Popular Posts

Tuesday, June 21, 2011

ती --- माझी प्रिया ... माझी कविता !




ती मनस्वी, ती हळवी ;

ती हसरी, ती गाणारी !


ती स्वप्नाळू , ती मायाळू ;

ती लाजाळू , ती प्रेमाळू !


ती खोडकर, ती बंडखोर ;

ती संशयखोर , ती भांडखोर !


ती चांदण्यात विहरणारी,

ती पावसात बहरणारी !


ती भावनांनी भिजलेली,

ती आवेशांनी फुललेली !


ती तलवारीची धार,

ती ज्वलंत निखार !


ती प्रीतीचा आविष्कार,

ती क्रांतीचा चमत्कार !


ती मदभरी शृंगारात बेधुंद,

ती सौंदर्याने ओतप्रोत बेबंध !


सहवास तिचा हवाहवासा,

तनमनावर मोरपीस जसा ...!


---संजय कुलकर्णी.

माझे जगणे एक प्रेमगाणे ... !


जगणे माझे एक प्रेमगाणे ....!!



प्रेमाने बोलणे प्रेमासी लुटणे ,

प्रेमाने ऐकणे प्रेमाने भांडणे ,

प्रेम हृदयीचे सर्वांचे स्वीकारणे ,

प्रेम अंतरीचे उधळून देणे ...!



सूर प्रेमाचे मनस्वी गाणे

जगणे माझे एक प्रेमगाणे !


नसेल जरी बंगल्यातून रहाणे

नाही सतत गाडीतून फिरणे !

नसेल दररोज हॉटेलचे खाणे

चिंतामुक्त समाधानी आनंदी जगणे ...!



सूर प्रेमाचे मनस्वी गाणे

जगणे माझे एक प्रेमगाणे !



आपुलकीच्या बंधांनी एकत्र राहणे

कोडं कौतुकात मुलांच्या रमणे

चार भिंतीत सुखदु:ख्खासी वाटणे

मायेने सौख्याने संसार करणे ..!



सूर प्रेमाचे मनस्वी गाणे

जगणे माझे एक प्रेमगाणे !




गतकाळासी का सारखे आठवणे ?

प्रेमास नात्यांतील मनी जपणे !

लपवूनी आसवांसी हास्यास लुटणे ,

हसुनी-खेळूनी आठवणीत उरणे ... !!



सूर प्रेमाचे मनस्वी गाणे

जगणे माझे एक प्रेमगाणे ..!!



जगणे माझे एक प्रेमगाणे ....!!



---संजय कुलकर्णी.


नातं ...अनामिक !




नातं तस जीवनात

कुणाशीही होत असतं ,

पण एखादं नातं

मनात जपलेलं असतं !


सांगता न येतं

जे कुठल्याही शब्दात ,

अडकवता न येतं

ते कुठल्याही बंधनात !


ते असतं केवळ

एक स्वैर मनस्वी ,

अन जोडलेलं असतं

फक्त ह्रुदयाचं ह्रुदयाशी !


डोकावले जरी नकळत

कितीही त्याच्या अंतरंगात ,

तरीही ना उमजत

गहिरेपण नात्याचे जीवनात !


कदाचित समाजाच्या रूढींत

न बसणारं असतं ,

(पण) खास रुजणार मनात

हवंहवंसं वाटणारं असतं !


कदाचित जगाच्या दृष्टीन

असतं क्षुल्लक, कवडीमोल ,

(पण) त्या दोघांच्या दृष्टीन

मात्र एकमेव अनमोल !


असतं ते अंतर्मनात

लपून घर करणारं ,

कधी उदास असताना

आठवणींतून मन रिझविणारं !


जणु बेरंगी जीवनात

हजारो रंग उधळणार ,

खरया अर्थाने जगविणारं

अनोखे अनामिक नातं ...!

---संजय कुलकर्णी.

Tuesday, June 14, 2011

स्वप्न भेटीचे ... सत्यवत जाहले !


