Popular Posts

Wednesday, July 13, 2011

जिवलग सखी ...

कधी जहाल

कधी मवाळ

कधी निरागस

कधी खट्याळ !


कधी बडबडी

कधी भाबडी

कधी द्वाड

कधी गपगुमान !


कधी लाघट

कधी उद्धट

कधी उथळ

कधी प्रेमळ !


कधी खुप जवळ

कधी वागते तुटक

कधी येते लाडात

कधी जाते रागात !


कधी प्रेमाने म्हणते

तुझ्याशिवाय नाही करमत

कधी फुगून बोलते

जा गेलास उडत ...!


मी निघून जाताच

वदते, सॉरी रागावलास का ?

माफ कर मला

अश्रू आणुनी डोळ्यात !


दूर असली ती जरी

वसते सतत माझ्या मनात

कशी हि असली तरी

ती ' जिवलग सखी ' माझ्या जीवनात ...!!


---संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment