Popular Posts

Tuesday, August 23, 2011

मनतरंग ...!



मन तरंग , मन तरंग,

कधी न थांबती हे स्वच्छंद !

उठती सागरावरी जसे तरंग ,

गवसू जाता क्षणात गुंग !!


मन तरंग, मन तरंग ...



पाहता हिरवा निसर्ग कुंद ,

मन धावे होऊनी भुंग !

कळी कळी घेओनी चुंब ,

मन विसरी पाश बंध !


मन तरंग, मन तरंग ....



स्वार्थास्तव मोडिती नाती-बंध ,

पाहोनी माणसातील राक्षसी द्वंद !

दिसे नित्य फसवे नाट्य-रंग,

असे कसे हे लागे-बन्ध ?


मन तरंग, मन तरंग ....



गाई मन होउनी धुंद ,

विलापे भोगुनी दु:खी प्रसंग ,

उचंबळे पाहोनी निरागस बाल्यरंग

अनेक अदभूत मानवी रंगढंग !!


मन तरंग, मन तरंग ...



स्मरता तुज बाल मुकुंद ,

जाई गुंगुनी विसरोनी सर्व संग !

कुठूनसे कानी पडती वेणूनाद मंद ,

डोले तनमन गुणगुणत कृष्ण गोविंद !!


मन तरंग, मन तरंग ...




--संजय कुलकर्णी.

भीती का बाळगवावी ...?



मनी आंस उडण्याची

सुरवातही स्वत:हून करायची ,

भरारी स्वप्नांची घेतल्यावर

अफाट आसमंतास पाहून ...


घाबरून माघार का घ्यावी ?




मनी आंस आनंदाची

फुलपाखरासम मुक्त विहरण्याची

मोहून गुलाबास रुंजताना

नावाजणार्या जळणार्या जनाची ...


उगा काळजी का करावी ?




मनी आंस प्रेमाची

कृष्णाची राधा होण्याची

मनातून सर्वस्व अर्पिताना

संकुचीत नजरेने पाहणार्यांच्या ...


टीकेची भीती का बाळगावी ?




---संजय कुलकर्णी.

Sunday, August 14, 2011

भेट - जन्म-जन्मीच्या प्रेमबंधाची !



समोर आलीस तू
निखळ हसू घेउन ,
मनमोकळया गप्पा मारून
हृदयात प्रेम जागवून !



तसा सामान्य दिवस,
भूरभुरता रोमांचक पाऊस ,
वाटलं नव्हतं तुझ्या रूपात
भेटेल मज हवीहवीशी सोबत !



न्हवता तुझ्यात दिखावू झगमगाट
न्हवता बोलण्यात उथळ थरथराट ,
होता नाजुक मदभरा स्पर्षं
जन्मजन्मांतरीच्या प्रेमबंधाचा जाहला हर्ष !!


---संजय कुलकर्णी.

Wednesday, August 10, 2011

मस्तमौला प्रेमी ... फुल पाखरू !!






नाही कोवळी कळी
फुललेला हसरा गुलाब आहे ,
काट्यास कळेना काही
जो तो का पहात आहे ?



खुडू पाहता कुणी
रक्त बंबाळ होत आहे
काटा सर्वा मनी
नाहक बदनाम होत आहे !



अनेक फुले असोनी
हरेकास गुलाब हवा आहे
काट्यास निंदेचा धनी
विनाकारण व्हावं लागत आहे !



मस्तमौला प्रेमी परी
आनंदाने गुणगान गात आहे ,
फुल पाखरू बनुनी
मधुकंद गुलाबाचा चाखत आहे !!



---- संजय कुलकर्णी .

प्रिये, म्हणून तुला भेटायचे असते मला ...!!





तुला रोज रोज भेटायचे असते मला ,
गुपित हृदयी लपविलेले सांगायचे असते मला !



तुझ्या हास्यात मन खुलवायचे असते मला ,
गालावरच्या गोड खळीत बुडायचे असते मला !



तुझ्या बाहूत घट्ट शिरायचे असते मला ,
तुझ्या धुंद श्वासात विसरायचे असते मला !



प्रेमनिशाणी अधरांवर तुझ्या उमटवायची असते मला ,
प्रिये, म्हणून तुला भेटायचे असते मला ...!!



संजय.


तुझ्याशिवाय मी जगायचे ...




तुझ्याशिवाय मी जगायचे
म्हणजे सदोदित झुरायचे ,
वर्तमानात शरीराने अन
मनाने भूतकाळात रमायचे !




तुझ्याशिवाय जग पहायचे
म्हणजे तुलाच शोधायचे ,
हास्य चेहर्यावर फुलवायचे
बघणार्यांस सदैव फसवायचे !




तुझ्याशिवाय मी जेवायचे
म्हणजे सोपस्कार करायचे ,
आठवणींनी तुझ्या ठ्सकायचे
अन पाण्याने पोट भरायचे !



तुझ्याशिवाय मी निजायचे
म्हणजे बिछान्यावरी तळमळायचे ,
क्षण स्मरीत सहवासाचे
आसवांनी उशास भिजवायचे ...!!



---संजय कुलकर्णी .

राधाराणी ' प्रिया ' कृष्णाची ... !!




कातरवेळी एकाकी मनी
वार्या संगे धुंद रातराणी
आणती तुझ्या आठवणी
असशील तशी ये धावुनी !



विरह तुझा साजणी
सांग कसा साहू मी ?
तुझ्याशिवाय ह्या जीवनी
नाही कोणी मम हृदयी !



तुझ्या सहवासात सखी
होतो तनमनी मी आनंदी !
फुलबाग प्रीतीची फुलविणारी
राधाराणी ' प्रिया ' ह्या कृष्णाची !!



---संजय.



पाऊले कान्ह्याची प्रिये सांग पडतील का ?




मेघ सावळा कृष्ण अन
सरी कोसळणार्या जणु गोपीका !

आंस धरतीची एकमेकां शिवाय
सांग कधी शमवेल का ?




रातराणीच्या सुवासासम मदहोश तन
सांग तू करशील का

मुलायम ओठांनी हळूवार अमृतपान
सांग तू पाजशील का ?




थेंब पावसाचे मोजता तुला
सांग कधी येतील का ?

प्रेम माझ्या स्पर्शातले तुला
सांग कमीजास्त भासतील का ?




नव-जीवनाची पहाटेस देऊन चाहूल
मुखचंद्र पौर्णिमेचा निजेल का ?

रुणझुण पैजणे वाजवीत घरातून
पाऊले कान्ह्याची प्रिये
सांग पडतील का ?




--- संजय.



मी मैत्रेय ...!



दिवसा हूर हुरविणारे

अधूरे स्वप्न न्हवे मी ,

एक जिवंत प्रेमळ

सत्य तुझ्या समोर मी !


केवळ निर्जीव मूक

शब्द तर न्हवेच मी ,

एक चालती बोलती

निखळ प्रेममय कादंबरी मी !


अवेळी ग्रीष्मात पडणारा

वळवाचा पाऊस न्हवे मी ,

मनमोकळा तनमन धुंदविणारा

हवा हवासा श्रावण मी !


सोबत देणारा तुझा

केवळ सहचर न्हवे मी ,

तर जन्मोजन्मी साथ

देणारा ऋणानुबंधाचा 'मैत्रेय' मी ...!!


--- संजय.


मैत्री ... जगावेगळी !!



मैत्री ... जगावेगळी !!



पाहताच एकमेका ओढ लागली ,

(कारण ) भेट एका जन्मीची नाही ...!



रुपास तुझ्या भाळलो नाही ,

(कारण ) मैत्रीत सौंदर्याची गरज नाही ...!



श्रीमंती कधी पहिली नाही ,

(कारण ) अपेक्षा पैशाची ठेवलीच नाही ...!



मन जुळले विचार पटले ,

(कारण ) आवड दोघांची वेगळी नाही ...!



मी मोकळा तू बोलकी ,

(कारण ) एकलकोंडा दोघांचा स्वभाव नाही ...!



नाही म्हणता झाली भांडणे ,

(कारण ) मनात कुढणे जमले नाही ...!



दोन तन एक मन ,

(कारण ) वेगवेगळे कधी समजलो नाही ...!



मनस्वी प्रेमाची जगावेगळी मैत्री

(कारण ) अशा नात्याची जगाची रीत नाही ...!!



--- संजय कुलकर्णी.




Wednesday, August 3, 2011


आसवांची बरसात होईल ...!




भेट तुझी माझी
आता अशीच होईल ,
आठवण काढत तुझी
आसवांची बरसात होईल ... !



भेटायचे नाही आता कधी
आंस भेटण्याची बाळगणार नाही ,
समोरासमोर आलोच जर कधी
नजरेला नजर मिळवणार नाही ...!



चेहऱ्यावर आनंदी दाखवून
तुझ्या समोरून निघून जाइन ,
दु:ख्ख प्रेमभंगाचे लपवून
गालावर हास्याची पखरण करीन ... !



जगाच्या पाठीवर तू
माझ्या पासून दूर रहाशील ,
पण एकांतात तू
सतत माझ्या हृदयात असशील ...!!



---संजय कुलकर्णी

खट्याळ मधाळ श्रावण ग... !!



कधी उन कधी पाउस ,
जसा सुख दु:ख्खाचां मेळ ग... !



कधी आठवण कधी मिलन ,
जसा हसू अश्रुंचा खेळ ग ... !



क्षणात भिजवी क्षणात रुसवी ,
जसा कान्हा चितचोर ग... !



तन मोहरवी करी आनंदी ,
जसा नाचरा मनमोर ग ... !



आवडतो सर्वात मजसी परी
खट्याळ मधाळ श्रावण ग... !



--- संजय कुलकर्णी.