सायंकाळी सागर किनारी एकांती ,

भेटायचं मला तिने ठरवलं होतं !

पण बराचवेळ तिची वाट पाहुनि ,

आनंदावर माझ्या विरझण पडलं होतं !


' का आली नाही? ' मनी विचार करता ,

'सत्य' लगेच समोर उभं ठाकलं !

स्वप्नात किती राहशी म्हणता ,

खिजवून मजला छद्मी हसू लागलं !


आशा वेडी स्वप्ने दावते ,

परिस्थिती पासून तुजला दूर लोटते !

स्वप्न कधी सत्यात नुतरते ,

शहाण्या माणसास पार वेड लावते !


अंतर्मनाने सत्यास साफ नाकारले ,

श्रद्धा माझी माणसातल्या आनंदी होण्यावर !

बदलावयाचे परिस्थितीला मी स्वीकारले ,

सर्वस्व अर्पुनी सत्यवत स्वप्नांस आणण्यावर !


तोच आभाळी मेघ दाटले ,

गर्जुनी वार्यासवे रिमझिम बरसू लागले !

उदासपणे होता माघारी जाणे,

मागुन कुणीतरी मजवर छत्र धरिले !


' सॉरी,लेट झाला ' ट्राफिक मध्ये अडकले,

म्हणत तिने छत्रीत जवळ खेचले !

आनंदाने माझी कळी खुलली ,

खरोखर स्वप्नवत अमुची भेट झाली ...!


---संजय कुलकर्णी.


जेव्हा तू मला भेटशील ...!

स्वप्नांचे तुजला पंख फुटतील ,

मनात आशांची किरणे पसरतील ,

नव जीवनाचे वारे वाहतील ,

जेव्हा तू मला भेटशील ...!


जीवनी आनंदाचा बहर येईल ,

बंध प्रेमाचे जुळून येतील ,

दु;ख्खे सारी पळून जातील ,

जेव्हा तू मला भेटशील ...!


अंतरी उत्साहास पूर येईल ,

दिन सौख्याचे पुन्हा येतील ,

वय काळाचे भान भुलशील ,

जेव्हा तू मला भेटशील ...!


शत जन्माचे प्रेम बहरतील ,

मिलनाचे ऋणानुबंध तू जाणशील ,

तृप्त होऊनी आनंदे नाचशील ,

जेव्हा तू मला भेटशील ...!


-- संजय


श्रीकृष्ण -- अमर आत्म-प्रेम स्वरूप ....!

जीवन एक प्रवास आत्म्याचा ,

शरीराद्वारे सुख दु:ख्ख भोगण्याचा !


सुरूच असते येणे जाणे ,

जसे जुने कपडे बदलणे !


नश्वर तन कधीतरी जायचे ,

हृदयी तुझ्या अमरत्व माझे !


तू अन मी एक असताना ,

पुसू नकोस त्या मेघ, किरणांना !


असशील कधी तू एकांती जेव्हा ,

स्मरत रहा मधुर स्मृतींस तेव्हा !


आनंदशील पाहून मज त्या ,

मनोरम हसर्या श्रीकृष्णास !


अविनाशी अनंत विश्वाच्या ह्या ,

अमर आत्म-प्रेम स्वरूपास ...!


----संजय कुलकर्णी.

शिडकावा .... हास्याचा !

वाळवंटातील अफाट निर्जल वाळुत

रणरणत्या उन्हाला तोंड देत

निवडुंगावर देखील उमलतं कधि

एक हसरं टवटवीत फूल !


कासावीस होतो जीव तेंव्हा....

होता शिडकावा अकस्मात हास्याचा

आपण सुद्धा आयुष्यात कधि

बनतो एक हसरं मूल !


चिंता तर जीवनात

दररोज असतात,

संकटे सुद्धा आगंतुक

येतच असतात !


