळतो
हळुवार ओझरता स्पर्शतो ,
निथळणार्या प्रत्येक थेंबांनी
अंतरी अनामिक ओढ लावतो ....!!


---- संजय कुलकर्णी .
 

खरंच, मी स्वप्नात तर नाही ना ? 

मम जीवनात तुझे असे येणे,
अन पाहता क्षणी प्रेमात पडणे,
हा केवळ आभास तर नाही ना ?
खरंच, मी स्वप्नात तर नाही ना ? ।। धृ ।।


संकटे, निराशा आणि उपेक्षा
आजवर ह्यांचाच होता प्रवास,
माझ्या जीवनात तुझ्या येण्याने
लाभला प्रेमळ हवा-हवासा सहवास ।। १ ।।

हा केवळ आभास तर नाही ना ?
खरंच, मी स्वप्नात तर नाही ना ? ।। धृ ।।


प्रेम, सुख, आनंद सदैव कल्पना विस्तार
एकला चलो रे हाच जगण्याचा प्रकार,
भेटुनी तुला जीवन जाहले एक स्व्प्नाविष्कार
अन जडला कायमचा मज अनोखा प्रेमविकार ..! ।।२ ।।

हा केवळ आभास तर नाही ना ?
खरंच, मी स्वप्नात तर नाही ना ? ।। धृ ।।


स्वत:भोवती विणलेल्या कोशात मी असतां रममाण
आश्वासून आजन्म साथीस तू ओतलेस प्रेम-पंचप्राण,
आळवून भावूक सादेने तू छेडलेस सुप्त संसार-गान
एकदा हारलेल्या दुर्भागीनीस तू दिधलेस जीवन-दान ! ।। ३ ।।

हा केवळ आभास तर नाही ना ?
खरंच, मी स्वप्नात तर नाही ना ? ।। धृ ।।


--- संजय कुलकर्णी .
 

कविता ...


एक

कविता

अनुभवायची

हौस आली आहे ,

जमणार का तुला ..?

मनात आधीच पक्के ठरव

कारण अविस्मरणीय क्षण असेल तो !

शब्दांच्या भावांतून जाणताना स्वत:ला

एक आगळी वेगळी ओळख

लाभून स्वत:ची नक्कीच

आश्चर्य वाटेल

तुला ..!!


--- संजय कुलकर्णी .
एकवार मुक्तपणे तू लुटून तर बघ ..!! 




मनात दडलेली सारी दु:ख्खे 
एकवार मला तू देऊन बघ ,

मम जीवनातील सारी सुखे 
एकवार मुक्तपणे तू लुटून तर बघ !! 


मान्य मला एकदम सारे 
विसरणे तुला शक्य नाही ,

पण सुंदर स्वप्ने भविष्याची 
हळू हळू तू पाहून तर बघ !!


अपयश लाभले म्हणून तू अभागी कसा
दु:ख्ख मिळाले म्हणजे तू दुर्दैवी कसा ,

समोरील सुखास तू स्वीकारून बघ
आनंदाने जीवन पुन्हा जगून तर बघ !!


एकवार मला आजमावून बघ
विश्वासाने मजपाशी तू बोलून बघ,

विनंतीस माझ्या मानून बघ
प्रेमाने मला तू स्वीकारून तर बघ !!


मनात दडलेली सारी दु:ख्खे
एकवार मला तू देऊन बघ,

मम जीवनातील सारी सुखे
एकवार मुक्तपणे तू लुटून तर बघ !!


-- संजय कुलकर्णी .
हे ठावे तुलाही अन मनोमन मलाही ...!!




तू कबूल करो 
वा मी नाकारो 

पण एकमेकां शिवाय 
मन लागत नाही 

हे ठावे तुलाही 
अन मनोमन मलाही ।। १ ।।


डोळे सुद्धा अपुले
बोलति मनाने मनाशी

सर्व काही सांगती
पण कोणी ना ऐकती

हे ठावे तुलाही
अन मनोमन मलाही ।। २ ।।


ना तुझ्याजवळ मी
ना मजपाशी तू

दूर एकमेकांपासून तरी
सूर एक अंतरी !

हे ठावे तुलाही
अन मनोमन मलाही ।। ३ ।।


प्रेम तुझे मजवर
अन माझे तुजवर

जाणतेस खरे तुही
अन मानतो मीही !

हे ठावे तुलाही
अन मनोमन मलाही ।। ४ ।।


--- संजय कुलकर्णी 

रिमझिम ..
ओल्याचिंब आठवांची !!



सकाळ पासून मस्त रिम झिम सुरु झाली ..
अन थंडगार हवेसरशी ती अलवार मनात आली,


नको नको म्हणताना चक्क पावसात घेऊन गेली
अन धुंद थेंबस्पर्शांनी मला आठवांत भिजवून गेली ..!


खट्याळ वार्यात ओले केस अंगावर उडवून गेली ..
मधाळ हास्यात पाठीमागे वळून नजर खिळवून गेली,


कोसळत्या धारात वेगळीच आग तनमनी लावून गेली
अन सर जाताच ओढ भेटण्याची लावून गेली ..!!


