Popular Posts

Saturday, May 18, 2013



नातं तुझं-माझं..

समर्पित जीवनाचं, संवर्धित सौख्याचं
अंतरीक आपुलकीचं, मनस्वी मैत्रीचं !!

कनवाळ कारुण्याचं, लडिवाळ लाडाचं
मधाळ मायेचं, खट्याळ खोड्याच !!

लटक्या रुसव्याचं, हटक्या त्राग्याचं,
नटक्या नाराजीचं, मटक्या मनवण्याच !!

लोभस असण्याचं, सालस वागण्याचं
मोहक दिसण्याचं, रोचक वाटण्याचं !!

प्रेमळ हृदयीचं, निर्मळ मनाचं
हळव्या भावनांचं, गोडव्या प्रेमाचं !!

आत्मिक ऐक्याचं, सात्विक नात्याचं
नातं तुझं-माझं.. जन्मांतरीचं ऋणानुबंधाचं !!

-- संजय कुलकर्णी.
 
फितूर मन !!


मन झुरतंय, मन कुढतंय 
मन रुंजतंय, मन गुंजतंय 

मन घेवून तुझा माग ..
मन लाजेनं गालांत खुलतंय !!


मन धावतंय, मन शोधतंय
मन हरवतंय, मन गवसतंय

मन पाहून तुला वळताना..
मन आनंदानं स्वप्नांत झुलतंय !!


मन आरवतंय, मन आक्रंदतंय
मन कातवतंय, मन तांडवतंय

मन गुंगून तुझ्या आठवांत..
मन दु:ख्खानं विरहात बुडतंय !!


मन खट्याळ, मन वेल्हाळ
मन मधाळ, मन पाल्हाळ

मन होऊन फितूर लबाड..
मन प्रेमानं तुझ्यात जुळतंय !!

-- संजय कुलकर्णी.





प्रेम अंतरीचे ..


तिचे माझे भेटणे
तसे दररोज ठरायचे,
माझे तिचे बोलणे
तसे नेहमीचे असायचे !!

कधी मनमोकळे वागायचे
कधी घुम्यासारखे बसायचे,
कधी भडाभडां बोलायचे
कधी शब्दच विसरायचे !!

कधी एकरूप म्हणायचे
कधी मैत्रीपूर्ण सांगायचे,
एकमेकाशिवाय ना करमायचे
भेटल्यावर मात्र नाकारायचे !!

तसे प्रेम अंतरीचे
नजरेतून जरूर समजायचे,
कबूल करण्यास मनातले
दोघांनी आपसूक घाबरायचे !!

-- संजय कुलकर्णी.


एक भेट .. तुझी माझी !!


एक भेट
तुझी माझी संस्मरणीय घडावी..
एक साथ
सुंदर स्वप्नील सुरमणीय असावी !!

रातराणीच्या सड्यांनी
कुंद वातावरणी मृदगंध पसरावी.. 
लव्हबर्डसची झाडावरी 
जशी धुंद महफिल बहरावी !!

नीलरंगी साडीत 
निशांत तू निलपरी वाटावी.. 
निळेभोर आकाश 
जणु मज समवेत भासावी !!

फुलवून गुलाब 
हास्यातून गाली मदमस्त खुलावी.. 
तुझ्या सौंदर्याने 
चंद्रकोर नभीची ढगात झुरावी !!

नोकझोक गप्पांत 
ओढ प्रेमाची हृदयी वाढावी.. 
रोकठोक बोलण्यात 
जोड जीवाची जिवलग जाणावी !!

निरोपिता नयनांतून 
आपोआप धार अश्रूंची लागावी..
पुनर्भेटीची आस 
लावणारी उत्कट मिठी मारावी !!

-- संजय कुलकर्णी

Sunday, May 5, 2013







शिदोरी ...


आईपासून दूर जाताना 
तिच्याच जीवाचा तुकडा 

बिलगून म्हणतो आईला 
नको अडवू मला ..

उंबरठा ओलांडूनघराचा 
अन पदर सोडून मायेचा

बाहेरील चित्र-विचित्र जग
मुक्तपणे पाहू दे मला ..


सारी सृष्टी, निसर्ग माणसे
न्याहाळू दे मला ..


टक्के टोणपे, हाल अपेष्टा

मान अपमान,जय पराजय


सारे काही एकट्यानं

साहू दे मला ..

माणसा माणसातील 
देव,दानव 
ओळखू दे मला ..

काळजी करू नकोस ..
जरी मी 
एकटा, अकेला

तरी घाबरू नकोस ..
कारण माझ्याबरोबर साथ 

सदैव तू प्रेमाने शिकवलेली
अक्षय संस्कार शिदोरी ..!!

-- संजय कुलकर्णी




गुज मनीचे ...


त्याचे माझे भेटणे 
तसे दररोज ठरायचे, 

त्याचे माझे बोलणे 
तसे नेहमीचे असायचे ! 


कधी ऐसपैस मनमोकळे
कधी घुम्यासारखे बसायचे,

कधी भडाभडां बोलायचे
कधी शब्दच विसरायचे !


दो-तन एकरूप म्हणायचे
कधी मैत्रीपूर्ण सांगायचे,

एकमेकावाचून ना करमायचे
भेटल्यावर हमखास नाकारायचे !


तसे प्रेम हृदयातले
नजरेने अचूक समजायचे,

पण सांगायला मनातले
दोघेही आपसूक घाबरायचे ..!!

-- संजय कुलकर्णी.




अर्थ जीवनाचा ..!!

लाख क्षण अपूरे पडतात
अर्थ जीवनाचा समजण्यासाठी, 

एक क्षण पुरा पडतो
अर्थहीन आयुष्य बनण्यासाठी !!


कितीतरी दु:ख्खे भोगावी लागतात
मनासारखं सुख मिळविण्यासाठी,

थोडासा अहंकार कारणीभूत होतो
दु:ख्खाच्या खाईत पडण्यासाठी !!


कितीतरी नवस प्रदक्षिणा घालतो
अवकृपेपासून देवाच्या टाळण्यापासून,

एकदातरी प्रेमाने देवाला 
माझा 
म्हणतो का मनापासून ?


कितीतरी अपयशे पचवावी लागतात
यश पदरात पाडण्यासाठी,

जराशी बेपर्वाई निमित्त बनते
यश क्षणात घालविण्यासाठी !!


कितीतरी पावसाळे पहावे लागतात
मोल जीवनाचे जाणण्यासाठी,

काळ्याचे पांढरे व्हावे लागते
अनमोल जीवन उमजण्यासाठी !!


प्रेमाच बियाण पेरावं लागत
जन्माच नातं घडवण्यासाठी,

त्यागाच सिंचन करावं लागत
गेल्यावरही स्मरणात रहाण्यासाठी !!


-- संजय कुलकर्णी.

















काही केल्या ...

काही माणसं..
काही केल्या विसरता येत नाहीत,

काही आठवणी..
काही केल्या मनातून जात नाहीत ..!!



काही संबंध..
काही केल्या आपणापासून दुरावत नाही,

काही जिव्हाळे..
काही केल्या आयुष्यातून आटत नाही ...!!


काही व्यक्ती..
काही केल्या आपणास समजत नाहीत,

काही स्वभाव..
काही केल्या अंतरास उमजत नाहीत ...!!


काही नाती..
काही केल्या वर्णिता येत नाही,

काही माया..
काही केल्या रक्ताच्या नात्यात नाही ...!!


काही क्षण..
काही केल्या जीवनापासून तुटत नाही,

काही मन..
काही केल्या मनापासून जुळत नाही ..!!

-- संजय कुलकर्णी.
 




आयुष्य असंच असतं ..!! 

खरं म्हणजे आयुष्य असंच असतं 
कणभर सुखामागं मणभर दु:ख्ख भोगणं ..

खरं म्हणजे आयुष्य असंच असतं
नदीच्या पाण्यासारखं दगड-धोंड्यांआडून वाट काढणं ..

खरं म्हणजे आयुष्य असंच असतं
सूर्यासारखं तटस्थ राहून कार्य करीत रहाणं ..

खरं म्हणजे आयुष्य असंच असतं
चंद्राप्रमाणं कमी-जास्त स्वीकारून सर्वांस सुखावणं ..

खरं म्हणजे आयुष्य असंच असतं
सागरासम भरती-अहोटीस तोंड देत उत्साही जगणं ..

खरं म्हणजे आयुष्य असंच असतं
पतंगाप्रमाणं जिवलगांस्तव जन्मभर खपून संपणं ..!!

-- संजय कुलकर्णी.








खोपा ...
(घरकुल )


एकेक काडीस त्यानं आणलं
तिने त्याचं सुंदर घरटं बनविलं

एकेक नात्यांस त्यानं निर्मिलं
तिने प्रेमानं त्यास मायेनं रुजविलं !

कष्टानं त्यानं जीवन ओतलं
तिनं आयुष्य स्वत:चं समरसून गुंतवलं

दोन प्रेमिकांच संसार-स्वप्न सजलं !
खोप्यात आनंदानं सारं विश्व समावलं !!

घरकुल माणसाचं सुद्धा असंच असतं
स्त्री पुरूषाच त्यात प्रेम अन कष्ट वसतं !

तेव्हाच ते हवहवसं सुंदर घरटं बनतं
नाहीतर नुसतच चार भिंतीच "ब्लॉक" रहातं !!


--- संजय कुलकर्णी .
 



नजरेत तुझ्या ...

नजरेत तुझ्या गहिरे रंग भावनांचे भरलेले,
तयातील काही रंगाने मजला वेड लावलेले ..!!

नजरेत तुझ्या गूढ अंतरंग मनाचे दडलेले,
त्यांमुळे स्फुरले मला प्रेमतरंग माझे लपलेले ..!!

नजरेत तुझ्या मनोहर रूप जीवनाचे सजलेले,
त्यातील गुलाबी रंगात माझे स्वप्न पाहिलेले ..!!

नजरेत तुझ्या अलवार झाक आनंदाची फुललेली,
त्यामध्ये लाभली सुखाची किनार मला हरवलेली ..!!

नजरेत तुझ्या काळी छटा दु:ख्खाची पसरलेली,
त्यामध्ये माझ्या ध्येयाची दिशा मला उमजलेली ..!!

नजरेत तुझ्या मूक काळजी भविष्याची दर्शविलेली,
त्यामुळे लागली ओढ जीवनांत तुला बहरविण्याची ..!!

नजरेत तुझ्या नकळत आस प्रेमाची पाणावली,
तयांतुन प्रीत माझी तुजवर मनस्वी बरसली ...!!

-- संजय कुलकर्णी.


तू प्रेमस्वरूप..




सांगू कसे सखये मी, गुपित मनीचे जनात
मी प्रेमवेडा कान्हा, राधा तू प्रेमस्वरूप हृदयात ||धृ ||


जीवनाचे ध्येय माझे, प्रेमास फुलविण्याचे
तुज पाहता सखये , जणू दिसे सत्यस्वरूप प्रेमाचे

तू मम बासुरी , मी तुझ्या सुरांचा आभास ..

सांगू कसे सखये मी, गुपित मनीचे जनात
मी प्रेमवेडा कान्हा, राधा तू प्रेमस्वरूप हृदयात ||१||


रास क्रीडेत आनंदाच्या, मी प्रेम धुंद खुलावे
नाचण्यात सुखानंदाने, तू मंत्र मुग्ध झुलावे

ब्रम्हानंदी समाधी लागावी, मी तुझ्या आत्म्याचा प्रभास ..

सांगू कसे सखये मी, गुपित मनीचे जनात
मी प्रेमवेडा कान्हा, राधा तू प्रेमस्वरूप हृदयात ||२||

--- संजय कुलकर्णी.
 



कधी अशी, कधी तशी 
तरीही माझी प्रियसखी तू !!


कधी हसतेस गोड 
कधी गपगुमान खोड

कधी लावतेस ओढ
कधी वाटतेस कोडं !


कधी लाजतेस मधाळ
कधी वागतेस खट्याळ

कधी जुनाट कबाड
कधी स्वप्नांच घबाड !


कधी शिस्तीचा दबदबा
कधी हास्याचा धबधबा

कधी उत्साहाचा निर्झरा
कधी उदासीनतेचा पहारा !


कधी दिसतेस उदास
कधी भासतेस हताश

कधी राहतेस आनंदी
कधी नाचतेस स्वच्छंदी !


कधी मनात हिरमुसलेली
कधी स्वत:त गुरफटलेली

कधी पाकोळी कोमेजलेली
कधी गुलाबी मोहरलेली !


कधी भावूक हळवी
कधी नाजूक गोडवी

कधी खंबीर अचाट
कधी गंभीर अफाट !


तुझ्या श्वासात मी
माझ्या ध्यासात तू

तव भाव-ढंगात मी
मम प्रेम-रंगात तू


कधी मनी मोकळी
कधी घुमी अबोली

कधी अशी, कधी तशी
तरीही माझी प्रियसखी तू !!

-- संजय कुलकर्णी.




गर्दी .. !!

जाळून मम जीवनाची 
राख जिथे जाहली  

"प्रेक्षणीय स्थळ" पाहण्यास
लोकांची गर्दी तिथेच लोटली !


ढाळून आसवे माझी,
प्रेमकहाणी कवितेतून लिहिली

"सुंदर प्रेम काव्य !" म्हणत
सर्वांनी डोक्यावर तिलाच घेतली !


अत्याचार,बलात्कार पाहण्याची
सवय जणू समाजास लागली

मोर्चे, निषेध यात्रा काढून शांत
राहण्याची प्रथा रूढ जाहली !


कायद्यातील पळवाटांनी गुंडाना
पोलिसांची भीती कणभरही नुरली

पैशाच्या, सत्तेच्या बाजारात
माणसांची किंमत शून्य ठरली !


सभ्यता स्त्रियांना सन्मान
माणुसकीची भाषा अता केवळ

कथा कादंबर्यांत कवितांत
अन नेत्यांच्या भाषणांत राहिली !!

-- संजय कुलकर्णी


जगणे माझे आनंदवन झाले !!


अनंत संगात दंगून झाले
सुख-दुख्खांस भोगून झाले 

प्रेमानंदास मी लुटले
जगणे माझे आनंदवन झाले !!


आस कशाची बाळगू अता ?
हवे-नको ते मिळवून झाले

स्वर्ग कशास अपेक्षु मरता
जगणे माझे स्वर्गमय झाले !!


बदल जीवनाचे तत्व उमजता
सुखविले दु:ख्खात सुंदर स्वप्नाने

उदासीनतेत प्यायले धीराचे अमृतप्याले
जगणे माझे अमृतमय झाले !!


मनमोकळे बोलू लिहू जाता
प्रेमधारात मी चिंब नाहिले

संग असंख्य जीवनभराचे मिळाले
जगणे माझे प्रेममय झाले !!


प्रारब्ध भोगता, संचित फेडता
ऋणानुबंध प्रेमाचे निर्मिले

एकटा आलो, स्मृतींतून उरलो
जगणे माझे अमर झाले !!

-- संजय कुलकर्णी.



दुनिया प्रेम दिवाणी !

