Popular Posts

Wednesday, February 23, 2011

प्रेम जन्मोजन्मीचे ...!

प्रेम जन्मोजन्मीचे ...!



उदास अशी होऊ नकोस,

निराश जीवनी राहू नकोस,

मम प्रेम नाही तुझवर असे ,

व्यर्थ मनी तू आणू नकोस !


भेटण्यास अशी तळमळू नकोस,

मम भासांनी हताश होवू नकोस,

नित्य वसे हृदयी मी तुझ्या,

इकडे तिकडे मज शोधू नकोस !


पाहून आरशात सारखे नटू नकोस ,

उगाच असे स्वत:स रंगवू नकोस,

प्रेम करतो मी तव आत्म्यावर,

शाररीक त्यास तू मानू नकोस !


शंकुनी मजवर व्यथीत होऊ नकोस ,

न झाले मिलन ह्या जन्मी तरी ,

अंतरी प्रेम मजवरी असेच करुनी ,

भेटण्यास पुढील जन्मी विसरू नकोस !!!

---संजय कुलकर्णी.

सच्चे प्रेम ...!

सच्चे प्रेम ...!



समोर नसूनही तुझे चित्र मी काढू शकतो ,

दूर राहूनहि तुझी हालहवाल समजू शकतो !

प्रेमात माझ्या इतकी आत्मीयता आहे कि

प्रेम तुझे मम हृदयातूनी जाणु शकतो !


तरीसुद्धा पाहता प्रेमी युगुलांस एकत्रपणे,

भेटण्यास तुज मन व्याकुळ होते !

नकळत मम डोळ्यात अश्रू दाटते ,

अन आठवणीने तुझ्या उदासीनता येते !



विरहात बुडून देवाकडे मरणही मागितले ,

हतबलता दर्शवित देव मजला वदले ...

"अरे, केव्हाच मजकडून तव प्रियेने

तुझ्या उदंड आयुष्याचे आशीर्वाद घेतले " !

---संजय कुलकर्णी.

कवी व प्रेम कविता ... !

कवी व

प्रेम कविता ... !



कहाणी माझ्या प्रेमाची कधी,

अंतरातून विसरली जाणार नाही !

व्यथा मम अधुर्या प्रेमाची ,

शब्दात सांगता येणार नाही !


जर फसविले नसते कोणी,

तर झाला नसता कवी कोणी !

अन लिहिल्या नसत्या कविता कोणी,

जर आठविल्या नसत्या तिच्या आठवणी !


असे म्हणतात कि, प्रेम केले ज्यांनी कोणी,

त्यांनाच समजतात, लिहिल्या प्रेमकविता जर कोणी !

वय वाढले तरी असतो जो मनातून प्रेमी,

पाहताच सुंदर ललना गाईल तोच प्रेम गाणी... !!

---संजय कुलकर्णी.

महत्वाची टीप :-

कोणी फसविले तरच कवी होतो

हे मला सुद्धा पटत नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे .

दिवास्वप्न... !!!

दिवास्वप्न... !!!



चालत असता माझ्या वाटेने ,

अचानक ती समोरून आली !

मान वळवून हंसून मजला,

विचारात तिच्या गुंतवून गेली !


का पाहिले? का बरे हंसली ?

काय असे मनात तिच्या ?

अनेक प्रश्न टाकून मजला ,

निमुटपणे ती निघून गेली !


शांत मनी मी जगत असतां,

घोर मनाला लावून गेली !

अमावस्ये परी जीवनात माझ्या

पौर्णिमेचा चंद्र उगवून गेली !


पुन्हा पुन्हा मनी आठवत तिजला

प्रेम कहाणी माझी सुरु झाली !

मिटल्या नयनी आलिंगुनी मज ती

हळूच चुंबूनी दिवास्वप्न दाखवून गेली !!

---संजय कुलकर्णी .

प्रदर्शन प्रेमाचे तू करू नकोस ...!


प्रदर्शन प्रेमाचे तू करू नकोस ...!


मनस्वी अपुल्या प्रेमाची वाच्यता

सगळीकडे तू करू नकोस !

उत्कट सुंदर प्रेम अपुले

उफाळून ओठांवरी आणू नकोस !!


शब्दातूनच कळते का रे

मज प्रेम तुझ्या मनातले ?

नयनातून मला जे जाणवले

प्रेमळा, जगजाहीर करू नकोस !!


हळुवार स्पर्शाच्या धुंद समाधीतून

अचानक असे जागवू नकोस !

सात्विक निर्मळ तुझ्या सहवासातून ,

वासनिक भडकता आणू नकोस !!


शुद्ध आनंदी प्रेमास अपुल्या,

वाचाळूनी दृष्ट लावून घेवू नकोस !

मधुर मधाळ अपुल्या मनोमिलनाचे

उगाच प्रदर्शन करू नकोस... !!!


--- संजय कुलकर्णी.


तू .... संजीवनी मम जीवनाची !!!

तू ....

संजीवनी मम जीवनाची !!!



