Popular Posts

Tuesday, July 26, 2011

एखादा संशय पुरेसा होतो ...!



बरेच आयुष्य खर्ची करावे लागते
आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी ,
पण, एखादा क्षण कारणीभूत ठरतो
सुरळीत आयुष्य दिशाहीन होण्यासाठी ...!


बरयाच तडजोडी कराव्वा लागतात
यशाचं शिखर गाठण्यासाठी ,
पण, जरासा इगो कारणीभूत होतो
शिखरावरून खाली गडगडण्यासाठी ...!


सतत प्रयास करावे लागतात
योजलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ,
पण, जराशी लापरवाही कारणीभूत होते
उद्दिष्ठापासून कायमचे दूर होण्यासाठी ...!


देवास नावे आपण ठेवत असतो
प्रार्थनेस प्रतिसाद न दिल्याबद्दल ,
पण, कितीदा आपण धावून जातो
इतरांच्या अडचणीत मदत करण्यासाठी ...!


विश्वासाने साथ द्यायची
असतेप्रेममय आनंदी संसार करण्यासाठी ,
पण, एखादा संशय पुरेसा होतो
उभारलेला संसार उध्वस्त करण्यासाठी ...!

---संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment