Popular Posts

Saturday, April 14, 2012

मळवट आनंदाचा ..!!


मळवट आनंदाचा ..!!



मी मुक्तहस्ते मळवट आनंदाचा कपाळी भरला होता
अन जगाच्या आरशात चेहरा स्वत:चा पाहिला होता !


ती आली अन हासून खुदकन निघून गेली
मी गाली तिच्या रंग गुलाबी देखिला होता !


ती द्वार स्व्प्नांगणाचे मजसाठी उघडवून गेली
मी भ्रमर होऊनी कुंजरव तीजभोवती केला होता !


ती वळली पुन्हा वरती वेळावले लटके रागाने
मी संधी साधून हात पटकन पकडला होता !


त्या स्थितीत भांभावून तीचा तोल ढळला होता
मिठीत येताच मधुकंद प्रेमाचा दोघांनी चाखला होता ..!!


-- संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment