Popular Posts

Saturday, April 14, 2012

रंग भरल्या खेळातून ...


रंग भरल्या खेळातून ...



काढून हात गळ्यातून
हाय .. असा वळू नकोस ,

रंग भरल्या खेळातून
हाय .. असा पळू नकोस ..!



अजून मम श्वासांनी
गंध तुझे भरू दे ,

अजून तव स्पर्षांनी
धुंद मला होऊ दे ..!



अजून ह्या ओठांनी
मधुकंद बेफाम लुटू दे ,

अजून ह्या बाहूत
मदमस्त बेताब घुसू दे ..!



अजून अंगांग माझे
खेळात रांगड्या फुलू दे ,

शरीर मदांध तुझे
झोकात धसमुसळ्या झुलू दे ..!



संधी अपुली एकरूपतेची
हाय ... प्राणसजणा गमवू नकोस ,

धुंदी डोळ्यातली मधुमिलनाची
हाय ... मनमोहना घालवू नकोस ...!!


--- संजय कुलकर्णी .

नव्याने इतिहास घडविणार कोण ...?


नव्याने इतिहास घडविणार कोण ...?



'अन्याय अन्याय' म्हणून जो तो ओरडतो ,
न्यायाने इथे वागतंय कोण ?

विश्वासभंगाने जो तो गळे काढतोय,
विश्वासाने साथ इथे देताय कोण ?



इतिहासात सदोदित जो तो रमतो ,
नव्याने इतिहास घडविणार कोण ...?

सुरुवात करण्याचे जो तो बोलतो,
स्वत:हून पुढाकार घेणार कोण ?



लाचारीत कुणाच्या तरी धन्य व्हायचे,
सत्व स्वत:चे इथे जपतोय कोण ?

खुशमस्कर्यांत मशगुल जो तो नेता,
हालांस जनतेच्या पहातंय कोण ?



कायदा बनविण्या आधी पळवाटा शोधतात,
भीती कायद्याची बाळगतय कोण ?

तुरुंगातही गुंड दहशतवादी,घोटाळेबाजांस "विशेष दर्जा",
सामांन्यांस इथे पुसतंय कोण ?



आत्महत्ये नंतर कर्जमुक्ती घोषित होते,
मोल कष्टकर्यांचे जाणतय कोण ?

मृतांच्या नावानेही इथे फायदे लुटतात,
जिवंत माणसास विचारताय कोण ?



विनाश वसुंधरेचा जवळ आला म्हणत
हिरीरीने टाहो फोडतो कोण ?

कोन्क्रीतचे जंगल सर्वत्र बनविले तर
निसर्गाचा प्रकोप थांबविणार कोण ?


--- संजय कुलकर्णी.

प्रेम ... अपुलं जसं __


प्रेम ... अपुलं जसं __



प्रेम ... पहिल्या ओळखीचं
प्रेम ... भेटीच्या निरोपाचं,

प्रेम ... पहिल्या स्पर्षाचं
प्रेम ... वियोगाच्या जाणीवेचं ..!



प्रेम ... जुळलेल्या मनांचं
प्रेम ... फुललेल्या स्वप्नांचं,

प्रेम ... हळव्या भावनांचं
प्रेम ... भक्कम हृदबंधाचं ..!



प्रेम ... रांगड्या शृंगाराचं
प्रेम ... हळुवार फुलविण्याचं,

प्रेम ... धसमुसळ्या अधीरतेचं
प्रेम ... मदमस्त मीलनाचं ..!



प्रेम ... चुकलेल्या जिवांचं
प्रेम ... सुटलेल्या कोड्यांचं,

प्रेम ...ऋणानुबंधाच्या गाठींचं
प्रेम ... अपुलं जसं राधाकृष्णाचं ..!!



--- संजय कुलकर्णी.

समजून उमजून .... दु:ख्खी !!


समजून उमजून .... दु:ख्खी !!



जगणे सुद्धा केविलवाणे
आत्मा कुढतो आहे,

मृत्यूची तमा न्हवती
भ्याडपणाने जगतो आहे ..!!



