Popular Posts

Friday, April 8, 2011

विनवणी ... प्रेयसीची !




विनवणी ... प्रेयसीची !!



जे ना बोलले शब्दाने
डोळ्यात तुझ्या मी पाहिले !

गुपित हृदयीचे जरी लपविले ,
हसण्याने तुझ्या मी जाणिले ..!!



तू कितीहि तयांस नाकारले
चाल चलनांनी तुझ्या दर्शविले !

चोरून मज करिसी इशारे
पाहता मी, कां लाजसी रे .. ?



वाखाणता कोणी मम रूपा
उदास होऊन,कां रुसशी रे ?

संशयाने मग तुझे अबोलणे
प्रेम नाही तर काय आहे रे .. ?



भेटण्यासाठी हट्ट धरीशी तू
भेटल्यावर मनातले कां लपवीशी रे

बोलायचे ते ना बोलून
फालतू 'टाईम पास ' कां करशी रे ..?



प्रेम होणे नसे गुन्हा
भावना मनीच्या कां लपवीशी रे ..?

वेळ कुणासाठी कधी ना थांबते
पश्चातापून मग नशिबास दोषवशील रे .. !!


---संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment