Popular Posts

Friday, July 8, 2011

कविता ...!

अजूनही काव्य ,

भावनांच्या गुंत्यात गुंतलेय ....


आजच्या युगात ,

प्रेमाच्या जाळ्यात फसलेय ....


हळवी कविता,

वर्तमानात कधी येणार ?


भावविवश होऊन ,

सद्यस्थिती कधी साहणार ?


भ्रष्टाचारास पाहुनि ,

आसूड शब्दांचे कधी ओढणार ?


अबलांवरील अन्यायास ,

पाहुनी त्वेषाने कधी पेटणार ?


गरज आहे काळाची ,

कवितेस काल्पनिक विश्वातून जागण्याची


बदलून दृष्टी कवितेची ,

बोलातून समस्या सामाजिक मांडण्याची


रात्रीच्या मोहमयी स्वप्नातून ,

जागून सूर्यकिरणे सत्याची पाहण्याची


नाजूक भावूक कामूक,

कवितेस ठाऊक पाऊलवाट फुलांची ,


पिडीत कष्टीत व्यथित ,

जनांच्या काटेरी महामार्गावरून चालण्याची ...!



महत्वाची टीप :-
संध्या उदयन जोशी ह्या माझ्या एका मैत्रिणीच्या
कवितेवरून हि कविता मी शब्दबद्ध केली आहे !

---संजय कुलकर्णी



No comments:

Post a Comment