Popular Posts

Saturday, April 30, 2011

बरसात अमृतधारांची ... !!




काल राती न्हाऊन शयनगृही

अशी तू आली ,

केस मोकळे घेऊन पाठीवर

टप टपत पाणी !



चेहरा नितळ अन त्यावर

जल-बिंदूचे मोती ,

भासली जणू माझ्या घरी,

जलपरीच तू आली !



लांब सडक केस झाड्ले तुझे

पाहत मज दर्पणी ,

वेधले लक्ष माझे तुषार जसे,

चार पडले चेहर्यावरी !



चीडवलेस जव मजला तू

वेडावून दाखवत हांसुनी ,

कडाडून गर्जले मेघ नभी

घाबरावीत तुज अंतर्मनी !



बंद करू जाता गवाक्ष

मी झडकरी ,

नजर आपसूक खिळली तव

कमनीय बांध्यावरी !



ओष्ठ दाबत हंसून मज

प्रोत्साहित तू लाजली ,

आकाशी तत्क्षणी हाय कशी

वीज भयानक कडाडली !



दचकून आवाजाने घाबरून मज

अशी तू बिलगली ,

मदन वीज जणू निमिषार्धात

अंगी मम संचारली !



प्रेम-भारीत मेघांची जशी

मधुर भेट झाली ,

अमृतधारांची बरसात करून तृप्त धरा

कुशीत शांत निजली ... !!



--- संजय कुलकर्णी.


Wednesday, April 27, 2011

तू राधा होणे अशक्य आहे ...!




समजू नकोस तू मज विसरणे शक्य आहे

जखम भरली तरी व्रण लपविणे अशक्य आहे !


भेट टाळणे तुला आज जरी शक्य आहे

मनातून घालविणे मला तुजला सदैव अशक्य आहे !


हसर्या चेहऱ्याने जगास आनंदित दर्शविणे शक्य आहे

अंतरीच्या दुख्खास तुला एकांती थोपविणे अशक्य आहे !


प्रेम न्हवते तुझ्यावर सांगणे सहज शक्य आहे

पाहता गुलाबास तू वचनास विसरणे अशक्य आहे !


फसवून मजला तू सुखात जगणे शक्य आहे

स्वप्नातही कधी तू राधा होणे अशक्य आहे ...!!!


---संजय कुलकर्णी.


मैत्री अपुली ... !




सखे, आठवण येता तुझी,

मन माझे उदास होत !

आनंदाने भरलेल्या जीवनात सुद्धा,

काहीतरी 'उण' वाटत रहात !



तुझ्या बरोबरचे ते क्षण,

पुन्हा मज अनुभवावेसे वाटतात !

लख्ख मोकळ्या मनात माझ्या,

मैत्रीचे ढग दाटून येतात !

मैत्री अपुली अशीच होती

रखरखीत दु:ख्खाची उन्हे जाऊन

निर्मळ प्रेमाची घनदाट छाया

दोघांच्याही जीवनात आली होती !


त्या रमणीय अपुल्या सर्व क्षणांची

उजळणी आजही मी मनी करतो,

रोजच्या संसाराच्या धावपळीत हि,

हृदयात दडवून मी 'जपून' ठेवतो !


नातं आपल्या "राधा-कृष्णी" मैत्रीचे

मनी माझ्या आजन्म राहील !

आठवण येता कधी माझी तुला

डोळ्यात हमखास माझ्याही पाणी येईल ...!!!


--- संजय कुलकर्णी

Tuesday, April 26, 2011

ओलेती अप्सरा ... !


ओलेती अप्सरा ..!!


दररोज उगवते तशीच आजची सकाळ होती ..
पण मला मात्र सुंदर प्रसन्न वाटली !!

कारण खिडकीतून समोरच्या बाल्कनीत एक परी ..
कोवळ्या उन्हात केस वाळवताना मला दिसली !!



सकाळची उन्हे खिडकीतून चेहर्यावर पडत होती ..
ती आल्याचे मला जणू खुणवत होती ..!!

