मनातले प्रेम तुला
कधी ग कळायचे ?
तुझ्या अंतरीचे मला
कधी ग समजायचे ?
बोलता दुसर्या मुलीशी
रुसून तू बसायचे ,
कोण ती तुमची
का सारखे विचारायचे !
असेच दररोज भेटायचे
लाजून तू हसायचे ,
मी बोल बोलायचे
तू फक्त ऐकायचे !
दिनभर सारे घडलेले
तू भडाभडा सांगायचे ,
प्रेम-कविता मी ऐकविता
तू (नुसते) 'वाह-वा' करायचे !
कवितेतून प्रेम नकळत
तुजला मी कळवायचे ,
दुर्लक्षून अर्थास अलगद
लक्ष दुसरीकडे दर्शवायचे !
अशाने सांग कसे
सूर अपुले जुळायचे ?
हात हातात घालून
सप्तपदी कधी चालायचे... ?
--- संजय कुलकर्णी .

No comments:
Post a Comment