एकाकी जीवनात माझ्या

अचानक तू आलीस,

अन उदास मनात

प्रीतीची आंस जागवलीस !


शांत रात्रीच्या अंधारात

चांदणे स्वप्नांची उगवलीस !

पहाटेच्या गुलाबी थंडीत

आठवांची उब झालीस !


प्रेमाचे सूर आळवुनी

प्रीती गीत तू गाईलेस !

संसाराचे सुंदर मनोरे

मनी पुन्हा तू उभारलेस !


दु:ख्खी माझ्या चेहर्यावर

हास्य तू फुलविलेस !

जीवनी माझ्या येवूनी

आनंदाने जगण्यास शिकविलेस !


जीवनसाथी होण्याचे ठरवुनी तू

एकाकीपण क्षणात घालविलेस !

मम मरगळलेल्या जीवास तू

जणू संजीवन पाजलेस... !

--- संजय कुलकर्णी.

साद प्रियकराची !



प्रेम माझे तुझ्यावरी,

हृदयातूनी तू जाण प्रिये !

साद घालतो मनापासुनी,

अंतरातूनी तू पडसाद दे !


जुळती विचार अपुले,

आवड निवडही एक जुळे !

मिसळूनी सूर माझ्यात,

प्रेमगीत तू गा सखये !


दूर जरी तुझ्यापासोनी,

मनी मात्र तूच वसे !

भेटण्यास त्वरित येवोनी,

"विरह-आग" विझव जिवलगे !


अर्धांगिनी मम होवुनी,

संसार मजसवे मांड गडे !

"प्रेम-सागरात" चिंब भिजोनी,

जीवनी 'प्रीती-फुले" फुलव सजणे...!

--- संजय कुलकर्णी.

झुठे प्रेम ...!



कशाला फिरायचे मी

दूर एकटेच अंधारात,

कशाला पहायचे मी

चांदणी सवे चंद्रास !


का बुडायचे गतकाळात

पाहून धुंद रातराणीस,

का भिजायचे आसवात

स्मरून तुझ्या आठवांस !


सोडली मी वाट

ती गूढ धुक्याची,

सोडिली मी गाठ

तुझ्या झूठ वचनांची !


फाडीली वही केव्हाच

तुजवर लिहिलेल्या कवितांची,

जगतो सुखाने अता

संवादित माझ्या मनाशी... !!!

---संजय कुलकर्णी.

आंस मिलनाची ...



आंस मिलनाची ...




गोड हसत मोहून मजकडे ,

नेत्र कटाक्ष तू टाकले !

कसे सांगू तुज सखया ,

मनात माझ्या काय झाले !



उधाण यौवनाचे मनी उसळे ,

उफाळलेल्या भावनांस आवरू कैसे ?

जादुई स्पर्शास अंतरी आसुसले ,

शांतव मिठीत एकरूप जैसे !



रंग प्रीतीचे हृदयी फुलती ,

स्मरता तुज सखया राती !

माळूनी गजरा तुझ्या मीलनी

वाट पहात प्रिया तरसती !



थरथरे देह अकस्मात पहाटी ,

स्वप्नी येवूनी जसे चुंबसी !

कैफ मिलनाचा अधुरा परी

आंस लावूनी स्वप्न भंगती ...!!



--- संजय कुलकर्णी.




कृष्ण... मम प्रियसखा !



हे लाडक्या कृष्णसख्या,

गोप गोपिकांच्या सुहृदया !

देवकी नंदाच्या परमानंदा

राधेरमणा 'वसुदेव-यशोदा' नंदना !


कितीही युगे जरी लोटली,

हे कन्हैया तुजला अवतारुनी !

जन्म झाले किती माझेही,

साथ मानतो तुझी जन्म-जन्मांतरीची !


येवोत दिन कसेही ह्या जीवनी,

साथ तुझीच रे मला अंतरी !

पूजा, कर्म-कांड मी ना करी ,

केवळ प्रेम करतो मी तुजवरी !


परी पेंद्या-सुदाम्याची जशी,

"सख्य-भक्ती" माझी तशी !

देवू नको मला तू काहीही,

अंतरु नकोस मज कधीहि... !!!

---संजय कुलकर्णी.

पौर्णिमेचा चंद्र...!



धुंद निरव रात्रीच्या

ह्या शांततेत प्रिये ,

बघ चंद्र पौर्णिमेचा

रमला कसा चांदण्यांसवे !


मंद रातराणी सुगंध त्यात ,

मद मस्त करीतसे मनास !

आरक्त एकाकी प्रहरी अशात

आठवण तुझी येतसे खास !


स्मरीत सुगंधित श्वास तुझे,

मन इथे माझे झुरते !

मृदू स्पर्शाचे आठवीत चांदणे ,

तव मिलनाची आंस लावते !


अमृतमय तुझ्या सहवासाचे,

चांदणे अंतरी फुलवून जा !

प्रणायातूर पौर्णिमेत प्रिये,

भेटून चंद्रासम बहरवून जा ... !