हासताना डोळ्यातून, बघ वाहते पाणी
चेहरा आनंदवून का, गायची उदास गाणी ?

काही करू जाता, त्याच आठवणी
हताश अंतरी, वर्णायची सुंदर जीवन कहाणी !

डाव नियतीचा, आहे तसाच जुना
प्रेम जुळवायचे अन, प्रेमभंग प्रेमींच्या प्रारब्धी !

दोष कुणाचा ? कशास उगाळावी कर्मकहाणी
परिस्थितीच्या दबावांपुढे, काय करू शकतो कोणी ?

विसर सारे, जुने घडलेले 'संजय'
प्रेम काव्यात तुझ्या, सारी दुनिया दिवाणी !!

-- संजय कुलकर्णी.



सखया .. भेट केव्हातरी !

सखया .. भेट केव्हातरी
अंतरीच्या अखंड उल्हासापरी, 

उत्स्फूर्त अविरत उन्मादापरी
कोसळत्या वाहत्या जलधारांपरी !!


सखया .. भेट केव्हातरी
ओझरत्या गोडव्या आठवांपरी,

शहारणाऱ्या वायू लहरीपरी
ओघळत्या हळव्या आसवांपरी !!


सखया .. भेट केव्हातरी
शांत शहाण्या मुलापरी,

छळतोस बेबंध अल्लडापरी
अवखळ बेफाम वार्यापरी !!


सखया .. भेट केव्हातरी
निखळ निर्मळ निसर्गापरी,

नयनरम्य मनोहर नभांगणापरी
नितांत सुंदर नित्यानंदापरी !!


सखया .. भेट केव्हातरी
लोभस नटखट नंदकिशोरापरी,

जीव जडला तुझ्यावरी
राधा भाळली जशी कृष्णावरी !!

-- संजय कुलकर्णी


महाभारत ...


पूजा करावी असा देव भेटेना
भोंदू लुटारूंचा इथे धंदा बुडेना !

गरीब, अपंगास कुणी भिक घालेना
मंदिरातील देणग्यांचा रतीब कमी होईना !

टिळक, भगत सिंग, सावरकर पुन्हा घडेना
भ्रष्टाचार्यांच्या तावडीतून देश, जनता सुटेना !

परस्त्री मातेसमान मानणारे शिवाजी दिसेना
भर-रस्त्यात बलात्कार करणाऱ्यांस शिक्षा मिळेना !

संजया ..सत्तेच्या कुरघोडीतून नेत्यांना सवड मिळेना
महागाईच्या, गुंडांच्या तावडीतून सर्वसामान्य वाचेना !!

-- संजय कुलकर्णी.
 


ऋणानुबंधी ...!!


करू नकोस इशारे, वादळे उठतात मनी 
बेफाम खवळलेल्या सागरात, होड सोडतात का कोणी ?

बंधने संस्काराची, सांग झुगारु ती कशी ?
संबंध अपुले पवित्र, गुंतवून नात्यात बाटवू कशी ?

शरीर संबंधातून, का नात्यात एकरूपता येती ?
असे असते तर, का जगात घटस्फोट होती ?

फसू नकोस सौंदर्यावर, तारुण्य अशाश्व्व्त जगती
मिलन दोन मनाचे, रे आजन्म शाश्वत टिकती !

घालू नकोस वाद, नात्यांत स्वार्थ पदोपदी
एकरूप दोघे मनात, भेटू जन्मोजन्मी होऊन ऋणानुबंधी !!

-- संजय कुलकर्णी.

















सहज नकळत ...

सहज नकळत
भेटता बोलता..



हसता खिदळता
रुसता मनवता,

सुख दुख्ख
लुटता वाटता.. 



जुळलं जातं
मनाशी मन !

अन मग
काही करता.. 



सर्वात मिसळता
एकटं असता,

हळूच अलवार
अलगद हळुवार.. 



एखाद्याच्या मनात
शिरतं मन !

दूर असतं
जवळ नसतं.. 



तरीही सतत
आसपास भासतं !

कधी हसवतं
कधी आसवतं..



आठवांनी स्वप्नात
झुलतं मन !

ओढ लावतं
भेटावंस वाटतं.. 



कोडं अनोखं
मनास पडतं,

नाही-नाही म्हणता
प्रेमात फसतं.. 



जन्मो-जन्मीच्या बंधात
खुलतं मन !!

-- संजय कुलकर्णी.
 


प्रियतमा मनी भरुनी, मी जीवनसंगीत व्हावे
हे स्वप्नगीत अपुले, एकांती तू स्मरावे !! धृ !!

ते क्षण मिलनाचे रे असेच पुन्हा फुलावे 
बेधुंद बेफान क्षणांत भान हरपून मी झुलावे

प्रियतमा मनी भरुनी, मी जीवनसंगीत व्हावे
हे स्वप्नगीत अपुले, एकांती तू स्मरावे !! १ !!

राधेस कान्हा जैसा स्नेहसंग अपुला तैसा
बंध अतूट जीवनाचे अमर अंतरी असावे !

प्रियतमा मनी भरुनी, मी जीवनसंगीत व्हावे
हे स्वप्नगीत अपुले, एकांती तू स्मरावे !! २ !!

तू इंद्रधनुष्य मनाचे नवरंग निर्मळ प्रेमाचे
आनंदघन आत्मिक एकत्वाचे सहजीवनी मी लुटावे !

प्रियतमा मनी भरुनी, मी जीवनसंगीत व्हावे
हे स्वप्नगीत अपुले, एकांती तू स्मरावे !! ३ !!

का राधेस वाटे कृष्णा सवे रमावे
हे ऋणानुबंध नात्यांचे ह्या जन्मीही जुळावे

प्रियतमा मनी भरुनी, मी जीवनसंगीत व्हावे
हे स्वप्नगीत अपुले, एकांती तू स्मरावे !! ४ !!

-- संजय कुलकर्णी.












मागणे...

तुला प्रत्येक कळीत, सुंदर फुलांत पाहतो
देवाकडे मी तुझ्या.. स्नेह सुगंधास याचतो !!


मम सुखांच्या बदल्यात, तव दु:ख्खांस मागतो
देवाकडे मी सदैव.. तुझ्या आनंदास्तव भांडतो !!


तुझ्या वाटेवर दिनरात, नजर लावून असतो
देवाकडे मी नेहमी.. तुझ्या दर्शनास प्रार्थतो !!


तुझ्या फोटोस पहात, कित्येक रात्र जागतो
देवाकडे मी तुला.. स्वप्नांत पाठविण्यास सांगतो !!


तुला भेटण्याच्या आशेवर, एकाकी एकटेपणास साहतो
देवाकडे मी जन्मोजन्मी.. तुझाच सहवास मागतो ..!!

-- संजय कुलकर्णी.
संदेसा ... 


कोई तो पहुचाये येह संदेसा मेरी सखी तक 
आंस मिलन की मनमे जगाये रखना मेरे आनेतक ..


वो कशिश, वो दीवानापन.. वो समर्पण
बस थोडासा सब्र करना इंतजार खत्म होनेतक !


वैसे तो मैं भी जी रहा हू एक ही उम्मीद पर
साथ होंगे हम तुम जल्दी ही सारी उम्र भर ..


आदमी जो बना हू ..
आसू दिखा नही सकता, छुपाये कबतक ?


दिन गुजर रहा हू ..
गम की आह भी न लाये, अपनी जुबांतक !!


-- संजय कुलकर्णी
ती :- ए, असं काय बघतोस 
काही न सांगतां उगाच हसतोस ?

तो :- ए असं काय लाजतेस 
काही न बोलतां गालात हसतेस ? -- धृ --


ती :- धडधड जीवाची कशास वाढवतोस
गडबड मनाची कशास करतोस ?