माणूस झुंज देत असतो

वाढत्या अपुल्यावयाबरोबर ,

डोंगरा एवढ्या दु:खाशी

छोट्याश्या हास्याच्या बळावर !


जेंव्हा दिसते विसंगती ,

अपेक्षाभंग अन अतिशयोक्ती !

नकळत तेंव्हा मनी ,

होते विनोदाची निर्मिती !


निरागसतेतून लहान मुलांच्या

मिळतात मिश्कील उत्तरे !

खोडकर वागण्यात आजोबांच्या

खुलतात हास्याची लकीरे !


समाजात अपुल्या अवती भवती

दिसतात कधी गमतीदार वल्ली !

सहज बोलण्यातून करतात कधी

बेमालूम जवळच्यांची अलगद खिल्ली !


खळाळतात कधी संता बंतांच्या

चक्रम अजब गजब करामती

असते कधी राजकारण्यांच्या कोडगेपणावर

मारलेली हळूच कुणीतरी कोपरखळी !


हसवितो कधी बायकांचा धांधरटपणा ,

कधी प्राध्यापकांचा सवयीचा विसराळूपणा !

फिशपॉन्ड्स,शायरीतील काल्पनिक बोचर्या कल्पना ,

तर जुन्या म्हणींतील खोचक शब्दरचना !


कधी उखाण्यातील उपमांचा ,

असतो प्रयत्न चीडविण्याचा !

जगणे सुसह्य करण्याचा ,

आनंदी शिडकावा हास्याचा !!


( ' हास्य ' हे परमेश्वराने निर्मिलेल, दु:खावर शोधलेलं - कालातीत उत्तर आहे ! )


---संजय कुलकर्णी.

Tuesday, June 7, 2011

प्रेम ... जीवन गाणे

प्रेम सुमधुर स्वर असतो,

प्रेमिकांनी आनंदाने छेडायचा असतो !

तालात एकमेकांच्या गायचा असतो

जीवनात सुंदर गुंफायचा असतो ...!



प्रेम म्हणजे गाणं असतं,

मनस्वी भावनांच लेणं असतं !

एकसुरात दोघांनी गायचं असतं,

एकदिलान तल्लीन व्हायचं असतं ...!



स्वप्न्सुरात प्रेम-पहाट जागायची असते

द्वंद्व-गीतात दिनभर अनुभवायची असते !

स्वर-संध्या एकत्र फिरायची असते

शृंगाररसात प्रेम-मैफिल बहरायची असते !



प्रेमात स्वत:स विसरायचं असतं

प्रेमात सरस्व अर्पायचं असतं !

प्रेमात जीवन फुलवायचं असतं

प्रेमात स्वप्नांना साकारायच असतं ...!


---संजय कुलकर्णी.



रीत प्रेमाची ...?

' स्वप्न ' हे तुझ्या हृदयीचे

कवितेतून सुंदर तू दाखविलेले !


साद घालिता मी प्रेमाने

हाय, तुझे मला खुणाविणे !


भान येता तुज परिस्थितीचे

झिडकारुनी सहज मला ठोकरणे !


रीत कोणती हि तुझ्या प्रीतीची

आंस पोहण्याची पण पाण्यास घाबरण्याची !


राग नाही मज तुझ्या नाकारण्याची

चीड आहे तुझ्या विचित्र स्वभावाची !


बदनामुनी मज पुन्हा तसेच वागण्याची ,

स्वप्ने दाखवुनी इतरांस नादी लावण्याची ...!


---संजय कुलकर्णी.

पाउस ... आठवणींचा !

आठवणी तुझ्या ,

धुवादार पावसासारख्या ...!

अचानक गडगडून

तनमनास भिजविणार्या ...!


पाउस गार वार्यांसह

अंग अंग शहारतो ...!

aaus नयनांतून आठवांसह

घळ घळा ओघळतो ...!


दोघेही नकळत

एकांती गाठतात ...!

भान जगाचे

विसरावयास लावतात ...!


