Popular Posts

Tuesday, April 26, 2011

ओलेती अप्सरा ... !


ओलेती अप्सरा ..!!


दररोज उगवते तशीच आजची सकाळ होती ..
पण मला मात्र सुंदर प्रसन्न वाटली !!

कारण खिडकीतून समोरच्या बाल्कनीत एक परी ..
कोवळ्या उन्हात केस वाळवताना मला दिसली !!



सकाळची उन्हे खिडकीतून चेहर्यावर पडत होती ..
ती आल्याचे मला जणू खुणवत होती ..!!

ओलेती , आळस देत खुर्चीवर ती बसलेली ..
जणू आनंदी दिवसाच्या शुभेच्छा देतेशी भासली ..!!



कुतूहलाने मधेच ती चाहूल घेत होती ..
पडद्याआडून नजर माझी तिला न्याहाळीत होती ..!!

लांबसडक केसातील गुंता हळूवारपणे सोडवत होती ..
मोहक रुपात मजला तिच्यात गुंतवत होती ..!!



क्षणभरात कुठूनशी अचानक वार्याची झुळूक आली ..
पडदा सरकवत चेहरा तिचा दाखवून गेली ..!!

निमिषार्धात लाजत सावरत, हासून पळून गेली ,
अन छबी ओलेत्या अप्सरेची मनी भरून गेली ... !!!


--- संजय कुलकर्णी.



4 comments:

  1. मनापासून धन्यवाद अरविंद जी !
    असेच ' प्रेम तरंग ' ला भेट देत रहा व
    तुमच्या बहुमोल प्रतिक्रिया सुद्धा द्या
    हि नम्र विनंती !!

    ReplyDelete
  2. kya kahena sir...aap bohot badiya likhte ho

    ReplyDelete
  3. धन्यवाद शीतल जी !
    ऐसे हि आप मेरे ब्लॉग पर आ कर
    मेरी कविताए पढ़ते रहिये और आप की
    अनमोल प्रतिक्रियाए देते रहिये जी !
    सविनय मेरे मनसे धन्यवाद !!!

    ReplyDelete