Popular Posts

Friday, July 29, 2011

प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!



प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!


कोडे प्रेमाचे ना सुटले मज आजवर ..
प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!


हवा हवासा वाटे जरी मनातून
जवळी येता का धडधडे उरातून,
किमया अशी केलीस तू माझ्यावर,
पाहताच मी मन जडले तुझ्यावर ...!!

कोडे प्रेमाचे ना सुटले मज आजवर ..
प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!



भेट पहिली तुझी नि माझी
चंद्र साक्षीने एकांती अशी घडली,
तव स्पर्शाचे मोरपीस फिरता तनुवर
नवख्या जाणीवेत राहिले ना भानावर ...!!

कोडे प्रेमाचे ना सुटले मज आजवर ..
प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!



हळूच अलगद मज घेता मिठीत
रोमांच अनामिक उठले तन मनात
धुंद तुझ्या सहवासात मोहरले क्षणभर
निशाणी ठेवली मी तव ओठांवर ...!!

कोडे प्रेमाचे ना सुटले मज आजवर ..
प्रीत नकळत कशी रे जडली तुझ्यावर ...!!


---संजय कुलकर्णी.

Tuesday, July 26, 2011

पाउस...
कृष्णमय...!!


कृष्णाचं माझ्या जणु काल
धरतीवर अचानक आगमन झालं
सावळ्या रंगात त्याच्या सारं
आसमंत गडद भरून गेलं !


सोसाट्याच्या वारयासह बिजलीच आनंदानं
थरारुन नभी नाचणं झालं
कान्ह्याच्या बासरीच्या मंजुळ सुरासम
पावसाच्या धारांच बरसणं झालं !


मातीच्या अनोख्या मधुर सुवासानं
मन माझं प्रफुल्लीत झालं ,
अंगणीच्या लाडक्या कृष्ण तुळशीचं
अमृतधारात तृप्त भिजणं झालं ...!!

---संजय कुलकर्णी.

प्रवास एका मैत्रीचा ...



प्रवास एका मैत्रीचा ...


प्रवास एका मैत्रीचा
तुझ्या माझ्या सहवासाचा
मनस्वी उत्कट प्रेमाचा
आंतरिक अतूट बंधनाचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
अलगद हलक्या सरींचा
अबोलपणे मनातील सांगण्याचा
मूकपणे अंतरी समजण्याचा ... !


प्रवास एका मैत्रीचा
टपटप पडणार्या गारांचा
सुखात आनंदाने गाण्याचा
दु:ख्खात एकत्र साह्ण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
उबदार पहाटेच्या थंडीचा
हळूवार पणे मने जपण्याचा
न स्पर्शता हृदयात वसण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
गर्मीत तहानलेल्या उन्हाळ्याचा
असहाय्य परीस्थितीत सुद्धा
खंबीरपणे साथ देण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
अपयशात उमेद जगविण्याचा
यशात समतोल रहाण्याचा
क्षणोक्षणी सावरण्याचा,घडविण्याचा ...!


प्रवास एका मैत्रीचा
अनोख्या प्रेमाच्या नात्याचा
बंधनात कुठल्याही न जखडता
जीवनभर मैत्र निभावण्याचा...!


---संजय कुलकर्णी.

प्रेम - ऋणानुबंधाचा प्रवास !



प्रेम - ऋणानुबंधाचा प्रवास !


प्रेम कुणावर कां जडतं
कुणालच हे समजत नसतं ,
प्रेम म्हणजे काय असत
सांगण्यासारख ते मुळीच नसतं !


शब्दांनी जरी कुणी नाही वदलं
तरी 'ज्याचं त्याला' नजरेनं लगेच समजतं ,
मुखाने प्रेमींनी कितीही नाही म्हंटलं
तरी ' प्रुफ ' प्रेमाचं चेहऱ्यावर उमटवतं !


प्रेम आशांचे पंख लावतं
प्रेम स्वप्न पहायला लावतं ,
प्रेम मनात ' बहार ' आणतं
प्रेम जगण्यात ' खुमार ' आणतं !


प्रेम आयुष्यातील सुखद पडाव असतो
प्रेम सुख-दु:ख्खाचा अनोखा सराव असतो ,
कुणाचा तरी जीवनभराचा शिरकाव असतो
ऋणानुबंधाचा नकळत सांसारिक प्रवास असतो ...!


---संजय कुलकर्णी.

मैत्रीमध्ये अपुल्या ' बरेच काही ' खास आहे ...!









इंद्रधनुष्याचे स्वप्नील रंग आहे ,
गुलाबाचे सुंदर क्षण आहे !
मैत्रीमध्ये अपुल्या ' बरेच काही ' खास आहे ...!


तू माझे जीवन आहे ,
माझ्या जीवनाचा तू ध्यास आहे !
मैत्रीमध्ये अपुल्या ' बरेच काही ' खास आहे ...!


तुझ्या बरोबर मी बिनधास्त आहे ,
तुझ्या मैत्रीचा मला विश्वास आहे !
मैत्रीमध्ये अपुल्या ' बरेच काही ' खास आहे ...!


सर्वांमध्ये मनाने तू सुंदर आहे ,
सुंदरतेचा इतरांमध्ये केवळ आभास आहे !
मैत्रीमध्ये अपुल्या ' बरेच काही ' खास आहे ...!


काय हवे अजुनि मला ,
सावलीसम विचारांनी तुझी साथ आहे !
मैत्रीमध्ये अपुल्या ' बरेच काही ' खास आहे ...!


तुझ्या-माझ्यात 'जन्म जन्मांतरी'ची ओढ आहे ,
मैत्रीस अपुल्या 'मनस्वी प्रेमा'ची जोड आहे !
मैत्रीमध्ये अपुल्या ' बरेच काही ' खास आहे ...!


तुझ्यामुळे आयुष्यास माझ्या अर्थ आहे ,
तुझ्याशिवाय जीवन सारे व्यर्थ आहे !
मैत्रीमध्ये अपुल्या ' बरेच काही ' खास आहे ...!!



---संजय कुलकर्णी.

पौर्णिमेची रात्र ...!




पौर्णिमेची रात्र ...!


उगवला आज पुन्हा
चंद्र पुनवेचा आभाळी ,
हाय फिरून आठविली
स्वप्ने प्रेमभरी सुहानी !


अंतरी जपलेल्या जखमेची
खपली पुन्हा निघाली ,
फिरूनी प्रीत दिवाणी
जुन्या जखमेतून भळभळली !


मृदुवार स्पर्षं तुझे
मोहरती आजही मना ,
मदभरे श्वास तुझे
उन्माद्ती आजही तना !


शीत मंद पवन
शहारत होता तुला ,
मिठीत शिरून प्रेमाने
बिलगले होतेस मला !


तू नसताना तोच
वात बोचतो तनमना ,
एकटा हताश तुजवीण
कशा साहू मनोवेदना !


किती पौर्णिमेच्या राती
मरणप्राय मी सहायची,
वाटते संपवावी अता
जिंदगी बनावटी चेहर्याची ....!


---संजय कुलकर्णी.




मिलन .....

मिलन ...


सखये असेच तू मोहक हसावे
गालावरील खळीनी मन मोहरावे !
आकर्षुनी तुजला मिठीत घ्यावे
गुलाब-पाकोळीसम तव ओठ चुंबावे !!


कामामध्ये मला तू सतवावे
नजरेचे सारखे इशारे करावे !
उन्नत (उन्मादक) रूपाचे दर्शन घडवावे
हळूवार स्पर्षांनी मदधुंद करावे !!


नाहुनी मजसमोर तू साज-शृंगारावे
कमनीय सौंदर्यास दर्पणी सहज पहावे !
हुक कंचुकीचे लावण्याचे निमित्ते
जवळी येण्याच्या संधीस साधावे !!


तापल्या तव्यावर लोणी जसे विरघळावे
आवेगांनी तसे तुझ्यात मी वितळवावे !
स्वर्गीय सुखाच्या अवर्णनीय बेहोशीने
सुंदर स्वप्न अपुले साकारावे ...!!


---संजय कुलकर्णी.

एखादा संशय पुरेसा होतो ...!



बरेच आयुष्य खर्ची करावे लागते
आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी ,
पण, एखादा क्षण कारणीभूत ठरतो
सुरळीत आयुष्य दिशाहीन होण्यासाठी ...!


बरयाच तडजोडी कराव्वा लागतात
यशाचं शिखर गाठण्यासाठी ,
पण, जरासा इगो कारणीभूत होतो
शिखरावरून खाली गडगडण्यासाठी ...!


सतत प्रयास करावे लागतात
योजलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ,
पण, जराशी लापरवाही कारणीभूत होते
उद्दिष्ठापासून कायमचे दूर होण्यासाठी ...!


देवास नावे आपण ठेवत असतो
प्रार्थनेस प्रतिसाद न दिल्याबद्दल ,
पण, कितीदा आपण धावून जातो
इतरांच्या अडचणीत मदत करण्यासाठी ...!


विश्वासाने साथ द्यायची
असतेप्रेममय आनंदी संसार करण्यासाठी ,
पण, एखादा संशय पुरेसा होतो
उभारलेला संसार उध्वस्त करण्यासाठी ...!

---संजय कुलकर्णी.

Wednesday, July 13, 2011

जिवलग सखी ...

कधी जहाल

कधी मवाळ

कधी निरागस

कधी खट्याळ !


कधी बडबडी

कधी भाबडी

कधी द्वाड

कधी गपगुमान !


कधी लाघट

कधी उद्धट

कधी उथळ

कधी प्रेमळ !


कधी खुप जवळ

कधी वागते तुटक

कधी येते लाडात

कधी जाते रागात !


कधी प्रेमाने म्हणते

तुझ्याशिवाय नाही करमत

कधी फुगून बोलते

जा गेलास उडत ...!


मी निघून जाताच

वदते, सॉरी रागावलास का ?

माफ कर मला

अश्रू आणुनी डोळ्यात !


दूर असली ती जरी

वसते सतत माझ्या मनात

कशी हि असली तरी

ती ' जिवलग सखी ' माझ्या जीवनात ...!!


---संजय कुलकर्णी.

Monday, July 11, 2011

अवघे जीवन तुझ्या पायी !



शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ,

सावळ्या श्रीहरीचे सारे प्रेम बंध !


जय जय विठ्ठल रखुमाई ... !!




बाप माझा तूच आई ,

सखा माझा तूच भाई !


जय जय विठ्ठल रखुमाई ...!!




नयनी माझ्या तू विठाई ,

भजनी गातो तुझी नवलाई !


जय जय विठ्ठल रखुमाई ...!!




जळी स्थळी सर्वा ठाई ,

दिसतोस मजला तू कृष्णमुरारी !


जय जय विठ्ठल रखुमाई !!




श्वास माझा ध्यास तूची ,

अवघे जीवन तुझ्या पायी !


जय जय विठ्ठल रखुमाई ...!!



---संजय कुलकर्णी .


प्रेम करणं इतकं सोपं नसतं ...!




सुंदर चेहऱ्यावर लगेच भाळायच नसतं ,

गोड हसण्यावर त्वरित फसायचं नसतं ,

चेहर्यामागील खरं मन जाणायच असतं ,

हास्याआडील सत्य समजून घ्यायचं असतं !


प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,

केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं !




पैशाच्या श्रीमंतीस केवळ पहायचं नसतं ,

मधाळ बोलण्यावर केवळ भुलायच नसतं ,

पैश्याने ऐशारामात जरूर राहता येत असतं ,

पण भावनिक मने जुळण्याची खात्री नसतं !


प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,

केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं !




प्रेम म्हणजे प्रेमीस आपलं मानण असतं ,

प्रेमीस आनंदी ठेवणं हेच ध्येय्य असतं ,

प्रेमीची सुख दु:ख्ख मनातून जाणणं असतं ,

आयुष्यभर विश्वासाने एकमेकांस साथ देणं असतं !


प्रेम करणं इतकं सोपं नसतं ,

केलंच तर आयुष्यभर निभवायच असतं !



---संजय कुलकर्णी.

Friday, July 8, 2011

फुलले तारुण्य तरंग ...!





का कसे कुणास ठाऊक
तुला पाहता शहारले तन !
गालावरील तुझ्या खोल खळीत
नकळत गुंतले माझे मन !


का कसे कुणास ठाऊक
चोरून तुझ्या मोहक रुपास
अन खट्याळ बटांस पाहण्याचा
सहजच जडलासे मला छंद !


का कसे कुणास ठाऊक
आठवी सारखे तुझे रंगढंग !
तुझ्या धुंद स्पर्षं गंधात
अलगद जाहले चित्त दंग !


का कसे कुणास ठाऊक
वाटले तूच माझे भाविष्यरंग !
तुझ्या भेटण्याने फुलले माझ्यात
उत्स्फूर्त उन्मत्त तारुण्य तरंग ...!



---संजय कुलकर्णी.

मनोगत कवितेचे ...!




जो-तो उठतो ,

मला नावे ठेवतो ...!


यशास पाहून ,

सतत बोटे मोडतो ... !


असे असावे ,

तसे व्हावे म्हणतो ...!


नाजुक, भावूक ,

का असावे वदतो ...!


ज्वलंत, आक्रमक ,

का नसावे सांगतो ...!


अन्यायास तोंड ,

कधीतरी फोडावे बोलतो ...!



मान्य करून ,

एकदा ऐकले सर्वांचे ...!


त्वेषाने उठून ,

अंजन घातले सत्याचे ...!


नुसते स्तवले ,

क्षणिक टाळ्या वाजवून ...!


विसरून कवना ,

पुन्हा मुर्दाड मनागत ...!


फरक काही न

ना त्यांच्या वागण्यावर ...!



चार प्रेमाचे

गुणगान मी करता ...!


वर्णन प्रेमिकेच्या

सुंदर तनमनाचे करता ...!


व्यस्त कामातून

प्रत्येकजण पुन्हा-पुन्हा पाहतो ...!


आंतरिक उत्सुकतेने

मजला नीट न्याहाळतो ...!


अलगद चेहऱ्यावर

मधुर सुहास्य पसरवतो ...!


नकळत उत्स्फूर्ततेने

वा, सुंदर ! म्हणतो ...!


प्रसन्न होऊनी

उज्वल स्वप्ने पाहतो ...!

मान्य मला

स्वप्ने काय कामाची ...!


सत्यात आणण्या

त्यास गरज कष्टाची ...!


एक विसरती

मात्र सर्व जण ...!!


स्वप्ने जागवती

आस सुंदर भविष्याची ...!


व्यथित कष्टीत

जनास आनंदाने जगण्याची ...!

अशाच स्वप्नातून

उज्वल भारत घडवण्याची ... !!



---संजय कुलकर्णी.

कविता ...!

अजूनही काव्य ,

भावनांच्या गुंत्यात गुंतलेय ....


आजच्या युगात ,

प्रेमाच्या जाळ्यात फसलेय ....


हळवी कविता,

वर्तमानात कधी येणार ?


भावविवश होऊन ,

सद्यस्थिती कधी साहणार ?


भ्रष्टाचारास पाहुनि ,

आसूड शब्दांचे कधी ओढणार ?


अबलांवरील अन्यायास ,

पाहुनी त्वेषाने कधी पेटणार ?


गरज आहे काळाची ,

कवितेस काल्पनिक विश्वातून जागण्याची


बदलून दृष्टी कवितेची ,

बोलातून समस्या सामाजिक मांडण्याची


रात्रीच्या मोहमयी स्वप्नातून ,

जागून सूर्यकिरणे सत्याची पाहण्याची


नाजूक भावूक कामूक,

कवितेस ठाऊक पाऊलवाट फुलांची ,


पिडीत कष्टीत व्यथित ,

जनांच्या काटेरी महामार्गावरून चालण्याची ...!



महत्वाची टीप :-
संध्या उदयन जोशी ह्या माझ्या एका मैत्रिणीच्या
कवितेवरून हि कविता मी शब्दबद्ध केली आहे !

---संजय कुलकर्णी



स्वप्न अंतरीचे ...!




का कळेना मला साजणे
नजर भिडता तुज क्षणभरी ,
अकस्मात हे वाटले कसे
माझ्या मनातली तू स्वप्नसुंदरी !


भाव माझे अंतर तुझे
प्रेम हृदयीचे जाणले कसे ?
पाहुनि मला लाजून तुझे
बिलगणे हळूवार झाले कसे ?


बोल माझे अर्थ तुझे
स्वर माझे गीत तुझे ,
स्पर्षं तुझे उन्माद माझे
साकारते मिळूनी स्वप्न अंतरीचे !


---संजय कुलकर्णी .

तू स्वप्न प्रीतीचे तोडशील ...!





पुन्हा पुन्हा मनात येते
कधीतरी तू हाक मारशील ,
वाटले न्हवते प्रेमात मला
तू कधी नकार देशील !


ना मानली भीती जगाची
पर्वा न्हवती लोकांच्या बोलण्याची ,
वाटले न्हवते प्रेमात तुझ्या
तू कधी दगा देशील !



विचार तुझा सदोदित मन्मनी
सुखास तुझ्या प्रार्थिले क्षणोक्षणी ,
वाटले न्हवते प्रेमास माझ्या
तू असे निर्दयी फेटाळशील !



नाही कधी तू जाणले
भाव खरे माझ्या कवितेचे ,
वाटले न्हवते एका झटक्यात
तू स्वप्न प्रीतीचे तोडशील ...!



---संजय.

जखम प्रेमभंगाची ...!



तमाशा भावनेचा फुकटचा झाला ...
तरी मनात ती येते का ?


फुकटचा मन:स्ताप झाला डोक्याला ...
तरी विचार तीचा येतो का ?


जखम मिळाली प्रेमभंगाची हृदयाला ...
तरी आठवणीं तिच्या सतावतात का ?


विसरून पुन्हा आनंदी राहतोय ...
तरी डोळ्यासमोर ती भासते का ?


सुखाचे आयुष्य दु:ख्खात बुडाले ...
तरी गुणगान तिचे करतोस का ?


--- संजय .

Saturday, July 2, 2011

सप्तपदी कधी चालायचे... ?



मनातले प्रेम तुला

कधी ग कळायचे ?

तुझ्या अंतरीचे मला

कधी ग समजायचे ?


बोलता दुसर्या मुलीशी

रुसून तू बसायचे ,

कोण ती तुमची

का सारखे विचारायचे !


असेच दररोज भेटायचे

लाजून तू हसायचे ,

मी बोल बोलायचे

तू फक्त ऐकायचे !


दिनभर सारे घडलेले

तू भडाभडा सांगायचे ,

प्रेम-कविता मी ऐकविता

तू (नुसते) 'वाह-वा' करायचे !


कवितेतून प्रेम नकळत

तुजला मी कळवायचे ,

दुर्लक्षून अर्थास अलगद

लक्ष दुसरीकडे दर्शवायचे !

अशाने सांग कसे

सूर अपुले जुळायचे ?

हात हातात घालून

सप्तपदी कधी चालायचे... ?

--- संजय कुलकर्णी .


तू ... माझी सखी-साजणी !


तू ... मनाने हळवी !

तू ... तनाने लोभवी !


तू ... दिलखुलास हसरी !

तू ... आनंदास पसरी !


तू ... संकटात कणखर !

तू ... शृंगारात बंडखोर !


तू ... बोलण्यात लाघवी !

तू ... वागण्यात साधवी !


तू ... चांदण्यात विहरणारी !

तू ... पावसात बहरणारी !


तू ... भावनांनी ओथंबलेली !

तू ... तारुंण्याने मुसमुसलेली !


तू ... संकटात कणखर !

तू ... शृंगारात बंडखोर !


तू ... स्वप्ने फुलविणारी !

तू ... भविष्य घडविणारी !


तू ... संसाराची रण-रागिणी !

तू ... माझी सखी-साजणी !

--- संजय .


माझी प्रीत निराळी ...!




ही माझी प्रीत निराळी

जसे गंगेचे पवित्र पाणी ,

दु:ख्खाच्या गतस्मृतींना

नाहवी प्रेम जलात आगळी ...!


जरी भेटी निराशा पावलोपावली

आनंदाने त्यास मारतो मिठी ,

हृदयस्थ मधूर भावनांना

स्पर्शता गाती सुखाशेची सुरम्य-गाणी ...!


आस प्रेमाची असते सर्वा मनी

स्वप्नांची दाखवून तयांस गोडी ,

काव्यातून उधळीत भाव सुमनांना

प्रीत नाची आनंदाने होऊन प्रेम-दिवाणी ...!!


---संजय कुलकर्णी.


असे कसे हे माझे मन ... ?




असे कसे हे माझे मन ?

जेव्हा बोलायचे तेव्हा गप्प राहते ,

भाव अंतरीचे ओठांवरी ना आणते

चुकता संधी मग झुरत राहते ... !!

असे कसे हे माझे मन ... ?




जरी ठरविते कुणावरही ना भाळायचे

गुलाबाच्या हव्यासाने ना काट्यांनी जखमावयाचे

पण अकस्मात नजरानजर तिची घडते

भावूक हसण्याने तिच्या पुन्हा गडबडते ...!!

असे कसे हे माझे मन ... ?




त्या ठिकाणी पुन्हा न जायचे समजावते

विचार तीचा काढून टाकायचे बजावते

पण संध्याकाळी पाउल तिकडेच वळते

कालच्या सारखे पुन्हा आज घड

असे कसे हे माझे मन ... ?



दिस बरेच असे होत असते

नाईलाजाने एकदा तीच माझ्याशी बोलते

मोकळेपणाने मैत्री करशील का पुसते

प्रश्नाने तिच्या आश्चर्याने भान हरपते ...!!

असे कसे हे माझे मन ... ?




प्रकरण नंतर अमुचे रंगू लागते

मेसेजेस,तासंतास बोलणे फोनवर चालते

आज ठरविले ' प्रेम करतेस का ' माझ्यावर विचारायचे

हो म्हणाली तर लग्नाचे ठरवायचे ...!!

असे कसे हे माझे मन ... ?




नेमकी ठरल्यावेळी ती न येते

कासावीस होऊन नजर शोधत रहाते

नको नको त्या शंका काढते ,

आल्यावर तिला फैलावर घेण्याचे ठरविते ... !!

असे कसे हे माझे मन ... ?



मनात आले नक्कीच हि नकार देते

म्हणुनच अशी वाट पहायला लावते

प्रेमात नशीब पुन्हा मात खाते

निराशेने कशाला जगायचे स्वत:ला म्हणते !

असे कसे हे माझे मन ... ?




एक तासाने ती लगबगीने येते

काय एव्हढे खास विचारायचे ? म्हणते

फुगलेला चेहरा पाहून समजून जाते

' सॉरी, माझ्या राजा ! रागावू नकोस ना ' ,वदते !

असे कसे हे माझे मन ... ?




हात दाखून अवलक्ष्ण कशाला मनात म्हंटले

सहज बोलविले असे मी रागातच सांगितले

बरं , पण मला तुला आहे सांगायचे

म्हणत तिने एक पत्र मज दिधले ...!!

असे कसे हे माझे मन ... ?




रागानेच मी ते भराभर वाचायला घेतले

वाचता वाचता चेहऱ्यावर मम हास्य पसरले

' असेच प्रेम आयुष्यभर करशील ना माझ्यावर ? '

घेवून मिठीत विचारले तिने ठेवून ओठ ओठावर ...!!!

असे कसे हे माझे मन ... ?




---संजय कुलकर्णी.