नैसर्गिक आनंदाचा
का ठाव लागे ना,

परिस्थितीशी हारणारयांचा
का टाहो दु:ख्खाचा ?



भोगल्यावर यातना प्रसुतीच्या
अन मरणप्राय सोसल्यावर ,

क्षण येतो भाग्ग्याचा
जन्म लेकरास दिल्यावर !



मी भूत अपयशाचे
का बाळगावे कायमपक्षी,

सर्वश्रेष्ठ (मानव)जन्म मिळता
का रडावे उलटपक्षी ?



गोंदतो नाव काळावर
स्वानंदे सकारत्मकतेने,

आरंभ यशावरती मी
करतो भयमुक्त बोलाने ..!!


-- संजय कुलकर्णी.

मळवट आनंदाचा ..!!


मळवट आनंदाचा ..!!



मी मुक्तहस्ते मळवट आनंदाचा कपाळी भरला होता
अन जगाच्या आरशात चेहरा स्वत:चा पाहिला होता !


ती आली अन हासून खुदकन निघून गेली
मी गाली तिच्या रंग गुलाबी देखिला होता !


ती द्वार स्व्प्नांगणाचे मजसाठी उघडवून गेली
मी भ्रमर होऊनी कुंजरव तीजभोवती केला होता !


ती वळली पुन्हा वरती वेळावले लटके रागाने
मी संधी साधून हात पटकन पकडला होता !


त्या स्थितीत भांभावून तीचा तोल ढळला होता
मिठीत येताच मधुकंद प्रेमाचा दोघांनी चाखला होता ..!!


-- संजय कुलकर्णी.

आत्मदर्पण ...!


आत्मदर्पण ...!



कधीतरी चेहर्या मधल्या मनाला
निरखून दर्पणी पाहावं ..

कधीतरी रुपा प्रमाणे अंतर्मनाला
मन:चक्षुंन अंतरी जाणावं ..!



बाह्यरंगास पाहून इतरा चिडवणं
खुपच सोपं असतं ,

मन दर्पणी क्षणभर डोकावणं
खरोखर अवघड असतं ..!



अविश्वासू दुसर्यास म्हणण्याआधी
कधीतरी मनास पुसावं ,

विश्वासाने इतरांशी वागतो का
कधीतरी आत्मदर्पणी शोधावं ..!!


---संजय कुलकर्णी .

गरज ...

गरज ...



गरज माणसाच्या जन्माचे कारण आहे
गरज जीवनास अत्यंत आवश्यक आहे ,

गरज माणसाच्या जीवनाचे मोल वाढवते
गरज माणसास खऱ्या अर्थाने घडवते ..!



गरज नसती तर निर्जीव असतो
गरज नसती तर प्रगत नसतो ,

गरज आहे म्हणून धडपडतो आपण
गरज आहे म्हणून स्वप्नाळतो आपण ..!



गरज असावी जीवन समृद्ध करणारी
गरज नसावी जीवन भकास वाटणारी ,

गरज असावी थोडक्यात समाधान पावणारी
गरज नसावी भरमसाठ हव्यास लावणारी ..!



गरज वाटावी माणसात देवत्व शोधण्याची
गरज जाणावी सर्वात एकत्व जाणण्याची ,

गरज नसावी पैशाची श्रीमंती दाखविणारी
गरज असावी मनाची श्रीमंती वाढविणारी ..!!


-- संजय कुलकर्णी.

चुकले का माझे ..?


चुकले का माझे ..?



आभाळास स्वप्न मानलो, चुकले का माझे ?
धरतीस सत्य जाणलो, चुकले का माझे ?


दु:ख्खास मित्र म्हणालो, चुकले का माझे ?
सुखास शत्रू पुकारलो, चुकले का माझे ?


सुंदर मरणास वदलो, चुकले का माझे ?
भयंकर जगण्यास बोललो, चुकले का माझे ?


चिरंजीव इच्छांस समजलो, चुकले का माझे ?
क्षणिक मृत्यूस उमजलो, चुकले का माझे ?


निंदणार्यांशी सख्य केले, चुकले का माझे ?
चढविणार्यांचे मन जाणले, चुकले का माझे ?


