Popular Posts

Friday, September 9, 2011

अबोल प्रीती ...!




नको रे असा छळू तू सजणा
पुन्हा पुन्हा का विचारीशी मजला
कसे सांगू मी शब्दातून तुला
जनरीत पाळावी लागते रे मला ... !!



जाण मनातले तू पाहून मला
हृदय हारिले कधीची रे तुला
अबोल प्रीतीस तू जाण जरां
प्रेम अर्पितसे मनोमनी मी तुला ... !!



राधा ध्यासे क्षणोक्षणी जशी कृष्णाला
जपसी दूर राहुनी कान्ह्याच्या प्रेमाला
अगतिकता माझी तू समज प्रेमळा
एकरूप मानी प्रिया तुझ्यात स्वत:ला ... !!


----संजय कुलकर्णी .


विश्वास ... प्रेमावर !





प्रेम करणे न्हवे गुन्हा ,
भावना लपविणे खरा गुन्हा !


प्रेम कधी ना हरते ,
प्रेम कधी ना संपते !


प्रेम परमेश्वरी निर्मळ भावना ,
बोलण्यास मुक्तपणे का डरतो मना ?


विघ्ने प्रेमात आणणारे ,
कालही होते सदैव असणार ते !


परिणामांना जो अंतरी घाबरतो ,
तो प्रेम कसा करू शकतो ?


विश्वास असेल जर तुझ्या प्रेमावर ,
सहाय्य होईल नियती प्रेम जिंकण्यावर ...!!!



-- संजय कुलकर्णी .

मीलनाची ओढ !



वाहणार्या नदीस लागते
जशी ... सागराची अविरत होड,
माझ्या मनास तशीही
लागलीसी ...तुझ्या मीलनाची ओढ !



डोंगर कपारीतून काढते
वाट ...टाळून मार्गातील खोड,
परिस्थितीशी झगडून सखये
जुळवितो ...मनस्वी अपुली जोड ...!



बंधारे बांधून माणसे
करिती ...परी निसर्गाची मोडतोड
नतद्रष्ट मानवी संकटे
हाय ...करिती मम प्रेमाची तोडफोड !!


---संजय कुलकर्णी .


मैत्री म्हणजे ....






मैत्री म्हणजे
एकमेकांना सदैव साथ देणं !


मैत्री म्हणजे
संकटात आधाराचा हात देणं !


मैत्री म्हणजे
एकमेकांची चेष्टा मस्करी करणं !


मैत्री म्हणजे
एकमेकांसाठी जिवाचं रान करणं !


मैत्री म्हणजे
एकमेकावाचून क्षणभरही न रहाणं !


मैत्री म्हणजे
एकमेकांच्या मनात कायम असणं ...!!


---संजय.

रीत प्रेमाची ...!







भेटण्यासाठी मज आर्जवे करीशी
काही करता आढेवेढे घेशी ,
जातो मी रागाने म्हणता
हात धरून घट्ट पकडसी ..!!


अजब तुझी हि रीत प्रेमाची
तहान लाऊन पाणी लपविण्याची ,
मनीचे सर्व गुपित ठेवण्याची
अन " प्रेम आहे का तुझे ? " मज विचारण्याची ..?


प्रेम करतो मी मनापासून
तुज जपीन मी जीवापासून ,
वचन देता मी डोळे पाणावून
बोलू न देसी ओठ चुंबून ..!!


संजय कुलकर्णी .

प्रेम ...




प्रेम ...... तुझ्या नजरेचं ,
प्रेम ...... माझ्या ओळखण्याचं !


प्रेम ...... तुझ्या हृदयीच ,
प्रेम ...... माझ्या अंतरीच !


प्रेम ...... तुझ्या मनातलं ,
प्रेम ...... माझ्या भावनांचं !


प्रेम ...... तुझ्या रुसण्यातल
प्रेम ...... माझ्या समजविण्यातल !


प्रेम ...... अबोल वचनांच
प्रेम ...... अतूट विश्वासाचं !


प्रेम ......तुझ्या स्पर्षंगंधाचं
प्रेम ......माझ्या मदधुंदीचं !


प्रेम ...... जागलेल्या रात्रीचं
प्रेम ......स्वप्नपूर्तीच्या अनुभूतीचं ...!!


---- संजय कुलकर्णी .


Friday, September 2, 2011

मज छळती भास सखयाचे रे ...!






कितीदा असे फसून जायचे रे
मज छळती भास सखयाचे रे !


खट्ट होता जरी कुठे रे
धावते लगबगीने दार उघडण्या रे !


झुळकीने केस कपाळीचे जरी उडता रे
चिडते वाटून तूच बटांसी खेळतो रे !


कामात पदर जरी कुठे अडकता रे
लाजते जणु तूच जवळी खेचतो रे !


वाटते बरेचदा शिरून मिठीत
तुझिया मज शांतवावे रे !


पण हाय वाट पाहून कैकदा
अश्रूंनी स्वत:स नाहवावे रे ...!!


-- संजय कुलकर्णी.

जन्मांतरीचे प्रेमतरंग ...!





माझ्या हरेक श्वासात
तुझा प्रिये ध्यास ,
माझ्या हरेक स्वप्नात
तुझ्या मिलनाचा भास !


माझ्या हरेक कामात
तुझाच ग सखे सहवास ,
माझ्या हरेक यशात
तुझ्या प्रेमाचा विश्वास !!


माझ्या हरेक हास्यात
प्रिये तुझेच मनतरंग ,
माझ्या हरेक जन्मात
जन्मांतरीचे जपलेले प्रेमतरंग ...!!


--- संजय .

प्रेम ... तुझे माझे !!





अंतरी दोघांच्या गुप्त वसते
जवळ नसून सतत जाणवते !


मी स्मरताच तुला भासते
दर्पणी पाहताच तूच दिसते !


बोलण्याची गरज न उरते
तुझ्या नजरेने मला समजते !


आनंदात प्रथम मला सांगते
दु:ख्खात माझा आधार मानते !


दिनरात माझे गुणगान करते
गीतातून मनीचे प्रेम अर्पिते !


सावलीसम सदैव साथ राहते
स्वप्नी भेटुनी तृप्त करते !!


पहाणार्यास कधी न दिसते
हृदयी जे अमर असते !


सर्वांहुन प्रिय मला मानते
अनोख्या प्रीतीचे नाते जपते ...!!


--- संजय कुलकर्णी .



नातं ...






दोन जिवांच नातं
एकजीव वाटावं ,
एकास वाईट वाटताच
दुसर्यांन हळहळावं ..!


दोन मनाचं नातं
मनात असावं ,
एकास जे सांगायचे
दुसर्याने बोलावं ..!


दोन प्रेमींच नातं
एकरूपी दिसावं ,
एकास हवे ते
दुसर्यानं द्यावं ..!


दोन मित्राचं नातं
वर्तनी दिसावं ,
एकाच्या सुखा साठी
दुसर्यांना धडपडावं ..!!


संजय.

भास -- साजणाचे ...!!






क़ा असे मजला होते
दिनरात तुला मी स्मरते ...!


काही करू मी जाते
मजभोवती तुझे लुडबुडणे जाणवते ...!


दर्पणी जरी मी बघते
परी तुलाच तयांत पहाते ...!


मी साडी नेसू जाता
तव स्पर्शांच्या जादूनी मोहरते ...!


ओठांसी जरी मी रंगविले
लाजते , जणू हळुवार तू चुंबिले ...!!


संजय कुलकर्णी .

अपुली मैत्री ...!






आस माझी मैत्रीची
साद तुझी मैत्रीची ,
सुख दु:ख्खातील साथीची
मैत्री अनामिक नात्याची !


राग मैत्रीतला
अनुराग मैत्रीतला ,
भांडणं रुसणं मैत्रीतलं
हुरहूर मनातली मैत्रीतली !


वाट पाहणं मैत्रीतलं
हट्ट धरणं मैत्रीतलं ,
प्रेमाने मनाविल्यावर पुन्हा
गळ्यात गळे घालणं मैत्रीतलं !


सतत बोलकी मैत्री
मनस्वी भावनांची मैत्री ,
हवी हवीशी वाटणारी मैत्री
अबोल प्रीतीची अपुली मैत्री ...!!!


संजय कुलकर्णी .

खरे सौंदर्य ...!





पाहणार्याच्या नजरेत

कवितेतील भावात

वाखाणणार्याच्या मनात

बालकाच्या निरागसतेत

तारुण्याच्या जोशात

युवतीच्या साधेपणात

सुवासिनीच्या सात्विकतेत

माणसाच्या क्षमाशीलतेत

वृद्धांच्या खंबीरतेत

मीरेच्या भक्तीत

राधेच्या प्रीतीत

कृष्ण-सुदाम्याच्या मैत्रीत

खरे सौंदर्य असते !!!


--संजय.

तिन्हीसांज ...






तिन्ही सांज होता नजर वाटेकडे लागते
तुझ्या आठवणीने निरव शांततेत सैरभैर होते !



तुझ्या मिलनाच्या ओढीने मी स्वत:स आवरते
उगीचच हसत तुझे आवडीचे गीत ओठी गुणगुणते !



सखया, तुला मोहरविणारी गुलाबी साडी नेसते
दर्पणी पाहुनि शृंगारता तुझे हळुवार स्पर्षं भासते !



तुला आवडणार्या रंगाने मी ओठांस रंगविते
तुझ्या मधाळ चुंबनाच्या सयीने अंतरी लाजते !


---संजय.

नातं ... अभेद्य प्रेमाचं कोंदण ...!!




तुझ्या माझ्यातलं नातं ,

कुणा कधीच नाही समजलं ..!



मनाचे मनाशी झालेलं ,

एक मधुर अनोखे बंधन ..!



तुझ्या अंतरीच सारं ,

नजरेनं मी सदैव जाणलं ..!



जेव्हा गरज भासलं ,

तेव्हा आपणहून जवळी आलं ..!



प्रेमाने आकंठ भरलेलं ,

वासनेन नाही कधीच बरबटलं ..!!



वय कितीही वाढलं ,

तरी अभेद्य प्रेमाचं कोंदण ...!!



--संजय कुलकर्णी.

काही नाही मनात तर ...



काही नाही मनात तर ..

मागे वळून पाहतेस कशी ?

मला पाहून गालावरील तुझी

सुंदर खळी खुलतेच कशी ?



काही नाही मनात तर ..

रुमाल मागे टाकतेस कशी ?

त्याच वेळी,त्याच ठिकाणी

दुसर्या दिवशी तू येतेस कशी ?



काही नाही मनात तर ..

हाक मारावी म्हणून थांबलीस कशी ?

ओळख वाढावी म्हणून मग

रुमाल देताना नाव पुसतेस कशी ?



काही नाही मनात तर ..

माझ्यासवे नाक्यावरील 'कटिंग' प्यायलीस कशी ?

' पुन्हा कधी भेटणार ? ' जाताना पुन्हा

'शेक-हेन्ड' करत विचारतेस कशी ?



काही नाही मनात तर ..

'मोबाईल नंबर' ची देवाण-घेवाण केलीस कशी ?

तिन्ही त्रिकाळ मेसजेस अन

फोनवर तासनतास बोललीस कशी ?



काही नाही मनात तर ..

दूरवर फिरायला आलीस कशी ?

कुणी विचारल्यावर 'माझा बेस्ट फ्रेंड'

खोटे असे बोललीस कशी ?



काही नाही मनात तर ..

नजरेचे इशारे करतेस कशी ?

जवळ येवून माझ्या पुन्हा

नको तेव्हा लाजतेस कशी ?



काही नाही मनात तर

घट्ट हात धरून ठेवतेस कशी ?

तहान लावून 'इश्श्य' म्हणत

मान दुसरीकडे फिरवतेस कशी ?



काही नाही मनात तर ..

भेटलो नाहीतर चिडतेस कशी ?

भेटल्यावर मी दुसर्या दिवशी

अबोला रागावून धरतेस कशी ?



काही नाही मनात तर ..

' सॉरी' म्हंटल्यावर मिठीत शिरतेस कशी ?

'जन्मभर अशीच साथ दे ' म्हणत

डोळ्यात आसवे आणतेस कशी ...?



---संजय कुलकर्णी .