देवा, सांग किती समजवायचं ?
विदुषक बनुन सतत हसतमुख राहायचं ,
आनंदी सर्वांना नेहमी कसं दाखवायचं
मन दु:ख्खी असलं तरी हास्य ,
चेहर्यावर सदैव कसं मी दाखवायचं ?
चेहरा बघून माझा पाहणारा हसला,
हास्यात माझ्या दु:ख्ख स्वत:चे भुलला !
जीवन 'सुख-दुख्खांचा' लपंडाव विसरून गेला,
सत्य जीवनाचे तयास कसं रे समजायचं ?
मित्रांच्या मैफिलीत मी स्वत:ला विसरायचं,
एकाकीपण लपवून स्वत:स 'मित्र-प्रिय' दर्शवायचं ?
आठवांत तिच्या आसवांस मी रोखायचं,
अभागीपण माझे हसून किती भोगायचं ?
हृदयीच्या व्यथांस आनंदाने मी गायचं,
मनातलं कधी ओठांवरी ना आणायचं !
दु:ख्ख भोगल्याशिवाय सुख, मिळत नाही म्हणायचं,
स्वत:च्याच मनास देवा, सांग किती समजवायचं... ?
--- संजय कुलकर्णी.
No comments:
Post a Comment