सामन्यांत सदैव रमलो, चुकले का माझे ?
असमान्यांस दुरून वंद्लो, चुकले का माझे ?


सख्यांमध्ये सदैव असतो, चुकले का माझे ?
मनामध्ये तुलाच स्मरतो, चुकले का माझे ...?


-- संजय कुलकर्णी .

क्षण क्षणात ...

क्षण क्षणात ...




क्षण आठवले क्षणात गहिवरले

क्षण क्षणात माझे मन मोहरले ..!!



क्षण फुलवले क्षणात बावरले

क्षण क्षणात माझे चित्त हरवले ..!!



क्षण हासले क्षणात लाजले

क्षण क्षणात तनमनी आनंदघन बरसले ..!!



क्षण भोगले क्षणात लुटले

क्षण क्षणात जीवनी नंदनवन बहरले ..!!



क्षण सौख्याचे क्षणात संपले

क्षण क्षणात अपुले ऋणानुबंध सरले ..!!



--- संजय कुलकर्णी.



मन माझं .. मन कुणाचं !!


मन माझं .. मन कुणाचं !!



मन हळवं, भावूक असतं

कुणाचं कठोर, थोड व्यवहारिक असतं !



मन भाबडं, मवाळ असतं

कुणाचं द्वाड, थोडं खट्याळ असतं !



मन वेड, लाघवू असतं

कुणाचं शहाणं, थोडं आगावू असतं !



मन प्रेमळू , स्वप्नाळू असतं

कुणाचं मायाळू, थोडं कनवाळू असतं !



मन हसरं, गोजिरं असतं

कुणाचं रांगडं, थोडं मस्तीखोर असतं !



मन खुशालचेंडू , आनंदी असतं

कुणाचं उदासीन, थोडं गंभीर असतं !



मन आपलं, हरवलेलं असतं

कुणाचं परकं मन गवसलेलं असतं ..!!



--- संजय कुलकर्णी .



कुणी तरी असावे ... प्रेमात छळणारे !!


कुणी तरी असावे ...
प्रेमात छळणारे !!



कुणी तरी असावे
हळूच चोरून पहाणारे,

नजरा नजर होताच
हासून नजर फिरविणारे ..!!



कुणी तरी असावे
गपचूप प्रेमपत्र पाठविणारे,

सायंकाळी भेटण्यास बोलविणारे
अन शेवटी "तुझीच टिंब टिंब" लिहिणारे ..!!



कुणी तरी असावे
बागेत एकांती बिलगणारे,

बोलण्यात गुंगवून हलके
चुंबता "चावट कुठला" म्हणणारे ..!!



कुणी तरी असावे
दिनभर भंडावून सोडणारे,

अन भेटल्यावर रात्री शयनगृही
भाव खावून प्रेमात छळणारे ..!!


--- संजय कुलकर्णी .


एकरुपवून रात्र गेली ..!!


एकरुपवून रात्र गेली ..!!



उधळून सर्वस्व रे, मिळवून रात्र गेली,
पेटवून उन्मत्त वणवा, शांतवून रात्र गेली .



लपंडाव चाले रे रोज, तुझ्या भावनांशी ,
गाठून एकांती मला रे, खेळवून रात्र गेली.



तू सांग कसे टाळू मी ? मदधुंद आरक्त मानसी
असे डाव तू खेळले, दमवून रात्र गेली.



जाणीव मजला न्हवती मुळीच, चंद्र चांदण्यांची
निजवून चंद्रास मम कुशीत, चांदणी होऊन गेली .



गोडी इतुकी लागली रे, मज काहीच कळेना
अतृप्त अधुरी तुझ्याविना मी, दाखवून रात्र गेली.



गेले उमजून तेव्हा, भेदभाव अपुल्यात नाही
हसतोस अता कसा रे ? एकरुपवून रात्र गेली ..!!


--- संजय कुलकर्णी .

भांडणे ...


भांडणे ...



नजर तुझी माझी
कधी ना जुळायची ,

पण चोरून पाहण्याची
संधी ना सोडायची ..!!



