Popular Posts

Monday, May 30, 2011

आधार प्रेमाचा ...



मन माझे चंचल

धावते स्वप्नांमागे अविरत

थांबते ना क्षणभर !


जशी वसुंधरा फिरते

स्वत: भोवती नकळत

घेवून सर्वांस गरगर !


स्वप्नातील आशा आकाक्षांना

सत्यात कसे आणावे ?

सागर तळातील मोत्यांना

शोधून कसे काढावे ?


मन आनंदाचे उधाण

पौर्णिमेस आकाशी जसे

चंद्र चांदण्यांचे धुमशान !

मन काळजीचा घोर

अमावस्येच्या रात्री जसे

टिट्वीस ओरडण्याचा जोर !


चेहऱ्यास पाहून कुणाच्या

थांगपत्ता खरा मनाचा

कसा कुणा कळावा ?


ढोंगी फसव्या दुनियेत

सच्च्या मनस्वी प्रेमाचा

आधार कसा मिळावा ?


--- संजय कुलकर्णी.

प्रेम गीत ... !



तुझ्या ओठांनी प्रेमगीत माझे गायचे ,

तुझ्या मधुर स्वरात शब्दांनी नहायचे !



हृदयस्पर्शी भावनांत तू मंत्रमुग्ध व्हायचे ,

प्रेमास माझ्या अंतरातून समजून घ्यायचे !



मला न साहावे तुझा विरह अता ,

टाळून नजरा लोकांच्या भेट ना मला !



तुझ्या लोचनात मला हरवून ग जायचे ,

मिठीत तुझ्या स्पर्शगंध मज हळूवार लुटायचे !



मला ना आवडे तुझा हा लटका रुसवा ,

महत्प्रयासाने भेट होता का अबोला फसवा !



तन मनात तुझ्या स्वप्नांचे प्रेमांकुर फुलवायचे ,

सुगंधित श्वासात मिसळूनी आनंदे एकरूप व्हायचे !



--- संजय कुलकर्णी.

स्व्प्नांकुर मी ...! अमर आत्मांकुर मी !!



प्रेम आहे तुझे मजवर ,

म्हणतेस हेच पुरेसे खरोखर !

प्रेमासक्त नजरेतून तुझ्या खरं ,

जाणले अंतरी केंव्हाच दिलवर !


अशीच नकळत मला

तू पहात रहा ,

स्वप्नातून मम प्रेमसुख

सदैव उपभोगत रहा !


बाह्य जग सतत बदलणारा

अफाट मायेचा पसारा आहे !

स्वप्नातील दुनियेत अपुल्या प्रेमाचा

खरा अंत:करणीय विसावा आहे !


वेडा आहे मी तुझ्या

हृदयीच्या खऱ्या प्रेम भावनांचा ,

आतुर असे मी ऋणानुबंधाच्या

तुझ्या माझ्या आत्मिक प्रेमाचा !


लाख इच्छा तुझ्या सहजीवनाच्या ,

प्रेमाच्या सत्यात मजला सांगण्याच्या,

दावतील वाटा त्याच जन्मोजन्मीच्या

अपुल्या सुंदर मनस्वी मिलनाच्या !


उत्कट अपरिमित प्रेम फुलविणारा

आनंदाचा समर्पित स्व्प्नांकूर मी !

गांधारीय स्वर्गीय सुख लुटणारा

तुझ्यातील अमर आत्मांकुर मी ...!


--- संजय कुलकर्णी .

Tuesday, May 24, 2011

माझे प्रेमतरंग तू ...!



हासर्या चेहर्याने मोहिनी

मजवरी तू केली ,

लोभस आर्जावांनी जादुगरी

मनावरी तू केली !



आरशात सारखे पाहून

का शृंगारतेस तू स्वत:ला ,

सौंदर्य तुझे बघून

वाटते आरसा व्हावे मजला !



नाहून निथळती जशी

माझ्या जवळी तू आली ,

चेतवून तन मनाला

उन्हाळ्यात अचानक बरसात झाली ...!



सांगू कसे तुला

माझे मनतरंग तू ,

संथ जीवन फुलविणारे

माझे प्रेमतरंग तू ... !



---संजय कुलकर्णी .


अनामिक ...




अनामिक मी, आहे अनामिक ,
"नामीक" जगात, मी हो अनामिक !