कसाही असो मला

पावसाळा खुप आवडतो ...!

सरी वर सरी कोसळताना

आठवांत तुझ्या मोहरून टाकतो ...!


--- संजय कुलकर्णी .

Saturday, June 4, 2011

तळमळ खर्या मित्राची ....




अगदी खरं अन मनातलं सारं सांगायच आहे ,

वाटत आहे असेच तरी गप्प तू बसली आहे !

नेहमी प्रमाणे स्त्री-सुलभ ' मान ' अडवतो आहे ,

चल, शेवटी लहान होऊन मीच माघार घेतो आहे !


स्वार्थ नाही माझा कठोर बोलण्यात ,

सखये हे तुला कधी समजायचे ?

खोट्या फसव्या स्तुती-सुमनांच्या मोह जाळात ,

प्रिये तू स्वत:हून का अडकायचे ?


वागलीस कशीही तरी सांग गप्प कसे मी रहायचे ,

काळजीने तुझ्या दिनरात मी का तळमळायचे ?

जीव गुंतला तुझ्यात तर का असे भांडायचे ,

रुसल्यावर तू , पुन्हा पुन्हा किती मनवायचे ?


भेटतील तुला माझ्याहून कितीतरी गोड गोड बोलणारे ,

नादी लावून प्रलोभनांनी सत्यापासून दूर भरकटविणारे !

लांब इतकी जावू नकोस कि मार्ग परतीचा विसरशील ,

मोल खऱ्या मित्राचे वेळ निघून गेल्यावर जाणशील !


---संजय कुलकर्णी .


Thursday, June 2, 2011

प्रेम द्यावे, प्रेमात जगावे ...!




प्रेम द्यावे, प्रेमात जगावे ;

ना अपेक्षावे, ना रुसावे !

हात देता कुणी प्रेमाने ,

घट्ट तयास धरून ठेवावे !


हक्क ना अपुला मातीवर ,

हक्क ना कधी पाण्यावर !

हक्क ना कुणाचा निसर्गावर ,

जगावे पाहुण्या प्रमाणे आयुष्यभर !


स्वच्छंद उडणार्या फुलपाखरासम असावे ,

झरझर वाहणार्या नदीसम असावे !

स्वत:हून वर्षले कुणी प्रेम तुम्हांवर ,

नाचावे बेधुंदपणे भिजून प्रेम-वर्षावात अनावर !


चेहरा पाडुनी ना रहावे क्षणभर ,

बोलते राहुनी मनमोकळे करावे निरंतर !

शोधावे आनंदास हरेक अनुभवात सर्वांबरोबर ,

शब्द सुचता गावे गीतातून हर्षविभोर ...!


---संजय कुलकर्णी .

एक प्रवास प्रेमळ नात्यांचा ...!




एक प्रवास प्रेमळ नात्यांचा ,

तुझ्या माझ्या सुंदर सख्याचा !

जसा प्रचंड उकाड्यानंतर येणाऱ्या ,

तनमन सुखावणार्या पावसाच्या सरींचा !


पावसाची सर मंद पडून जावी ,

मातीचा सुवास धुंद दरवळून जावी !

पाउस संपल्यावर पुन्हा गरमी वाढावी ,

जशी सहवासाची पुन्हा गरज भासावी ...!


एक प्रवास अकस्मात घडणार्या भेटीचा ,

कौलांवर टपटप पडणार्या गारांच्या नादांचा !

नजरेने भडाभड एकमेकांस मनातील सांगणारा ,

न बोलता स्पर्शता; संपू नये वाटणारा ...!


एक प्रवास सुप्त प्रेमळ भावनांचा ,

सहवासातून मनात अलगद प्रेम फुलविण्याचा !

बोलण्यातून एकमेकांचा नकळत स्वभाव जाणण्याचा ,

भावला तर संसार अन्यथा मैत्री करण्याचा ...!!


---संजय कुलकर्णी.