इच्छा असुनी कधी
ओळख ना वाढवायची ,

सुरवात कुणी करायची
ह्याचीच वाट पहायची ..!!



समोरा समोर येता
सलगी ना दाखवायची ,

इतरांमध्ये मात्र चर्चा
सतत एकमेकांची करायची !



मते तुझी माझी
कधी ना जुळायची ,

पण वाद घालण्याची
प्रथा ना मोडायची ..!!



अंतरी सल असुनी
स्पर्धा आनंदी दाखविण्याची ,

मनांतरी गरज असुनी
इर्षा श्रेष्ठत्व गाजविण्याची ..!!



काळजी दोघांस लागली
कोंडी कधी कशी सुटावी ?

कुजबुज जनात माजली
लुटुपुटूची प्रेमाची भांडणे असावी ..!!



--- संजय कुलकर्णी.

तुझी आठवण ....


तुझी आठवण ....




नेहमीची शांत हि दुपार

असाच एकाकी मी घरी ,


नेहमीचाच उदास हा प्रहर

तशात आठवावी तू खरी ..!!




का बोलावलेस तुझ्या घरी ?

माहिती असुनी तू पुसशी ,


वेड लावून मला छळायची

सवय तुझी ठाऊक मजशी ..!!




जवळ घेता लटके ढकलशी

जेवलो, हवे मज मुखशुद्धी ,


म्हणताच तू लाजून हळूचशी

चुंबूनी मजला धूम ठोकशी ..!!




तुझ्या संसारी तू गढलेली

व्यापात तुझ्या तू गुंतलेली ,


विसरली असशील प्रेम, घटना घडलेली

आठवली मजला जणु आताच भेटलेली ..!!



-- संजय कुलकर्णी.



सत्य ...


सत्य ...



स्वजन सारे मला फसवून गेले
धडे प्रेमाचे मला ते शिकवून गेले !



सवर्स्व ओतून जीव लाविला मी तयांना
गरज संपता 'तू कोण' मला विचारून गेले !



रीत प्रेम करण्याची ह्यांची ना कळली मला
'माझ्या सखया' म्हणत इतरांसवे मला नाकारून गेले !



जर सुख द्यायचेच न्हवते मला ह्यांना जीवनात
नाद का स्वप्न पाहण्याचे मनाला लावून गेले !



साथीदार सुखाचे दु:ख्खात कोणी ना कुणाचे
सत्य जीवनाचे जाता सरणावरी पटवून गेले ..!!


--- संजय कुलकर्णी .

तु ही ...


तु ही ...



तु ही ...
माझ्या प्रेमात पडताना
असं काही पडावं,
दररोजचं जीवनही तुला
जणु स्वप्नवत वाटावं ..!



तु ही ...
माझ्या सारखी दिनरात
मला भेटण्यासाठी झुरावं,
कामात गुंग दाखवत
अंतरी मनामधे रुसावं ..!



तु ही ..
रात्री बिछान्यावर झोपताना
मम सहवासास्तव तळमळावं,
स्वप्नी मला चुंबताना
जागताच स्वत:वर चिडावं.. !!



तु ही ...
माझ्यावर कधी तरी
कविता लिहिण्यास बसावं,
अन माझ्या नावाशिवाय
काहीही ना सुचावं ..!!


--- संजय कुलकर्णी.

प्रेम मूर्त .. !


प्रेम मूर्त .. !



भावनांस प्रवाहित केलेस तू

मनालाच मोहित केलेस तू !


विराण जीवनात माझ्या जणू

फुलबाग स्वप्नांचे फुलविलेस तू ..!



नाजुक मृदु मुलायम देहास

उन्मत्त स्पर्षांनी चेतविलेस तू


बेधुंद श्वासांनी गंधाळून सर्वांगास

आरक्त अधरामृतास मिळविलेस तू ..!



सांभाळले होते आजवर जे

सर्वस्व माझे जिंकलेस तू


मी तुला वाहिले पावित्र माझे

अभिषेकुनी जीवत्वास प्रेममूर्तास स्थापिले तू ..!!



-- संजय कुलकर्णी.