जन्मदात्रीने नामिले जरी संजय,
परी समजतो स्वत:स मी अनामिक !!
म्हणती जन मज ' खुळा संजय ' ,
नामीक जगात, मी हो अनामिक !!


पाहता दु:ख्खीत चिंतीत नामिक निरंतर
गीतातून धीराने, प्रेमाने स्व्प्नावून अगणिक ,
व्यथा तयांच्या विसरवितो खुलवून क्षणभर
"नामीक" जगात, मी हो अनामिक !!


उल्हासुनी सर्व मनी होती कणखर
सवे त्यांच्या मग नाचून क्षणिक ,
स्मरूनी प्रेमाने मज, आनंदती जीवनभर ,
स्वप्नाळू खरोखर, मी हो अनामिक !!


"नामीक" जगात, मी हो अनामिक !!


---संजय


काय करू ग ...




काय करू ग ...


सखये, मलाही तुझ्या बरोबर
एक संध्याकाळ फिरायचे आहे ,
एकांती बागेत वृक्षतळी बसून
बरेच सारं सांगायच आहे ...!


मन मोकळे करून ग
प्रेम मनीच कळवायच आहे ,
पण काय करू ग ...
योग जुळून येत नाही ...!


ठावूक मजला तुलाही
बरेच बोलायचे आहे ,
हात घेवून हाती तुलाही
एकटे खूप फिरायचे आहे ...!


खूप काही मागायचे आहे
अन बरेच द्यायचे आहे ,
पण काय करू ग
तशी संधी येत नाही ...!


मजसवे खूप भांडायचे आहे
प्रेमाने प्रेमास जाणायचे आहे ,
निरसन करून सर्व शंकांचे
मिठीत शिरून रडायचे आहे ...!


कुणी पहात नाही बघून
निशाणी प्रेमाची द्यायची आहे ,
पण काय करू ग ...
मनासारखे अजून घडत नाही ...!!


---संजय कुलकर्णी.

Wednesday, May 18, 2011

प्रेम असं असावं ...!



कधी आठवण येता

तू सामोरी दिसावं !

सर्व जगास विसरून

तू मनमोकळे भेटावं !


हातात हात घालून

दूर एकटेच फिरावं !

एकांती जवळ घेवून

ओठांस मधाळ चुंबावं !


मध्येच विनाकारण तू

माझ्यावर रुसून जावं !

लाडाने मनविता तू

खुलून घट्ट बिलगावं !


थोडं थोडं सांगावं,

अन भरपूर ऐकावं !

कधी हळुवार भांडाव

कधी मनमुराद हसावं !


सतत चोरून इतरांपासून

फोनवर बोलत राहावं !

दुसर्यास कळलेले पाहून

'अग'चे 'अरे' करावं !


विरहात मनात झुरावं

अंतरात प्रेमास जपावं !

विरोधास पुरून उरावं,

प्रेम यशस्वी करावं ...!


---संजय कुलकर्णी.

Saturday, May 14, 2011

कुणीतरी असावं !




मला पाहुनि मनी हर्षणारं,
पाहताच मला गालात खुलणार !
शब्द माझे आपुलकीन ऐकणारं,
वाटतं मला कुणीतरी असावं !


भावनांस हृदयीच्या अंतरी जाणणारं
हाकेस माझ्या प्रतिसाद देणारं !
मुक्तपणे मला सर्व सांगणारं
वाटतं मला कुणीतरी असावं !


निरव चांदण्यात मजबरोबर फिरणारं
विश्वासानं हातात हात देणारं !
प्रत्येक कार्यात प्रोत्साहन देणारं
वाटतं मला कुणीतरी असावं !


कल्पनांस मम फुलासम फुलविणारं
यशात माझ्या आनंदून जाणारं !
संकटी एकट न सोडणारं
वाटतं मला कुणीतरी असावं !


मनात माझ्या सदैव आठवणारं
अंतरी सतत मला स्मरणारं !
प्रवास जीवनाचा सुसह्य करणारं
वाटतं मला कुणीतरी असावं !


----संजय कुलकर्णी.

Wednesday, May 11, 2011

एक धुंद संध्याकाळ ...!



अवचित संध्याकाळी ती आली ...

मस्त मदहोश करून बेधुंद !

जाताना श्वासात भरून गेली ,

अवीट प्रेमाचा दरवळणारा सुगंध !