--- संजय कुलकर्णी .
 

प्रवास एका मैत्रीचा ... 

प्रवास एका मैत्रीचा
तुझ्या माझ्या सहवासाचा
उत्कट उत्स्फूर्त प्रेमाचा
अतूट आंतरिक बंधनाचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
अलगद हलक्या सरींचा
अबोल भाव जाणण्याचा
अंतरी मनस्वी समजण्याचा ... !


प्रवास एका मैत्रीचा
टपटप पडणार्या गारांचा
सुखात आनंदे गाण्याचा
दु:ख्खात एकत्र साह्ण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
पहाटेच्या उबदार गारठ्याचा
हळूवार मनात शिरण्याचा
गुपचूप हृदयी वसण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
तृषार्त तप्त उन्हाळ्याचा
कठीण असहाय्य प्रसंगात
खंबीर साथ देण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
अपयशात उमेद जगविण्याचा
यशात तोल संभाळण्याचा
क्षणोक्षणी एकमेकांस घडविण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
प्रेमाच्या अनोख्या नात्याचा
सारी बंधने झुगारण्याचा
साथ जीवनभर राहण्याचा ...!


---संजय कुलकर्णी.
 
ज्वालामुखी  ... 

ती कोणती नदी होती ? तो कसा सागर होता ?
जो किनारा पाहिला मी तो किनारा कोरडा होता ..!!


हा कसा मला भास सुखाचा जाहला ?
मी पाहिलेला केवळ आभास मृगजळाचा होता ..!!


सादले जयांनी मला ते आवाज ओळखीचे होते ..
हा मैत्रीचा बंध होता ! तो प्रीतीचा स्नेहबंध होता ..!!


ह्या हितचिंतकांनी दाखविले आज रूप खरे तयांचे
ज्यांच्यासाठी लावली होती मी दिनरात डोळ्यांपुढे झापडे ..!!


भल्यासाठी माझ्या ठोकरले तयांनी आदराने
हासले माझ्या माघारी केव्हढे उपकार तयांचे ..!!


लागला आहे अताशा छंद प्रेम उधळण्याचा त्यांना
एरवी, त्यांच्या भावनेचा आतबट्ट्याचा व्यवहार होता ..!!


लुटले मज जवळचे त्यांनी होते न्हवते जे काही
मी ना बोभाटा केला ... लुटणारयांवर जीव जडला होता ..!!






---संजय कुलकर्णी .
  

अजुनही का ...

अजुनही का
वाहतात हे वारे ?
अन वार्यासह
तुझे स्पर्षं शहारे ..!


अजुनही का
उमलतात हि गुलाबफुले
अन सुगंधासह
तुझे धुंद श्वासझुले ..!


अजूनही का
कोसळती सरसर नभझडी
अन धारांसह
तुझ्या झरझर स्वरलडी ..!


अजूनही का
अवेळी काळोखते अस्तमानी
अन काळोखासह
तुझ्या दडविलेल्या आठवणी ..!


अजूनही का
जगते मी आकांक्षुनी
अन स्व्प्नांसह
तुझ्या वाटेवर आशाळूनी ..!!


-- संजय कुलकर्णी .
 
आयुष्यात बहरशील तेव्हा ...!! 

कपाळावरील आठ्यांस घालवून 
मनापासून हासून तर बघ एकदा
आनंद जगण्यात खरोखर वाटेल तेव्हा ..!


विश्वास स्वत:वर ठेवून
खंबीरपणे प्रयत्न तर कर एकदा
संकटांशी लढण्याची शक्ती मिळेल तेव्हा ..!


यशाची चिंता काढून
मनस्वी जगून तर बघ एकदा
यश स्वत:हून शोधत येईल तेव्हा ..!


मिळविण्याची इच्छा सोडून
प्रेमास लुटून तर बघ एकदा
आनंदे आयुष्यात बहरशील तेव्हा ...!!


---संजय कुलकर्णी .
♥ मैत्रीयुक्त प्रेम ♥ 


काही पाहताच मनात भरतात 
पण नजरानजर होताच भाव खातात ..!

तारीफ ऐकून खुश होतात 
पण कबूल करायला उगाच आखडतात ..!


भेटल्यावर विनाकारण वाद घालतात
अन दूर गेल्यावर सॉरी म्हणतात ..!

गुपित स्वत:चे लपून ठेवतात
मनात काय तुझ्या हटून विचारतात ..!


जीवापाड खरेतर प्रेम करतात
इतरांना मात्र बेस्ट फ्रेंड सांगतात ..!

खोटे बोलून जगास फसवतात
अन मैत्रीचे प्रेमात रुपांतर करतात ..!!


--- ♥ संजय कुलकर्णी ♥
मनोगत ...

रुणानुबंधे भेटली आहेस तर
कायम मज बरोबर एकत्र रहा ..!


नाते जीवाभावाचे मानतेस तर
जीवात जीव असेपर्यंत साथ रहा ..!


दररोज भेटती आहेस तर
अशीच माझ्या सावली सारखी रहा ..!


मैत्रीने हक्क गाजवतेस तर
संकटात स्वतहून आधार बनुन रहा ..!


"दोन तन एक प्राण" असे मानतेस तर
असंच 'राधेकृष्णा'सम प्रेम करत रहा ..!!


-- संजय कुलकर्णी .
कशाला ...?




मला पाहून नजर अशी फिरवतेस कशाला 
पहायचे न्हवते तर मज समोर येतेस कशाला ?


समोर येऊन बोलायला घाबरतेस कुणाला, कशाला 
प्रेम करतेस माझ्यावर तर गप्प बसतेस कशाला ? 


तुझ्यावरील माझे प्रेम जाणुन हळहळ्तेस कशाला
माझ्या प्रश्नास उत्तर द्यायचे मग टाळतेस कशाला ?


माझ्या वाटेवर पाहण्यासाठी डोळे लावतेस कशाला
दिसलो नाही तर 'कुठे होतास ?' असे विचारतेस कशाला ?


-- संजय कुलकर्णी .

प्रेमळा भेटलास का ..?

हि सल अतृप्ततेची मी साहू कशी
विरहात तुझ्या सखया, सांग मी राहू कशी ?


मदधुंद करून अर्ध्यावर डाव मोडलास कसा
तोषवून नादावून सजणा, अचानक तू गेलास कसा ?


ते घाव हवेहवेस लुटलेले मी लपवू कसे
त्या ओढीस प्रणया, तप्त रंध्रात थोपवू कसे ?


लडिवाळ कुरवाळून मिठीतून हळुवार निसटलास का
उन्मत्त स्पर्शाळून अंगांग चेतवून, माघार घेतलीस का ?


प्रेमवेड्या राधेस सोडून कन्हैया दूर गेलास का
जायचे होते तर, स्वप्नात प्रेमळा भेटलास का ..?


-- संजय कुलकर्णी.
 
नातं ... ऋणानुबंधाच !!


मन पण कसं असतं 
कधी ना पाहिलेलं

सहज नजरेत भरतं
अन एकांती आठवू लागतं !


अनोळखी नकळत जवळचं बनतं
दूर असलं तरी

सदोदित मनात वसतं
अन भेटण्यास आतुर करतं !


प्रेम पण कसं जुळतं
सुरवातीस मैत्र जपून

जाळं स्नेहबंधाच विणतं
अन ऋणानुबंधाच नातं जोडतं ..!!


-- संजय कुलकर्णी 

माझी गझल ..!!


भावनांच्या हिंदोळ्यावर मनांतरी झुलावी गझल
आनंदाच्या जाणीवांवर डुलावी फुलावी माझी गझल !


कल्लोळ उद्वेगांचा जीवनी दाटतो जेव्हा
उत्स्फुर्तपणे ओठांनी मधाळ बोलावी माझी गझल !


कशाला अगाध कल्पनांनी मढवावी गझल
सहजगम्य रूपांनी मनी भरावी माझी गझल !


कशाला भूतकाळास आळवून निराशवावी गझल
स्वप्नील पंखांनी विहरून हर्षवावी माझी गझल !


आठवलीस जराशी तू पाहोनी गुलाबास
तरी स्पर्षंगंधून तनमनी गुणगुणावी माझी गझल ..!!


-- संजय कुलकर्णी .
 

का मुग गिळले ..?

एक साधे उत्तर त्यास तुला किती प्रश्न पडे
हो कि नाही सांगण्यास, सखये का इतुके आढेवेढे !


एकांती तुला गाठण्यासाठी प्रयत्न किती मी केले
भेटता अचानक गोंधळून बोबडी किती तुझी वळे !


मनास माझ्या संभाषुन नजरेनी, किती तू अजमाविले
वायफळ बोलण्यात वेळ घालवूनी, मुद्द्याचे तू टाळिले !


तुझ्या आठवांत तळमळून मी, किती रात्री जागल्या
तुझ्या भासांत गडबडून लोकांच्या, किती चेष्टांस साहल्या !


पत्रांतून नात्यां विषयी भरभरून किती ग तू लिहिले
नाते अपुले कोणते पुसतां, साजणे का मुग गिळले ..?


-- संजय कुलकर्णी .
 
विनवणी ... 
प्रियकराची 


मनात नसलं तरी 
खोटं-खोटं तरी तू हास ना,

प्रेम नसलं तरी
माणुसकीने तरी तू वाग ना ..!



नातं उरलं नसलं तरी
अनोळख्याप्रमाणे टाळू नको ना,

अंतरात नसलं तरी
लोकांसमोर तरी तू बोल ना ..!



कुणा कुणाला सांगु मी
तुझ्या माझ्यातली भांडणाची कारणं,

तमाशा प्रेमाचा अपुल्या
सर्वांसमोर तरी तू करू नको ना ..!



मान्य मला दोघात
मी इतके ताणायला नको होते,

तू सुद्धा भांडणात
भावनांस माझ्या जाणायला नको का ?



तुझ्याशिवाय जगण्यात सखये
मला काही स्वारस्य उरलं नाही,

मी गेल्यावर तरी
शेवटचे पाहण्यास तू येशील ना ...?


--- संजय कुलकर्णी .

सांजवेळ ..!


पुन्हा सांजवेळी मळभ तुझ्या
आठवांचे दाटून आले,

पुन्हा संधीकाली नयनी घन
आसवांचे भरून आले !


पुन्हा सारया जगास विसरून
देहभान हरपून गेले,

पुन्हा सारया स्पर्षंगंधांस आठवून
तनमन हरखून गेले ..!


जरा थांब मन भरून
तुजपाशी राहू दे,

जरा थांब तन हर्षून
नखशिखांत भिजू दे !


पुन्हा शांत होऊन सूर
जीवनाचे बहरू दे,

पुन्हा तृप्त होऊन पूर
आठवांचे ओसरू दे ..!!


--संजय कुलकर्णी .
 

बरसात अमृत धारांची ... !!


काल राती न्हाऊन शयनगृही
अशी तू आली ,
केस मोकळे घेऊन पाठीवर
टप टपत पाणी !


चेहरा नितळ अन त्यावर
जल-बिंदूचे मोती ,
भासली जणू माझ्या घरी
जलपरीच तू आली !


लांब सडक केस झाड्ले तुझे
पहात मज दर्पणी ,
वेधले लक्ष माझे, तुषार जसे
चार पडले चेहर्यावरी !


चीडवलेस जव मजला तू
वेडावून दाखवत हांसुनी ,
कडाडून गर्जले मेघ नभी
थरारून तुझ तनमनी !


बंद करू जाता गवाक्ष
लगबगीने मी झडकरी ,
नजर खिळली आपसूक तव
टंच कमनीय बांध्यावरी !


ओष्ठ दाबत हंसून मज
प्रोत्साहित तू लाजली ,
आकाशी तत्क्षणी हाय कशी
वीज भयानक कडाडली !


दचकून आवाजाने घाबरून मज
अशी तू बिलगली ,
मदन वीज निमिषार्धात जणू
अंगी मम संचारली !


प्रेम भारीत मेघांची जशी
मधुर भेट घडली ,
होऊन बरसात अमृत धारांची
वसुंधरा शांतवून निजली ... !!


--- संजय कुलकर्णी.
 

स्वर्ग पाहिला होता ..!!


हरपून भान चार क्षण जीव सुखावला होता
सहवासात तुझ्या साजणे मी स्वर्ग पाहिला होता ..।। धृ ।।


वैशाख वणवा अपयशांचा सर्वत्र रणरणता पेटला होता
त्राही त्राही होऊन गलीतगात्र जीव गांजला होता

सुखावून स्वप्नांच्या चार सरी मनी बरसल्या होत्या
सहवासात तुझ्या साजणे मी स्वर्ग पाहिला होता ..।। १ ।।



विसरून व्यथांस जरा कुठे मी रमलो होतो
निरखून सुखांस जरा कुठे मी हसलो होतो

भुलवून स्वप्नात अचानक नियतीने डाव साधला होता
सहवासात तुझ्या साजणे मी स्वर्ग पाहिला होता ..।। २ ।।



कुठून कसा पवन गतस्मृतींचा हळुवार झुळकला होता
कुठून कसा पदर गुपितांचा अलवार सरकला होता

आठवांत तुझ्या सहज स्पर्षंबंधांचा मधुशार शहारला होता
सहवासात तुझ्या साजणे मी स्वर्ग पाहिला होता ..।। ३ ।।



हरपून भान चार क्षण जीव सुखावला होता
सहवासात तुझ्या साजणे मी स्वर्ग पाहिला होता ..।। धृ ।।


-- संजय कुलकर्णी .
 

तुझी माझी प्रीत ..!!

शब्दा वाचून तुला समजाव्या
अव्यक्त मम हृदयीच्या भावना,

बोलल्या वाचून मला उमजाव्या
अतृप्त तव अंतरीच्या कामना ..!!



तुला पाहता मी वाटावे
मला निरखता तू भासावे,

माझ्या ध्यासांत तू रहावे
तुझ्या आशांत मी वसावे ..!!



तुझ्या सुखास्तव मी झटावे
माझ्या आनंदास्तव तू नटावे,

तुझ्या श्वासांत मी जगावे
माझ्या जगण्यात तू आश्वसावे ..!!



एकरंग दो जीवने व्हावी
एकरूप दो तन्मने न्हावी,

प्रीत अपुली अद्वितीय असावी
मृत्यूसहि हरवून जन्मोजन्मी जुळावी ..!!


--- संजय कुलकर्णी.
 
सवय आहे मला ... 


सवय आहे मला 
तुझी वाट पहाण्याची, 
उशिरा येऊन लवकर 
निघण्यासाठी तगादा लावण्याची ..!!


सवय आहे मला
तुझी बडबड ऐकण्याची,
स्वत:बद्दल बोलायचे सोडून
जगाची उठाठेव सांगण्याची ..!!


सवय आहे मला
एकांती तुला आठवण्याची,
सहवासातील मधुर क्षण
अंतरी वारंवार अनुभवण्याची ..!!


सवय आहे मला
तुझे मिसकॉल देण्याची,
माझा 'Talk-Time' संपवून
तासंतास 'Time-pass' करण्याची ..!!


सवय आहे मला
तुझे ' प्रेम नाही ' सांगण्याची,
रागावून मी रुसतां
प्रेमाने तुझ्या मनवण्याची ..!!


--- संजय कुलकर्णी.
तू अन मी ..!!


तुला पाहतो मी 
जणु स्वत:स बघतो मी 

तुझ्या डोळ्यात मी
मम स्वप्नांस पाहतो मी !


तुजसवे बोलतो मी
जणु स्वत:शीच संवादतो मी

तुजसवे हासतो मी
आनंदे भयमुक्त होतो मी !


वेळी अवेळी तुला मी
हक्काने सादतो मी

कुठे कधीही तुला मी
सावलीसम मानतो मी ..!


कधी हताशलो मी
तुजपाशी त्वरित तक्रारतो मी

मनी शांतवून मी
तुझ्या कुशीत सुखावतो मी !


मर्म आनंदाचे मी
तुझ्या जीवनातून जाणलो मी

निरपेक्ष प्रेमसुखास मी
तुझ्या स्नेहबंधातून पावलो मी ..!!


--- संजय कुलकर्णी 
मधुमिलन ... 
मनासारखं !!


तुला पाहता निमिषार्धात 
मन थारयावर राहिलं न्हवतं,
प्रेमास माझ्या स्वीकारताच 
मनासारखं सारं जुळलं होतं !


मजभोवती तुझ्या असण्यानं 
मनी स्वप्न फुललं होतं, 
सर्वांसमोर मागणी घातल्यानं 
मनासारखं संसारी जाहलं होतं !


तुझ्या प्रत्येक स्पर्शागणिक 
रोम-रोम कारंज्यासम उसळलं होतं, 
अधीरपणे तू चुंबताक्षणीच 
मनासारखं मधुमिलन घडलं होतं ..!!

-- संजय कुलकर्णी .
तू माझा पंचप्राण आहेस ..!!


खरे खोटे दाखविणारा तू दिवसाचा सूर्यप्रकाश आहेस 
मन आल्हादवून स्वप्नाळणारा तू शीतल चंद्रप्रकाश आहेस !


छत्र छायेत ज्याच्या मी सदैव नि:शंक असावे
असा आश्वासक विशासू तू माझा आधारवृक्ष आहेस !


कधी झगडावे अन कधी शांत बसावे शिकविणारा
माझ्या जीवनाचा खरा मार्गदर्शक तू दीपस्तंब आहेस !


अपयशातही साथ देणारा तू सच्चा मित्र आहेस
यशातही बहकू न देणारा तू माझा धाक आहेस !


माझे आशास्थान माझे स्वप्न, तू ध्येय आहेस
स्फुर्तीदाता तारणहर्ता कन्हैया तू कर्ता-करविता आहेस !


हताश होता जीवनी जराही आपुलकीने मला सांभाळणारा
दयाळू मायाळू कृष्णा .. तू माझा पंचप्राण आहेस ..!!


--- संजय कुलकर्णी .
स्वार्थ ... नि:स्वार्थ !!

सुख देताना इतरांस 
मी स्वार्थ ना देखिला , 
दु:ख्ख देताना इतरांनी 
तयांचा स्वार्थ ना सोडीला !!


प्रत्येक वेळी आनंदात
मी विचार इतरांचा आणला ,
प्रत्येक वेळी संकटात
इतरांनी काढता पाय घेतला !!


संधी मिळता स्वार्थीपणे
मी मार्ग मरणाचा स्वीकारला ,
पहिल्यांदा सर्वांनी नि:स्वार्थीपणे
मज जाळण्यास हातभार लावला ..!!

--- संजय कुलकर्णी .

तूच असतेस ...!!


कामात असलो तरी
मनात माझ्या तूच असतेस,

स्वप्नात असलो तरी
स्वप्नात माझ्या तूच असतेस !


कविता माझ्या तरी
शब्दा-शब्दात तूच असतेस,

भावना माझ्या तरी
अर्था-अर्थात तूच असतेस !


जीवन माझे जरी
ध्येय जीवनाचे तूच असतेस,

जगतो मी तरी
जगविणारी मात्र तूच असतेस !


प्रेमात मी जरी
प्रेमात पाडणारी तूच असतेस,

वेडा वाटलो तरी
वेड लावणारी तूच असतेस ...!!


-- संजय कुलकर्णी .
 

साथ कायमची देशील का ..? 


आयुष्याच्या या प्रवासात
साथ कायमची देशील का ..?

सुखात राहून मजबरोबर
दु:ख्खात तुझा मानशील का ..?


आयुष्याच्या या प्रवासात
साथ कायमची देशील का .. -- धृ --



एकटे वाटेल तुला जेव्हा
बोलावून मला घेशील का ..?

हात घालूनी हातात तेव्हा
हितगुज मोकळे करशील का ..?


आयुष्याच्या या प्रवासात
साथ कायमची देशील का .. -- 1 --



भेटतील तुला बरेच नात्यात
तरी नाते अपुले जपशील का ..?

बंधने व्यवहारिक नसून कोणती
तरी भावनिक नाळ जोडशील का ..?


आयुष्याच्या या प्रवासात
साथ कायमची देशील का .. -- 2 --



दूर राहोनी मजपासून सखये
अंतरी सदैव स्मरशील का ?

प्रियकर नको म्हणू मला
पण सखा जिवलग म्हणशील का .. ?


आयुष्याच्या या प्रवासात
साथ कायमची देशील का .. -- 3 --


-- संजय कुलकर्णी.
 
सय तुझी सजणा ...

भान दिन रातीचे मला न उरते, 
सय तुझी सजणा मना सैरभैर करते !

सारे काही असुनी जीवन भकास वाटते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते ...!!



राम प्रहरी गीत कसे विरहाचे सुचते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते !

कामात नेहमीच्याच कशी पदोपदी मी चुकते
सय तुझी सजणा मना सैरभैर करते ...!!



भासांनी तुझ्या अशी क्षणोक्षणी मी फसते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते !

दर्पणी बघुनी तुला घायाळ लाजुनी हसते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते ...!!



स्पर्शगंधाने तुझ्या तनमनी भारुनी मी जगते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते !

वाटेवरी तुझ्या डोळे लावून मी बसते,
सय तुझी सजणा मना सैरभैर करते ...!!


-- संजय कुलकर्णी .
सांगा ना ..?
आपण असे का वागतो ?



जीवाभावाचं आपलं 
कुणी अचानक सोडून गेल्यावर ..

" साथ संपली " समजून
उरलेलं आयुष्य दु:ख्खात घालवतो ..!


नातं फक्त ..
जिवंत असतानाच का रहातं ..?

प्रेम फक्त ..
शारीरिक सहवासात का असतं ..?


दिसत नसलं ..
तरी प्रेम अमर असतं

शारीरिक ऋणानुबंध ..
केवळ संपलं असं असतं ..!


आत्मिक प्रेम
जन्मोजन्मी टिकतं, कायम वसतं

रडून खरंतर
आपलंच प्रेम व्यथित असतं ..!!


-- संजय कुलकर्णी .
पुन्हा कधी ...


कोणी दुखावले, कोणी चिडवले 
ह्याची कहाणी ... सांगेन पुन्हा कधी ,

कोणी फसवले, कोणी रडवले
ह्याची व्यथा .. सांगेन पुन्हा कधी ..!!


हृदय पिळवटणार्या अशा गोष्टी
लक्षात रहातात... विसरायच्या कशा कधी ?

आठवून दररोज रडायचे किती ?
अंत नाही ... हसेन पुन्हा कधी ..!!


जीवनभरच्या साथीच्या आणाभाका, वचने
काय नाही घडले ... आठवू किती ?

कोणी दिली, कोणी तोडली
कशा रीतीने ... सांगेन पुन्हा कधी ..!!


माणुसकीने वागणार्या सभ्य माणसांत
नकली शुभ चिंतक ... पाहू किती ?

तोंडावर हासून, पाठीमागून चिडवले
नकली चेहरे ... दाखवीन पुन्हा कधी ..!!

-- संजय कुलकर्णी .

जीवन ...



स्वप्नांचा फुलोरा आहे 
सत्याचा मात्र कटोरा आहे ..!



आनंदाचा मागोवा आहे
दु:ख्खांचा सतत ससेमिरा आहे ..! 



जगण्याच्या ह्या धडपडीला 
उपेक्षांचा निरंतर पाठपुरावा आहे ..!



जीवनास समझून घे 
संधींचा इथे दुष्काळ आहे ..!



थोडी मस्ती विरंगुळ्यासाठी 
कष्टांचा जगी बोलबाला आहे ..!



घटका भरता काळ ना पाहे 
तू  तृप्त आहे कि भुकेला आहे ..!



आकांक्षांच्या पूर्ततेसाठी पुन्हा 
जन्म मरणाचा फेरा आहे  ..!!



--- संजय कुलकर्णी .


सखी ...


सखी असावी तुझ्यासारखी
सळसळणार्या उत्साहास सतत वाहणारी,

मनमोकळ्या बोलण्या वागण्यांनी
मनावरील दडपण दूर करणारी ..!



सखी असावी तुझ्यासारखी
सुखात भावनांस कंट्रोल करणारी,

चुकल्यावर हक्काने ओरडणारी
संकटात स्वत:हून आधार बनणारी ..!



सखी असावी तुझ्यासारखी
प्रेमाने मजवर जीव लावणारी,

सोडून गेले कितीही अर्ध्यावर तरी
जन्मभर मज बरोबर साथ असणारी ...!!


--- संजय कुलकर्णी.
 
प्रेम ..

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं असतं,

आपल्या प्रेमात त्यालाही
प्रेम देऊन फुलवायचं असतं ...!


प्रेमी बनुन कधी
हक्काने मुद्दामून रुसायचं असतं,

आपल्या मनवण्यात त्यालाही
प्रेमानं खुशीनं जिंकवायचं असतं ...!


जन्मोजन्मीचं नातं कधी
क्षुल्लकशा कारणांनी तोडायचं नसतं,

आपलं मानलेल्या त्यालाही
गुण दोषासह स्वीकारायचं असतं ...!!


-- संजय कुलकर्णी 

वेडा ...!!



मी मनमुराद जगलो पुन्हा

मी वेड्यात गणलो जेव्हा ..! 



मी मलाच भेटलो पुन्हा 

मी तुझ्यात गुंतलो जेव्हा ..!



मी स्वप्नात रमलो पुन्हा 

मी खळ्यात फसलो जेव्हा ..!



क्षणभर भान हरपलो पुन्हा 

तू लाजून हसलेस जेव्हा ..!



जाळ्यात प्रेमाच्या फसलो पुन्हा 

अबोल इशारयांस जाणलो जेव्हा ..! 



मर्म आनंदाचे जाणलो पुन्हा 

लुटल्यावर स्वत:स तृप्तलो जेव्हा ..!



मी मनमुराद जगलो पुन्हा

मी वेड्यात गणलो जेव्हा ...!!



-- संजय कुलकर्णी .
पहाट स्वप्ने ..!!


मान्य मला सत्य नाही हे 
पण स्वप्नात मजला नित्य भेटशील का ?

मान्य मला केवळ मनोरंजन हे
पण स्वप्नात मजसवे थोडे रमशील का ?


मान्य मला शक्य नाही हे
पण स्वप्नात पळभर साथ देशील का ?

मान्य मला खरे नाही हे
पण स्वप्नात क्षणभर हात घेशील का ?


मान्य मला स्वप्नभंग दुख्खांत आहे
पण स्वप्नात मजसंग सुखात राहशील का ?

मान्य मला सारे हास्यवत आहे
पण स्वप्नात जन्मभर एकत्र नांदशील का ?


मान्य मला दिवास्वप्ने पाहू नये
पण पहाटेस तू स्वप्नात येशील का ?

मान्य मला जीवन स्वप्न न्हवे
पण 'पहाट-स्वप्नां'स तू सत्यवत करशील का ...?


--- संजय कुलकर्णी 

तिची माझी गोष्ट ...!!


तिची माझी गोष्ट जरा वेगळीच आहे ,
म्हणायलां मैत्री पण जगावेगळी प्रेम कहाणी आहे !


दररोज रुसवाफुगवी अन वादावादी आहे ,
म्हणायला जिवलग पण विळा-भोपळ्याची जोडी आहे !


दोन कोसांवर दोघांची घरटी आहेत ,
दिसायला विभक्त पण मनाने एकरूपी आहे !


एकत्र येण्यासाठी नाना खटाटोपी आहेत
भेटल्यावर अळीमिळी पण जन्माची गट्टी आहे !


खरंच सांगतो तुम्हाला अनोखी भट्टी आहे
दूर एकमेकांपासून आहे पण राधाकृष्णी जोडी आहे ..!!


--- संजय कुलकर्णी.
 

तू अन मी ...!!


तुझ्या माझ्या नात्यावर
कितीही विचार केला तरी
अगम्य कोडं वाटतं ,


तुझ्या माझ्या संबंधावर
कितीही लिहीलं तरी
काहीतरी राहिलं वाटतं..!!


तुझे माझे जीवन
वेगवेगळं असलं तरी
एकमेकांशी निगडीत वाटतं,


आनंदी जीवनात माझ्या
सारंकाही मिळविलं तरी
तुझ्यावाचून उणं वाटतं ..!!

--- संजय कुलकर्णी.

Saturday, April 14, 2012

रंग भरल्या खेळातून ...


रंग भरल्या खेळातून ...



काढून हात गळ्यातून
हाय .. असा वळू नकोस ,

रंग भरल्या खेळातून
हाय .. असा पळू नकोस ..!



अजून मम श्वासांनी
गंध तुझे भरू दे ,

अजून तव स्पर्षांनी
धुंद मला होऊ दे ..!



अजून ह्या ओठांनी
मधुकंद बेफाम लुटू दे ,

अजून ह्या बाहूत
मदमस्त बेताब घुसू दे ..!



अजून अंगांग माझे
खेळात रांगड्या फुलू दे ,

शरीर मदांध तुझे
झोकात धसमुसळ्या झुलू दे ..!



संधी अपुली एकरूपतेची
हाय ... प्राणसजणा गमवू नकोस ,

धुंदी डोळ्यातली मधुमिलनाची
हाय ... मनमोहना घालवू नकोस ...!!


--- संजय कुलकर्णी .

नव्याने इतिहास घडविणार कोण ...?


नव्याने इतिहास घडविणार कोण ...?



'अन्याय अन्याय' म्हणून जो तो ओरडतो ,
न्यायाने इथे वागतंय कोण ?

विश्वासभंगाने जो तो गळे काढतोय,
विश्वासाने साथ इथे देताय कोण ?



इतिहासात सदोदित जो तो रमतो ,
नव्याने इतिहास घडविणार कोण ...?

सुरुवात करण्याचे जो तो बोलतो,
स्वत:हून पुढाकार घेणार कोण ?



लाचारीत कुणाच्या तरी धन्य व्हायचे,
सत्व स्वत:चे इथे जपतोय कोण ?

खुशमस्कर्यांत मशगुल जो तो नेता,
हालांस जनतेच्या पहातंय कोण ?



कायदा बनविण्या आधी पळवाटा शोधतात,
भीती कायद्याची बाळगतय कोण ?

तुरुंगातही गुंड दहशतवादी,घोटाळेबाजांस "विशेष दर्जा",
सामांन्यांस इथे पुसतंय कोण ?



आत्महत्ये नंतर कर्जमुक्ती घोषित होते,
मोल कष्टकर्यांचे जाणतय कोण ?

मृतांच्या नावानेही इथे फायदे लुटतात,
जिवंत माणसास विचारताय कोण ?



विनाश वसुंधरेचा जवळ आला म्हणत
हिरीरीने टाहो फोडतो कोण ?

कोन्क्रीतचे जंगल सर्वत्र बनविले तर
निसर्गाचा प्रकोप थांबविणार कोण ?


--- संजय कुलकर्णी.

प्रेम ... अपुलं जसं __


प्रेम ... अपुलं जसं __



प्रेम ... पहिल्या ओळखीचं
प्रेम ... भेटीच्या निरोपाचं,

प्रेम ... पहिल्या स्पर्षाचं
प्रेम ... वियोगाच्या जाणीवेचं ..!



प्रेम ... जुळलेल्या मनांचं
प्रेम ... फुललेल्या स्वप्नांचं,

प्रेम ... हळव्या भावनांचं
प्रेम ... भक्कम हृदबंधाचं ..!



प्रेम ... रांगड्या शृंगाराचं
प्रेम ... हळुवार फुलविण्याचं,

प्रेम ... धसमुसळ्या अधीरतेचं
प्रेम ... मदमस्त मीलनाचं ..!



प्रेम ... चुकलेल्या जिवांचं
प्रेम ... सुटलेल्या कोड्यांचं,

प्रेम ...ऋणानुबंधाच्या गाठींचं
प्रेम ... अपुलं जसं राधाकृष्णाचं ..!!



--- संजय कुलकर्णी.

समजून उमजून .... दु:ख्खी !!


समजून उमजून .... दु:ख्खी !!



जगणे सुद्धा केविलवाणे
आत्मा कुढतो आहे,

मृत्यूची तमा न्हवती
भ्याडपणाने जगतो आहे ..!!



नैसर्गिक आनंदाचा
का ठाव लागे ना,

परिस्थितीशी हारणारयांचा
का टाहो दु:ख्खाचा ?



भोगल्यावर यातना प्रसुतीच्या
अन मरणप्राय सोसल्यावर ,

क्षण येतो भाग्ग्याचा
जन्म लेकरास दिल्यावर !



मी भूत अपयशाचे
का बाळगावे कायमपक्षी,

सर्वश्रेष्ठ (मानव)जन्म मिळता
का रडावे उलटपक्षी ?



गोंदतो नाव काळावर
स्वानंदे सकारत्मकतेने,

आरंभ यशावरती मी
करतो भयमुक्त बोलाने ..!!


-- संजय कुलकर्णी.

मळवट आनंदाचा ..!!


मळवट आनंदाचा ..!!



मी मुक्तहस्ते मळवट आनंदाचा कपाळी भरला होता
अन जगाच्या आरशात चेहरा स्वत:चा पाहिला होता !


ती आली अन हासून खुदकन निघून गेली
मी गाली तिच्या रंग गुलाबी देखिला होता !


ती द्वार स्व्प्नांगणाचे मजसाठी उघडवून गेली
मी भ्रमर होऊनी कुंजरव तीजभोवती केला होता !


ती वळली पुन्हा वरती वेळावले लटके रागाने
मी संधी साधून हात पटकन पकडला होता !


त्या स्थितीत भांभावून तीचा तोल ढळला होता
मिठीत येताच मधुकंद प्रेमाचा दोघांनी चाखला होता ..!!


-- संजय कुलकर्णी.