ओलेती , आळस देत खुर्चीवर ती बसलेली ..
जणू आनंदी दिवसाच्या शुभेच्छा देतेशी भासली ..!!



कुतूहलाने मधेच ती चाहूल घेत होती ..
पडद्याआडून नजर माझी तिला न्याहाळीत होती ..!!

लांबसडक केसातील गुंता हळूवारपणे सोडवत होती ..
मोहक रुपात मजला तिच्यात गुंतवत होती ..!!



क्षणभरात कुठूनशी अचानक वार्याची झुळूक आली ..
पडदा सरकवत चेहरा तिचा दाखवून गेली ..!!

निमिषार्धात लाजत सावरत, हासून पळून गेली ,
अन छबी ओलेत्या अप्सरेची मनी भरून गेली ... !!!


--- संजय कुलकर्णी.



Monday, April 25, 2011

काय आवडले तुम्हास माझ्यात ? ( एक न सुटणारे कोडं ...! )




कधी अन कसे जडले,

प्रेम तुझ्यावर मी केले !

मन नकळत कसे गुंतले,

मलाच कधी न समजले !



दिसलीस ना कधी जर

तू मला प्रिये दिवसभर,

सहज सोप्या कामात खरोखर

चुका घडती बघ मणभर !



बोललीस ना कधी जर

माझ्याशी सखये तू दिनभर,

वाटू लागते मनात क्षणोक्षण

मज कसली तरी हुरहूर !



जवळ येता कधी लाडात

करशी मज तू निरुत्तर !

काय आवडले तुम्हास माझ्यात ?

सांगा ना गडे एकवार !



शोधतो आहे तयाचेच उत्तर .,

जागून तव मिठीत रात्रभर !

तृषार्त मी अजून खरोखर

काय देऊ ह्याचे उत्तर...!!!



--- संजय कुलकर्णी.

तो इशारा ... !



तो ' इशारा ' नयनांचा; मज बरेच सांगून गेला,

हासर्या गालावरील खळीत; मज पुरता गुंतवून गेला !


जवळ घेता तुझे ; " इश्य्य,जा तिकडे " बरेच खुणवून गेला,

आरक्त स्पर्ष तुझा ; मम 'रोम-रोम' फुलवून गेला !


" लाजतेस का ? " असा पुसण्याचा ; खास बहाणा मी केला,

रंग गुलाबी तव ओठांचा ; अधरांवरी माझ्या चढवून गेला !


मदमस्त बेहोष रात्री; बेधुंद श्वास जसा झाला,

भिजवून तनमन सारे; तृप्ततेने आसमंत शांत झाला ...!!!


---संजय कुलकर्णी.

Friday, April 22, 2011

तू साथ देशील ना ...



माझ्या प्रत्येक कृतीमध्ये असतो

तुझ्याच आनंदाचा ध्यास

समजून त्यास तू घेशील ना ...?

तू अशीच मला स्फूर्ती देत रहाशील ना ...?


मान्य मला माझ्याकडून घडतात काही चुका

प्रेमळ पणाने माफ करून मजला

तू सुधारण्यास मदत करशील ना ?

तू माझी खरी मार्गदर्शिका होशील ना ...?


जीवनात असती मला भरपूर सखया-सखे

त्यातील बरेच केवळ खुशमस्करे

तयाहून तू वेगळी वागशील ना ?

टीकेबरोबर कधीतरी मजला वाखाणशील ना ...?


एकटेच येतो अन एकटेच जातात सर्वजण

ठाऊक मजला हे जीवनाचे तत्व !

ह्या प्रवासात माझी "खरी मैत्रीण" होशील ना ?

"मैत्र" निभाऊन आयुष्यभर जन्मोजन्मी मज भेटशील ना ...?


--- संजय कुलकर्णी.

Tuesday, April 12, 2011

जन्मोजन्मीच्या भेटा ...!



ध्यानीमनी नसताना

सहज पडते गांठ !

दररोज पाहताना

वाटते ऋणानुबंधाची खूणगांठ !


