Popular Posts

Saturday, July 2, 2011

असे कसे हे माझे मन ... ?




असे कसे हे माझे मन ?

जेव्हा बोलायचे तेव्हा गप्प राहते ,

भाव अंतरीचे ओठांवरी ना आणते

चुकता संधी मग झुरत राहते ... !!

असे कसे हे माझे मन ... ?




जरी ठरविते कुणावरही ना भाळायचे

गुलाबाच्या हव्यासाने ना काट्यांनी जखमावयाचे

पण अकस्मात नजरानजर तिची घडते

भावूक हसण्याने तिच्या पुन्हा गडबडते ...!!

असे कसे हे माझे मन ... ?




त्या ठिकाणी पुन्हा न जायचे समजावते

विचार तीचा काढून टाकायचे बजावते

पण संध्याकाळी पाउल तिकडेच वळते

कालच्या सारखे पुन्हा आज घड

असे कसे हे माझे मन ... ?



दिस बरेच असे होत असते

नाईलाजाने एकदा तीच माझ्याशी बोलते

मोकळेपणाने मैत्री करशील का पुसते

प्रश्नाने तिच्या आश्चर्याने भान हरपते ...!!

असे कसे हे माझे मन ... ?




प्रकरण नंतर अमुचे रंगू लागते

मेसेजेस,तासंतास बोलणे फोनवर चालते

आज ठरविले ' प्रेम करतेस का ' माझ्यावर विचारायचे

हो म्हणाली तर लग्नाचे ठरवायचे ...!!

असे कसे हे माझे मन ... ?




नेमकी ठरल्यावेळी ती न येते

कासावीस होऊन नजर शोधत रहाते

नको नको त्या शंका काढते ,

आल्यावर तिला फैलावर घेण्याचे ठरविते ... !!

असे कसे हे माझे मन ... ?



मनात आले नक्कीच हि नकार देते

म्हणुनच अशी वाट पहायला लावते

प्रेमात नशीब पुन्हा मात खाते

निराशेने कशाला जगायचे स्वत:ला म्हणते !

असे कसे हे माझे मन ... ?




एक तासाने ती लगबगीने येते

काय एव्हढे खास विचारायचे ? म्हणते

फुगलेला चेहरा पाहून समजून जाते

' सॉरी, माझ्या राजा ! रागावू नकोस ना ' ,वदते !

असे कसे हे माझे मन ... ?




हात दाखून अवलक्ष्ण कशाला मनात म्हंटले

सहज बोलविले असे मी रागातच सांगितले

बरं , पण मला तुला आहे सांगायचे

म्हणत तिने एक पत्र मज दिधले ...!!

असे कसे हे माझे मन ... ?




रागानेच मी ते भराभर वाचायला घेतले

वाचता वाचता चेहऱ्यावर मम हास्य पसरले

' असेच प्रेम आयुष्यभर करशील ना माझ्यावर ? '

घेवून मिठीत विचारले तिने ठेवून ओठ ओठावर ...!!!

असे कसे हे माझे मन ... ?




---संजय कुलकर्णी.


2 comments:

  1. prem mhanaje nakki kai asta , te kuni sangaych nast , pratekane ajmavayach asta .

    ReplyDelete
  2. Nice comment Shri Neeteen jee !

    Thanks for such a true and lovely response ..!!

    ReplyDelete