Popular Posts

Tuesday, March 29, 2011

जीवन भकास व्हावे किती ... ?



सांग प्रिये तुला मी स्मरावे किती ?

आठवांत तुझ्या निसदिन झुरत मरावे किती ?


तुझ्या प्रीतीचा सखये असे किनारा मी ,

प्रेमाच्या भरती अहोटीस सांग सोसावे किती ?


प्रेमाच्या देण्या घेण्यात असो श्रीमंत किती ,

दारिद्र्यास प्रेम-सुखाच्या सांग भोगावे किती ?


पौर्णिमेच्या चांदण्यांनी आज उदास करावे किती ?

तुझ्या वियोगाच्या दु:ख्खांनी आसवास रोखावे किती ?


मधुर तुझ्या सहवासात आयुष्य स्वप्नमय वाटावे किती ?

अकस्मात तुझ्या जाण्याने जीवन भकास व्हावे किती ?


-----संजय कुलकर्णी.


Monday, March 28, 2011

प्रेमवेडी प्रिया-- जणू राधा...!


'गुलाब-कळी' सम सुंदर दिसते ,

गोड हसुनी खळीत बुडविते !

सदैव आनंदी स्वत: रहाते ,

शृंगारिक प्रेमगीतांनी वेड लाविते !


मधुर बोलांनी मन हर्शविते,

मोहक अदांनी घायाळ करते !

कमनीय सौंदर्याने उन्मादित करते ,

स्वर्गीय सहवासाची आंस लाविते !


सुंदर रूप नयनी ठसते

प्रेमळ मन अंतरी भावते

कोमल शब्द-स्पर्शांचा लळा लाविते

प्रेमवेडी-प्रिया जणू राधा भासते ... !!

--- संजय कुलकर्णी.

प्यार बाटते चलो ...!


है जिन्दगी चार दीन का अफसाना ,

आज है जीना, कला पडेगा जाना !

गम दिलमें छुपाकर,खुशियाँ लुटाते चलो ,

सबको हसाके चलो, प्यार बाटते चलो... !!!


जो बीत गया वो गुजर गया !

याद करके उन लम्हों को ,

दुखो में जिन्दगी को क्यूँ डुबाओ ?

अपने साथ दुसरोंको भी क्यूँ रुलाओं ?


जो बीत गया कुछ उनसे सीखो ,

दुबारा जिन्दगी में उसको ना दोहराओ !

है जिन्दगी भगवान क़ा अनमोल तोहफा ,

खुशियों से सजाकर सबपर आनंद लुटाओ ... !!


सब को हसाके चलो, प्यार बाटते चलो ... !!!

--- संजय कुलकर्णी.

Sunday, March 27, 2011

विनंती ...!


जीव लावून तुझवर

झालो ग मी वेडापिसा !

आरोप करून मजवर

सांग गप्प राहू कसा !!


संपवून अपुले नाते

उधळशी का अता मुक्ताफळे ?

अविश्वासून मम वचनाते

' कोरडे-अश्रू ' का ढाळती द्वयडोळे ?


एकदा तव नयनांतुनी

चांदणे सहजीवनाचे मी पाहिले !

एकदा तव ओठांनी

प्रेमगीत माझे होते गायिले !!


मधाळ तुझ्या बोलण्यांनी

नादावू नकोस कुणालाही ह्यापुढे !

प्रेमभंगाचे दु:ख्ख साहुनी,

आनंदी राहण्याचे सामर्थ्य (मजसारखे) नसेल तयांपुढे ...!!!


--- संजय कुलकर्णी.

दोन तन एक मन !


कसं समजावू सखे मी ग तुला ,

संशय का येतो अजून तुझ्या मना ?

सुंदर फुलांमध्ये दिसलो मी जरी तुला ,

हृदयी बाळगतो गुलाबासम तुज माझ्या सोना !


तुझी माझी ओळख जशी झाली,

ऋणानुबंधाची गांठ वाटे जशी पडली !

'तुझ्या-माझ्या' भावनांची मेळ अशी जुळली,

सर्वांमध्ये तुझ्याशीच ग गट्टी जमली !


नायिका मम कवितांची खरी तू असशी,

प्रेम सुमनांची ओंजळ तयांतुनी मी वाहीशी !

सारी दुनिया मम कवितांची दिवानी असती,

कसे सांगू "स्फूर्ती-देवता" तयांची तूच असशी !


दूर तुझ्यापासून कधी मी नसे ग प्रिया,

तुझ्या भोवताली सतत मन असते ग सोनुल्या !

तुझ्या पासून वेगळा कसा होईल सांग ना ,

दोन तन एक मन अपुले ग प्रियतमा... !!!

---संजय कुलकर्णी.

खरं सांगू , तू प्रेम काय अजून जाणलेसच नाही ... !

टीप:-

कवितेच्या नायकाचे एका अहंकारी मुलीवर प्रेम जडले पण ...

त्यास ती मात्र सतत खेळवत राहते आहे , तिचे प्रेम मोकळेपणा ने व्यक्त करत नाही !

ह्यामुळे त्रासून एके दिवशी तो त्याच्या भावना व्यक्त करतो आहे अशी

हि कविता लिहिण्यामागची कवीची कल्पना आहे !

---------------------------



खूप हट्टी, स्वत:चेच घोडे

सतत पुढे दामटवणारी ,

अविश्वासून माझे म्हणणे

कधी न मानणारी !



स्वत:स वेगळे मानून

कोशात आपल्याच राहणारी ,

अहंकारी पण वरून प्रेमळ,

सात्विक, सुस्वभावी दर्शविणारी !


खरं सांगू , मनमोकळे मजजवळ

कधी तू झालीच नाहीस ,

भावना स्वत:च्या कधी मज

जवळ मुक्त केल्यासच नाहीस !



"प्रेम कि मैत्री" हे कधी

स्पष्ट व्यक्त केलेसच नाहीस ,

हक्काने माझ्यावर रागावण्याचे मात्र

तू कधी सोडलेच नाहीस !


प्रेम अपेक्ष्ण्या आधी स्वत:हून

कधी तू दिलेच नाहीस,

मान्य मला, मुली स्त:हून

प्रेम व्यक्त करीत नाहीत !



पण दुसर्याने व्यक्त केल्यावर

' अधांतरी " कधी वागत नाहीत ,

समोरच्यास कस्पटा समान वागणूक

तुझ्यासाखी कुणी देत नाहीत ... !!


खरं सांगू , तू प्रेम

काय अजून जाणलेसच नाही ... !

---- संजय कुलकर्णी.

नाते तुझे माझे ... !



नाते तुझे माझे ,

अनाकलनीय अमूर्त अवर्णनीय !

घनदाट मेघांस पाहुनी ,

उत्स्फूर्त नाचणार्या मयुरासारखे !!


नाते तुझे माझे ,

हळव्या मनस्वी भाव-विश्वाचे !

एकमेकांपासुनी दूर दिसणारे ,

हृदयी प्रेम 'राधा-कृष्णासम' जपणारे !!


मुलायम तव शब्द-स्पर्शांनी ,

तनमन रोमाचीत करणारे !

अवीट विलोभनीय प्रेमानंदाने ,

आयुष्ये कृतार्थ होणारे ...!!


नाते तुझे माझे ,

जन्मोजन्मी असेच राहू दे !

अबोल अंतरीच्या ओढीने ,

हृदयात अखंड नांदू दे ... !!

---संजय कुलकर्णी.


जिवलग अशी प्रियसखी ती असावी ...!


अशी एक सखी असावी,

पाहता क्षणी मनात भरावी

मनात भरुनी आनंदित करावी

जिवलग सखी ती एकमेव असावी

जीवनाची ती एकमेव दिशा व्हावी !


मन तिच्याच भोवती...

सतत फिरत रहाणारी ...

सर्व तिला सांगितल्याशिवाय...

मन माझे हलके न होणारी !

मनकवडी अशी एक सखी असावी !


चुकल्यास मी,

मम कान धरणारी ...

स्वत:च्या चुका

परी कबूल करणारी...

प्रेमाने समजावणारी,

खुलवून मजला चीडविणारी

हास्याची कारंजी

चेहर्यावर माझ्या फुलविणारी !

जिवलग अशी सखी ती असावी !!


भेटलो ना तर,

आतुरतेने वाट पहाणारी ...

भेटल्या वर मज,

मज बोलू न देणारी ...

कितीही बोलली तरी,

कधी न गप्प बसणारी ...

निरोप घेता डोळे पाणावून,

"पुन्हा कधी भेटशील?"

ते वारं वार मज विचारणारी .... !


जिवलग अशी प्रियसखी ती असावी ...!

--- संजय कुलकर्णी.

निघून गेलो मी, तर काय करशील ?


सांग उठसुठ का मजसी भांडशी ?

हट्टीपणा तू किती ग करशी ?

सहन न होवून तुझे असे वागणे

निघून गेलो मी तर काय करशील ?


दिनरात तू कुणास ग स्मरशील ?

पाहून आरशात कसे ग लाजशील ?

वाट सारखी कुणाची मग बघशील ?

लाडात येवून कुणाशी ग बोलशील ?


एकाकीपण सारखे तुज खायला उठेल,

कातरवेळी आभाळ जसे भरून येईल !

वीज पावसाळ्यात गडगडासह जशी चमकेल

घाबरून तेव्हा सांग कुणास बिलगशील ?



चांदण्यारात्री पौर्णिमेच्या हासर्या चंद्रास पाहुनि

मधुर आठवांत कुणाच्या ग जाशील ?

स्मरून अपुल्या त्या धुंद भेटींना

आसवे एकटीच तेव्हा ढाळत बसशील !