अवचित संध्याकाळी ती आली ...

आरक्त कंच, गुलाबी गहरी !

जाताना ओठावरी उमटवून गेली

मधाळ अमृताच्या गोड लहरी !



अवचित संध्याकाळी ती आली ...

उत्स्फूर्त शृंगारिक गात गाणी !

जाताना उत्कट आलिंगन देऊनी

उबदार स्पर्ष-गंधाच्या धुंद आठवणी !


---संजय कुलकर्णी.

तगमग प्रियकराची ....!




प्रेम कधी मागुन मिळत नाही ,

उत्स्फुर्त पणे मनात रुजावं लागतं !

नयनांनी एकमेकांस कितीही खुणविले तरी ,

प्रेम कृतीतून दुसर्यास दाखवावं लागतं !



आठवण तिची तशी रोज येते ,

अन तिला लगेच भेटावसं वाटतं !

मन मोकळे माझं करावसं वाटते ,

अन तिच्या मनातलं जाणावसं वाटतं !



दिसताच ती खूप बोलावस वाटतं ,

पण तिच्यासमोर काही न सुचतं !

नुसतच एकमेकांकडे पहात, निरखत

जे सांगायच ते गुपित राहतं !



तसा मैत्रिणींशी मनमोकळा असतो पण

तिला पहाताच मी का गोंधळतो ?

इतर सर्व काही सांगतो पण

प्रेम तिच्यावरचे सांगण्यास का बावचळतो ?



भाव मनातले तिला समजावे म्हणून

शब्दातून कवितेच्या तिला स्पष्ट कळवितो !

कविता वाचून गालात खुदकन हसून

आनंदाने बिलगते असे स्वप्न पहातो ... !


--- संजय कुलकर्णी .

वाट पाहशील हमखास ...!




प्रेम नाही म्हणत

नातं तोडलं तरी ,

प्रेम माझे कधी

कमी होत नाही !



भेटू नकोस मजला

तू म्हंटलेस तरी ,

सवय लागली मनाला

तुज विसरायचे जरी !



भंगले स्वप्न प्रेमाचे

गैरसमजातून जरी एकवार ,

हटलो नाही अपयशातून

आयुष्यात मी आजवर !



अजून आहे आंस मज

हृदय परिवर्तनाची तुझ्या ग,

निराश केलेस जरी आज

मानशील प्रियसखा उद्या ग !



माझ्या खऱ्या वचनांवर

बसेल तुझा विश्वास

कधीतरी पश्चतापून स्वत:वर

वाट पाहशील हमखास ... !!!



---संजय कुलकर्णी.


Monday, May 2, 2011

स्वप्न ... न साकारलेले ...!



सहज फिरताना अवचित तू समोर यावे ,

'चल-चित्र ' विसरलेल्या क्षणांचे डोळ्यासमोर का यावे ?


पुन्हा त्या 'कटु-मधुर' आठवांनी मजला घेरावे ,

हृदयीच्या त्या घावांस मी का कवटाळावे ?


भेटणे वियोगणे हा नियतीचा खेळ आहे ,

प्रारब्धातील मम दु:ख्खास कोण टाळू पाहे ?


सुख दुख्ख आयुष्यात येत जात असतात ,

ऋणानुबंध कुठे कुणाचे माहित का असतात ?


स्वप्न तू माझे मी मानले मनात ,

सारी स्वप्ने जीवनात सत्य कुठे होतात ?


---संजय कुलकर्णी.

नात तुझं माझं असं असावं ... !



नातं तुझं माझं

जगावेगळ असावं !

काही केल्या कुणा

न समजावं !


नसावे कसलेच बंधन

कुणाचेहि अनुमोदन !

असावे एकमेकांच्या खुशीन

प्रितीच सहजीवन !


दोन अंतरातून एक

प्रेम जाणणार !

दोन मुखातून एक

शब्द वदणार !


दोन काया परी

एक माया !

दोन दिसाया परी

एक आत्मछाया !


दोघांच्या हृदयात प्रेम

कळीगत उमलावं !

दोघांच्या आयुष्यात ते

प्राजक्तासम बहरावं !

दोघांच्या डोळ्यात मधु

स्वप्न दिसावं !

दोघांच्या जीवनात जणु

आनंदवन सजावं ...!!

---संजय कुलकर्णी.