
जगणे माझे एक प्रेमगाणे ....!!
प्रेमाने बोलणे प्रेमासी लुटणे ,
प्रेमाने ऐकणे प्रेमाने भांडणे ,
प्रेम हृदयीचे सर्वांचे स्वीकारणे ,
प्रेम अंतरीचे उधळून देणे ...!
सूर प्रेमाचे मनस्वी गाणे
जगणे माझे एक प्रेमगाणे !नसेल जरी बंगल्यातून रहाणे
नाही सतत गाडीतून फिरणे !
नसेल दररोज हॉटेलचे खाणे
चिंतामुक्त समाधानी आनंदी जगणे ...!
सूर प्रेमाचे मनस्वी गाणे
जगणे माझे एक प्रेमगाणे !आपुलकीच्या बंधांनी एकत्र राहणे
कोडं कौतुकात मुलांच्या रमणेचार भिंतीत सुखदु:ख्खासी वाटणे
मायेने सौख्याने संसार करणे ..!
सूर प्रेमाचे मनस्वी गाणे
जगणे माझे एक प्रेमगाणे !गतकाळासी का सारखे आठवणे ?
प्रेमास नात्यांतील मनी जपणे !
लपवूनी आसवांसी हास्यास लुटणे ,
हसुनी-खेळूनी आठवणीत उरणे ... !!
सूर प्रेमाचे मनस्वी गाणे
जगणे माझे एक प्रेमगाणे ..!!जगणे माझे एक प्रेमगाणे ....!!
---संजय कुलकर्णी.

No comments:
Post a Comment