Popular Posts

Sunday, May 5, 2013



प्रियतमा मनी भरुनी, मी जीवनसंगीत व्हावे
हे स्वप्नगीत अपुले, एकांती तू स्मरावे !! धृ !!

ते क्षण मिलनाचे रे असेच पुन्हा फुलावे 
बेधुंद बेफान क्षणांत भान हरपून मी झुलावे

प्रियतमा मनी भरुनी, मी जीवनसंगीत व्हावे
हे स्वप्नगीत अपुले, एकांती तू स्मरावे !! १ !!

राधेस कान्हा जैसा स्नेहसंग अपुला तैसा
बंध अतूट जीवनाचे अमर अंतरी असावे !

प्रियतमा मनी भरुनी, मी जीवनसंगीत व्हावे
हे स्वप्नगीत अपुले, एकांती तू स्मरावे !! २ !!

तू इंद्रधनुष्य मनाचे नवरंग निर्मळ प्रेमाचे
आनंदघन आत्मिक एकत्वाचे सहजीवनी मी लुटावे !

प्रियतमा मनी भरुनी, मी जीवनसंगीत व्हावे
हे स्वप्नगीत अपुले, एकांती तू स्मरावे !! ३ !!

का राधेस वाटे कृष्णा सवे रमावे
हे ऋणानुबंध नात्यांचे ह्या जन्मीही जुळावे

प्रियतमा मनी भरुनी, मी जीवनसंगीत व्हावे
हे स्वप्नगीत अपुले, एकांती तू स्मरावे !! ४ !!

-- संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment