
तुजला का स्मरते ...?
मी हसुनि सर्वांस पाहते
तरी दु:ख्खी जनांस का वाटते ..?
मी स्वत:स किती समजाविले
तरी मनी तुजला का स्मरते ..?
मी रोखते बंध भावनांचे
तरी नयनांतून पूर कसे वाहते ..?
मी ढाळते अश्रू मूकपणे
तरी सारया जगास कसे कळते ..?
मी टाळते वाट विरहाची
तरी पाऊल तिकडे का वळते ..?
-- संजय कुलकर्णी .
No comments:
Post a Comment