Popular Posts

Monday, March 28, 2011

प्रेमवेडी प्रिया-- जणू राधा...!


'गुलाब-कळी' सम सुंदर दिसते ,

गोड हसुनी खळीत बुडविते !

सदैव आनंदी स्वत: रहाते ,

शृंगारिक प्रेमगीतांनी वेड लाविते !


मधुर बोलांनी मन हर्शविते,

मोहक अदांनी घायाळ करते !

कमनीय सौंदर्याने उन्मादित करते ,

स्वर्गीय सहवासाची आंस लाविते !


सुंदर रूप नयनी ठसते

प्रेमळ मन अंतरी भावते

कोमल शब्द-स्पर्शांचा लळा लाविते

प्रेमवेडी-प्रिया जणू राधा भासते ... !!

--- संजय कुलकर्णी.

1 comment:

  1. सुंदर रूप नयनी ठसते

    प्रेमळ मन अंतरी भावते
    ............
    व्वा ! सुंदर !

    ReplyDelete