उणीव मम प्रेमाची तुज सतत भासेल

बोल हे माझे तेव्हा तुजला पटतील

गीत नकळत माझे तू जसे गाशील

'प्रेम शब्दातून जाणवून माझे, भेटण्यास व्याकूळ होशील ...!!

---संजय कुलकर्णी.

मैत्री ... " सहजीवनाचं " घरटं ...!


मैत्री तशी सर्वांशी

नेहमी करतो आपण,

तयांतील एखादीच व्यक्ती

जाणते आपले मन !

लपंडाव खेळणार्या श्रावणातल्या

सरींप्रमाणे अकस्मात भेटून,

मुक्तपणे तयाच्या प्रेमात

भिजवून आनंदवते तनमन !


मैत्री म्हणजे न्हवे

एकमेकांना सतत भेटणं,

मैत्री म्हणजे न्हवे

तिन्ही-त्रिकाळ "हाय हेलो" करणं !

मैत्री म्हणजे भावना

एकमेकांच्या स्वत:हून जाणणं,

मैत्री म्हणजे सुख-दु:ख

एकमेकांची स्वत:हून वाटणं !


जाणतो खरे स्वत:ला

मैत्री मुळे आपण,

अन मुक्त करतो

कोषातलं बंदिस्त मन !

मैत्रीतून जन्मते कधी

निखळ प्रेमाचं रोपटं,

जीवनात फुलविते दोघांच्याही

नकळतपणे " सहजीवनाचं " घरटं ...!!

--- संजय कुलकर्णी.

देवा, सांग किती समजवायचं ?

देवा, सांग किती समजवायचं ?

विदुषक बनुन सतत हसतमुख राहायचं ,

आनंदी सर्वांना नेहमी कसं दाखवायचं

मन दु:ख्खी असलं तरी हास्य ,

चेहर्यावर सदैव कसं मी दाखवायचं ?



चेहरा बघून माझा पाहणारा हसला,

हास्यात माझ्या दु:ख्ख स्वत:चे भुलला !

जीवन 'सुख-दुख्खांचा' लपंडाव विसरून गेला,

सत्य जीवनाचे तयास कसं रे समजायचं ?


मित्रांच्या मैफिलीत मी स्वत:ला विसरायचं,

एकाकीपण लपवून स्वत:स 'मित्र-प्रिय' दर्शवायचं ?

आठवांत तिच्या आसवांस मी रोखायचं,

अभागीपण माझे हसून किती भोगायचं ?


हृदयीच्या व्यथांस आनंदाने मी गायचं,

मनातलं कधी ओठांवरी ना आणायचं !

दु:ख्ख भोगल्याशिवाय सुख, मिळत नाही म्हणायचं,

स्वत:च्याच मनास देवा, सांग किती समजवायचं... ?


--- संजय कुलकर्णी.

आनंदकंद मम काव्याचा ... तू !


आनंदकंद मम काव्याचा ... तू !

मनमोहना कृष्णसख्या मनरंजना ... तू

जिवलगा मम आत्मानंदा ... तू

नयनाच्या निरंजना परमानंदा ... तू

सुखनिधान मम जीवनानंदा ... तू !


मम हृदयीच्या अंतरात ... तू

अफाट विस्तीर्ण अंतराळात ... तू

चंचल मनाच्या गाभार्यात ... तू

विराट विश्वाच्या पसाऱ्यात ... तू !


मात-पिता सर्व बांधवात ... तू

मम आप्त स्वकीयात ... तू

प्रेमळ मित्र गणात ... तू

मम प्रिय सख्यात ... तू !


कार्य प्रेषिता मजला ... तू

'कर्ता-करविता' मम कार्याचा ... तू

शिकविणारा गुरु मजला ... तू

यशवंता मम भाग्याचा ... तू !


मम काव्यातील भावनात ... तू

उत्स्फूर्त निर्मळ प्रेमरसात ... तू

प्रेमसुगंध तयांतून फुलविणारा ... तू

आनंदकंद मम काव्याचा ... तू !!!


---संजय कुलकर्णी

तू ...

तू ...

तू ... माझ्या पेमाची पहाट !

तू ... माझ्या स्वप्नांची लाट !


तू ...गतजन्माची अधुरी साथ !

तू ...माझी ऋणानुबंधाची गाठ !


तू ... आत्म्याची आर्त साद !

तू ... अंतर्मनाचा धुंद नाद !


तू ... एकांतातील मधूर आठव !

तू ... गीतातील प्रेमळ साठव !


तू ... माझ्या मनातले भावतरंग !

तू ... माझ्या व्यक्तित्वाचे अंतरंग !


तू ... माझ्या आनंदाचे रहस्य !

तू ... माझ्या चेहऱ्यावरील हास्य !


तू ... माझ्या जगण्याची आस !

तू ... माझ्या भविष्याची कास !


तू ... निर्मिले माझे प्रेम-विश्व !

तू ... व्यापिले माझे जीवन-विश्व !


--- संजय कुलकर्णी.