Popular Posts

Thursday, December 15, 2011

साथ जन्मभराची ...


साथ जन्मभराची ...




भावनांस शब्दांच्या दाद दे
काव्य माझे वाचल्यावर ,


प्रेमास हृदयीच्या साद दे
मन माझे जाणल्यावर !


अंतरबाह्य मला समजून घे
मनात मला वसविल्यावर ,


साथ मला जन्मभराची दे
जोडीदार मला मानल्यावर ...!!


--- संजय .

मन माझं ...


मन माझं ...



मन माझं असलं तरी
तुझ्याच विचारात सतत असतं ..



जीव माझा असला तरी
तुझ्यात खरंच गुंतलेलं असतं ,



तू खुलणार म्हणून तर
प्रत्येक चारोळी तुला ऐकवतो ..



तू न वाचल्यावर मात्र
चारोळीतील शब्दांबरोबर उदास होतो !!



--- संजय .

समाधी ...!



वेगळ्याच इशार्यांनी डोळ्यांनी खुणवताना

हसले गालातून खळ्यात गुंतवताना

लाजले विनाकारण मिठीत जाताना

हर्षले अंतरातून ओठांस जुळताना ..!!




शिरले कुशीत रोमांचित होताना

अबोल शब्दांनी स्पर्षांनी बोलताना

अधीर मनाने बंद-कवाड खुलताना

आरक्त तनांनी उन्मत्त झोंबताना ..!!




रती तालावर मदन डोलताना

वेणू सुरावर एकत्र झुलताना

कापूर कायांनी शांतवून विरताना

लागली समाधी कोंबडा आरवताना ...!!



--- संजय कुलकर्णी .

प्रेमास साकारणे ...!!


प्रेमास साकारणे ...!!



छंद आहे मला
प्रेमात तुझ्या पागल होण्याचा ,
सवय आहे तुला
नाकारून मला नादी लावण्याचा !



ना भेटणे लिहिणे
क़ा तरी असे शोधणे ,
पाहिल्यावर एकमेकांसी मात्र
क़ा बरे अनोळखी वागणे !



खट्याळ खोचक नजरेने
मुद्दामून तिरकस तुझे बोलणे ,
गप्प राहिल्यावर ऐकवणे
सहजच चीडविणारे तुझे टोमणे !



नाही म्हणायला समोर आल्यावर
हासून दिलखेचक पाहणे ,
दु:ख्ख मनातले ना सांगणारे
रोखून मनवेधक बहाणे !


रागावल्यावर नेहमीची तुझी
लाडीगोडी अन साखर पेरणी ,
दुराव्यात रुजली माझी
अबोल प्रीतीची अमर कहाणी !



तुला ना कळले मला ना वळले
जगाने मात्र सारे जाणले ,
नाही नाही म्हणत नकळत माझ्यात तू
पाहिले तुझ्या प्रेमास साकारणे ...!!



--- संजय कुलकर्णी .

गाशील का मजबरोबरी ...?



गाशील का मजबरोबरी ...?



आठवांची लड जशी ..
घरंगळली माझ्या मनातुनी ,
आसवांची सर कशी ..
ओघळली माझ्या डोळ्यांतुनी ...!



दाटलेले भाव सारे ..
ओतले मी शब्दातुनी ,
दडविलेले प्रेम सारे ..
वर्षले मी गीतातुनी ...!



सहजीवनाचे स्वप्न पहाटेचे..
साकारशील का खरोखरी ,
मधुमिलनाचे गीत प्रेमाचे..
गाशील का मजबरोबरी ...!!


--- संजय कुलकर्णी .

तुझे प्रेम ...



तुझ्या प्रेमाबद्दल कितीही बोललो

तरी सांगायचं राहून जातं ,

तुझ्या प्रेमात कितीही नाहलो

तरी भिजायचं राहून जातं ..!!




तुझ्या प्रेमाचे क्षण

संपू नयेसे मनोमन वाटतात ,

तुझ्या विरहाचे क्षण

येऊ नयेसे खरोखर वाटतात ..!!




तुझ्या प्रेमाची अद्रुश्य सावली

ऋणानुबंधे मजला अशी मिळाली ,

परिस्थिती बिकट असहय्य उन्हाळी

सहवासाने तुझ्या सहजी पळाली ..!!



---संजय कुलकर्णी .

काही केल्या ...


काही केल्या ...



काही माणसं ...
काही केल्या ...विसरता येत नाहीत ,

आठवणी त्यांच्या ...
काही केल्या ...आयुष्यातून जात नाहीत ..!!




काही संबंध ...
काही केल्या ...आपणास दुरावत नाही

जिव्हाळा त्यांचा
काही केल्या ...जीवनातून आटत नाही ...!!




काही व्यक्ती ...
काही केल्या ...आपणास समजत नाहीत ,

स्वभाव त्यांचे
काही केल्या ...काही उमजत नाहीत ...!!




काही नाती ...
काही केल्या ...वर्णिता येत नाही ,

प्रेम-माया त्यातील
काही केल्या ...रक्ताच्या नात्यात नाही ...!!




काही क्षण ...
काही केल्या ...मनातून जात नाहीत ,

एकाकी मनात
काही केल्या ...सताविल्याशिवाय रहात नाहीत ..!!



--- संजय कुलकर्णी .

वाट तुझी पाहताना ...


वाट तुझी पाहताना ...



वाट तुझी पाहताना ..
भान वेळेचं रहात नाही ,
कितीही उशीर झाला
तरी तुला भेटल्याशिवाय ...पाय निघत नाही !!



वाट तुझी पाहताना ..
आसावांस रोखता येत नाही ,
लोकांत हसे झाले
तरी तुला पाहिल्याशिवाय ... आसवे थांबत नाही !!



वाट तुझी पाहताना ..
क्षण भेटीचे आठवत राही ,
व्याकुळले तनमन कितीही
तरी तहान मीलनाची ... तृप्त होत नाही !!


--- संजय कुलकर्णी .

तुजला का स्मरते ...?



तुजला का स्मरते ...?



मी हसुनि सर्वांस पाहते
तरी दु:ख्खी जनांस का वाटते ..?


मी स्वत:स किती समजाविले
तरी मनी तुजला का स्मरते ..?


मी रोखते बंध भावनांचे
तरी नयनांतून पूर कसे वाहते ..?


मी ढाळते अश्रू मूकपणे
तरी सारया जगास कसे कळते ..?


मी टाळते वाट विरहाची
तरी पाऊल तिकडे का वळते ..?


-- संजय कुलकर्णी .