---संजय कुलकर्णी.

प्रेम कर...

कृष्णाच्या राधे सारखं !

प्रेम कर

पहाटेस जागवणार्या..

गोड भूपाळी सारखं !

प्रेम कर

मन धुंद करणार्या...

मोगर्याच्या फुलासारखं !

प्रेम कर

मनात रुणझुणणार्या..

नादमधुर घुंगरासारखं !

प्रेम कर

मायाळू मातेच्या...

प्रेमळ वात्सल्ल्यासारखं !

प्रेम कर

वरून कठोर पण...

अंतर्यामी हळव्या पित्यासारखं !

प्रेम कर

पावसाच्या सरीनंतर...

येणार्या मातीच्या सुवासासारखं !

प्रेम कर

मन उल्हासवून ...

भिजविणार्या श्रावण सरींसारखं !

प्रेम कर

मेघ पाहून ...

उत्स्फूर्त नाचणार्या मोरासारखं !

प्रेम कर

कृष्णाच्या भक्तिस्तव

विष प्राश्णार्या मीरेसारखं !

प्रेम कर

कृष्णाच्या राधेसारखं...

दोन जीव एक प्राणांसारखं !!!

--- संजय कुलकर्णी.

प्रेम करतो मी प्रेम... !

वृक्ष लतांवर, पशु पक्षांवर !

बाल वृद्धांवर, युवा तरुणांवर !

हंसर्या आनंदी, सर्व ललनांवर !

सर्वांमध्ये दिसणार्या, कृष्ण-कन्हैयावर !

प्रेम करतो मी तुम्हा सर्वांवर !!


निर्मिली वसुंधरा इतकी सुंदर !

पहाड डोंगर, नद्या सरोवर !

विराण वाळवंट, निळे सागर !

पाहुनी हर्षे मन खरोखर !

प्रेम करतो मी धरणी-मातेवर !!


लपवून दु:ख्ख अपुल्या हृदयांत !

वाटिती सुख सर्व जनांत !

दाबुनी हुंदका अपुल्या मनांत !

दर्शविती जे आनंद चेहर्यावर !

प्रेम करतो मी त्या माणसातील देवावर !!


लिहूनी प्रेम कविता दिनभर !

करतो जागृत सर्वांमनी प्रेमांकुर !

विसरवून दु:ख्ख विश्वासण्यास स्वप्नांवर !

सांगतो मी प्रेम करण्या जीवनावर !

हां, प्रेम करतो मी आनंदी तुम्हांवर !!

--- संजय कुलकर्णी .

सौंदर्य... !

सौंदर्य असते निसर्गात,

असते निरागस बालकात !

गाठते परीसीमा तारुण्यात,

खुलते मनामध्ये वार्धक्यात !



सौंदर्य दिसते पाहण्यात,

दिसते तुमच्या बोलण्यात !

सौंदर्य दिसते लिखाणात,

दिसते तुमच्या विचारात !


निसर्गदत्त सौंदर्याच्या ह्या आविष्कारास ,

लपवू नये स्वत:च्याच कोशात !

उधळा मुक्तपणे सौंदर्य जनात

आनंदावे पाहुनी सौंदर्याच्य स्तुती-सुमनास !!!

---संजय कुलकर्णी.

जीवन - प्रवास आनंदाचा... !!!

आनंद जीवनाचा सदैव इतरांमध्ये लुटावा ,

काट्यांतील गुलाबासम मोहरून सर्वास सुगंधावा !


अर्धा भरलेला प्याला जरी सुखाचा,

संपूर्ण भरलेला असतो का कुणाचा !


अकस्मात जाती तयांचा शोक किती करावा ?

शोध नाविन्याचा पुन्हा का न करावा ?


ऋणानुबंध जितुके सहवास तितुकाच समजावा,

नव-सहवासात पुन्हा जीवनी आनंद मिळवावा !


उजळवून दिपकाने जसे दुसर्यास प्रकाश द्यावा,

लुटून सुख आनंदाने प्रवास आयुष्याचा करावा !

---संजय कुलकर्णी.

प्रेम कहाणीस प्रिये ...

यशस्वी करून तर बघ !!!


नजरेस माझ्या नजर

देवून तर बघ !

प्रतिबिंब स्वत:चे तयात

पाहून तर बघ !

अंतर्मनात तुझ्या एकदा

डोकावून तर बघ !

अस्तित्व माझे तयातले

पाहून तर बघ !

भावना माझ्या हृदयी

जाणून तर बघ !

स्वच्छ मन माझे

आजमावून तर बघ !

मला टाळणे तुला

जमते का बघ !

फसवून स्वत:च्या मनाला

जगून तर बघ !

मनस्वी प्रेम मजसारखे

करून तर बघ !

तन मन मजसारखे

अर्पून तर बघ !

सखे,वचनांवर माझ्या

विश्वासून तर बघ !

प्रेम कहाणीस प्रिये ...

यशस्वी करून तर बघ... !!!

--- संजय कुलकर्णी.