तो :- चोरून बघतेस पहाताच टाळतेस
मनातलं लपवितेस इतरांचं सांगतेस ?


ती :- ताकाला जायचं अन भांड लपवायचं !
तो :- प्रेमात पडायचं अन प्रेमास दडवायचं !!


ती :- ए, असं काय बघतोस
काही न सांगतां उगाच हसतोस ?

तो :- ए असं काय लाजतेस
काही न बोलतां गालात हसतेस ? -- १ --



ती :- किती दिवस असं चालायचं
भेटायला बोलावून कारण विचारतोस ?

तो :- किती दिवस असं फसवायचं
प्रेम करूनही मैत्री म्हणतेस ?


ती :- डोळे मिटून हळूच दुध प्यायचं !
तो :- मनात असूनही नाही नाही म्हणायचं !!


ती :- ए, असं काय बघतोस
काही न सांगतां उगाच हसतोस ?

तो :- ए असं काय लाजतेस ?
काही न बोलतां गालात हसतेस ? --२ -

-- संजय कुलकर्णी.
एकाकीपण.. 

जगते आहे मी, का ? काय मिळविण्यासाठी 
कुठे जाते मी, कशाला ? काय शोधण्यासाठी ?


दु:ख्खानो, करू नका घाई, मला भेटण्यासाठी
सुखेच मला पुरेशी, हासून हसविता रडण्यासाठी !


नको मला कुणाची सहानुभूती, क्षणभर रिझविण्यासाठी
माझे एकाकीपण आहे पुरेसे, आयुष्यभर रमविण्यासाठी !


त्याने सख्य देवू केले, मला स्वप्नी झुलवण्यासाठी
त्यास हृदयही मी दिले, खेळणे समजून तोडण्यासाठी !


मम भावविश्वास खुलवीत होते, सर्वांस सुखविण्यासाठी
त्याने मस्करी केली भावनांशी, सर्वांसमोर दुखविण्यासाठी !


तू घडलेले नाकारून, मला विसरूनही जाशील
अनुभव नसे थोडका, मला जीवनभर आठवण्यासाठी !


इथे ढोंगीपणा पुढे जोतो पायघड्या घाली
सच्चाईने वागणारा मात्र धडपडतो, अस्तित्व टिकविण्यासाठी !!

--- संजय कुलकर्णी.
माझ्या 
रोम रोमात तू !

माझ्या 
होश जोशात तू !!

माझ्या
भाव रुपात तू !

माझ्या
प्रेम स्वरूपात तू !!

माझ्या
सुख दु:ख्खात तू !

माझ्या
आनंद वेदनात तू !!

माझ्या
असण्या नसण्यात तू !

माझ्या
देह आत्म्यात तू ..!!


सखये..
खरं सांगायाचें तर

मी
म्हणजेच तू ..!!!

-- संजय कुलकर्णी.


रुजवून बीज भावनांचे , बरसला शब्दांत जो
फुलवून बाग जीवनाचे जगात, उधळला काव्यात तो !!


ती आग कोणती, धुमसते अंतरात ..
होऊन सूर्य विश्वात, गझलांत प्रकाशला तो !!


दावून मार्ग धडपडणार्यांना, दीपस्तंभ अनेकांचा जो
माझ्या शब्द सुमनांत गंधाळणारा, बेधुंद प्राजक्त तो !!


समजू नका कोणी, शब्दवेडा फकीर जो
स्मरता ऐकता गझल, म्हणणार एकमेव गझलसम्राट तो !!

-- संजय कुलकर्णी.


गझल गुरु श्रेष्ठ कविवर्य श्री.सुरेश भट्ट ..
ह्याना त्यांच्या स्मृतिदिना निमित्त माझे विनम्र अभिवादन ..!!

-- संजय कुलकर्णी.