नयनांच्या संवादातून

लागते अनामिक आंस !

आवड-निवडीच्या संयोगातून

सतत भेटण्याची प्यास !


एकमेकांच्या सहवासात

सुरु होतो मैत्रीचा प्रवास !

वाढत्या अपेक्षात

होतो मग प्रेमाचा अट्टहास !


ओढ खरी तर

जुळतील एकमेकांच्या वाटा !

प्रेम खरे तर

होतील जन्मोजन्मीच्या भेटा...!!!


--- संजय कुलकर्णी.

जिव्हाळा ... माझ्या-तुझ्या मैत्रिचा !



माझ्या-तुझ्या मैत्रिचा,

अतूट असा जिव्हाळा !

उन्हाळ्यातही मन हर्शविणारा,

जणू सुखद हिवाळा !

तुझी माझी मैत्री ,

न समजे कुणाला !

मनी दडविलेल्या आठवणींचा,

जणू गुप्त खजाना !


तुझी माझी मैत्री

नसे केवळ दिखावा,

स्नेह-बंध असे अपुल्या

मैत्रीचा सबसे निराळा !


तुझ्या माझ्या सुंदर मैत्रीला ,

भासला कधी न वयाचा अडथळा !

प्रेम अन आपुलकी - आधार जाणला

मनस्वी अन खरया - अपुल्या मैत्रीला !


--- संजय कुलकर्णी.


मदधुंद 'रात'राणी ...!



आठवते अजूनही मज प्रिये

ती मदधुंद रात साजणी !
रोम रोम उन्मादुंनी सखये
गंधाळते तनमन फुलता रातराणी !


स्मरते अजून मोकळ्या बाकावरचे
एकमेकांना घट्ट चिकटून बसणे !
चेहर्यावरचे ते मधुर लाजणे
परी अंतरातून स्पर्शासि अधीरणे !


साथ देशील का जीवनभराची ?
हात हाती घेवून मजला पुसणे !
अधरांवरी अलगद ओठ ठेवुनी
देताच संमती तुझे घट्ट बिलगणे !

---संजय कुलकर्णी.


Saturday, April 9, 2011

संदेश शुभेच्छाचां ....?


सारं काही संपलय, असं वाटत असताना ,

'नव-वर्षाच्या' शुभेच्छा देणारा, तुझा संदेश येतो !


मन माझं दुखवून पुन्हा शुभेच्छा देण्याच्या ,

तुझ्या उद्देशाचा संशय मनात घोळत रहातो !


प्रेम न्हवतं माझं तुझ्यावर, गैरसमज तूच करून घेतलस !

क्षणात मजला सांगून असं , जगावेगळ नातं अपुलं संपवलस !


विचार नाही तेव्हा केलास, फसवून स्वत:च्या तू अंतर्मनास

वदलेल्या त्या कठोर शब्दांन, जीवनात दुख्ख किती भरलस !


सुखात राहो किंवा दुख्खात, तुला काय करायचं ?

कारणच काय अता तुला , शुभेच्छा संदेश पाठवायचं ?


---संजय कुलकर्णी.


मोहे सम्भालों घनश्याम तुम गिरिधारी ... !




गोकुल वासी श्री कृष्ण मुरारी,

तीनोही काल तेरी महिमा न्यारी !



हारेहुवों पर कृपा दृष्टी तुम्हारी,

संसार में एक तुमही कष्टहारी !



आया शरण मै अब तुम्हारी,

जीवन उद्धारो प्रभु मर्जी तुम्हारी !


आस बुझाओ दर्शन की हमारी ,

मन में बसे मूरत तुम्हारी !



हर पल सुमिरन करू तुम्हारी,

बाते करू तो प्यारी तुम्हारी !



सांवली सूरत बड़ी प्यारी तुम्हारी,

प्रियसखा हमारे तुम श्रीकृष्ण हरी !



मायामोह में झपेटे हम संसारी,

मोहे सम्भालों घनश्याम तुम गिरिधारी ... !



---संजय कुलकर्णी.