Popular Posts

Thursday, December 15, 2011

साथ जन्मभराची ...


साथ जन्मभराची ...




भावनांस शब्दांच्या दाद दे
काव्य माझे वाचल्यावर ,


प्रेमास हृदयीच्या साद दे
मन माझे जाणल्यावर !


अंतरबाह्य मला समजून घे
मनात मला वसविल्यावर ,


साथ मला जन्मभराची दे
जोडीदार मला मानल्यावर ...!!


--- संजय .

मन माझं ...


मन माझं ...



मन माझं असलं तरी
तुझ्याच विचारात सतत असतं ..



जीव माझा असला तरी
तुझ्यात खरंच गुंतलेलं असतं ,



तू खुलणार म्हणून तर
प्रत्येक चारोळी तुला ऐकवतो ..



तू न वाचल्यावर मात्र
चारोळीतील शब्दांबरोबर उदास होतो !!



--- संजय .

समाधी ...!



वेगळ्याच इशार्यांनी डोळ्यांनी खुणवताना

हसले गालातून खळ्यात गुंतवताना

लाजले विनाकारण मिठीत जाताना

हर्षले अंतरातून ओठांस जुळताना ..!!




शिरले कुशीत रोमांचित होताना

अबोल शब्दांनी स्पर्षांनी बोलताना

अधीर मनाने बंद-कवाड खुलताना

आरक्त तनांनी उन्मत्त झोंबताना ..!!




रती तालावर मदन डोलताना

वेणू सुरावर एकत्र झुलताना

कापूर कायांनी शांतवून विरताना

लागली समाधी कोंबडा आरवताना ...!!



--- संजय कुलकर्णी .

प्रेमास साकारणे ...!!


प्रेमास साकारणे ...!!



छंद आहे मला
प्रेमात तुझ्या पागल होण्याचा ,
सवय आहे तुला
नाकारून मला नादी लावण्याचा !



ना भेटणे लिहिणे
क़ा तरी असे शोधणे ,
पाहिल्यावर एकमेकांसी मात्र
क़ा बरे अनोळखी वागणे !



खट्याळ खोचक नजरेने
मुद्दामून तिरकस तुझे बोलणे ,
गप्प राहिल्यावर ऐकवणे
सहजच चीडविणारे तुझे टोमणे !



नाही म्हणायला समोर आल्यावर
हासून दिलखेचक पाहणे ,
दु:ख्ख मनातले ना सांगणारे
रोखून मनवेधक बहाणे !


रागावल्यावर नेहमीची तुझी
लाडीगोडी अन साखर पेरणी ,
दुराव्यात रुजली माझी
अबोल प्रीतीची अमर कहाणी !



तुला ना कळले मला ना वळले
जगाने मात्र सारे जाणले ,
नाही नाही म्हणत नकळत माझ्यात तू
पाहिले तुझ्या प्रेमास साकारणे ...!!



--- संजय कुलकर्णी .

गाशील का मजबरोबरी ...?



गाशील का मजबरोबरी ...?



आठवांची लड जशी ..
घरंगळली माझ्या मनातुनी ,
आसवांची सर कशी ..
ओघळली माझ्या डोळ्यांतुनी ...!



दाटलेले भाव सारे ..
ओतले मी शब्दातुनी ,
दडविलेले प्रेम सारे ..
वर्षले मी गीतातुनी ...!



सहजीवनाचे स्वप्न पहाटेचे..
साकारशील का खरोखरी ,
मधुमिलनाचे गीत प्रेमाचे..
गाशील का मजबरोबरी ...!!


--- संजय कुलकर्णी .

तुझे प्रेम ...



तुझ्या प्रेमाबद्दल कितीही बोललो

तरी सांगायचं राहून जातं ,

तुझ्या प्रेमात कितीही नाहलो

तरी भिजायचं राहून जातं ..!!




तुझ्या प्रेमाचे क्षण

संपू नयेसे मनोमन वाटतात ,

तुझ्या विरहाचे क्षण

येऊ नयेसे खरोखर वाटतात ..!!




तुझ्या प्रेमाची अद्रुश्य सावली

ऋणानुबंधे मजला अशी मिळाली ,

परिस्थिती बिकट असहय्य उन्हाळी

सहवासाने तुझ्या सहजी पळाली ..!!



---संजय कुलकर्णी .

काही केल्या ...


काही केल्या ...



काही माणसं ...
काही केल्या ...विसरता येत नाहीत ,

आठवणी त्यांच्या ...
काही केल्या ...आयुष्यातून जात नाहीत ..!!




काही संबंध ...
काही केल्या ...आपणास दुरावत नाही

जिव्हाळा त्यांचा
काही केल्या ...जीवनातून आटत नाही ...!!




काही व्यक्ती ...
काही केल्या ...आपणास समजत नाहीत ,

स्वभाव त्यांचे
काही केल्या ...काही उमजत नाहीत ...!!




काही नाती ...
काही केल्या ...वर्णिता येत नाही ,

प्रेम-माया त्यातील
काही केल्या ...रक्ताच्या नात्यात नाही ...!!




काही क्षण ...
काही केल्या ...मनातून जात नाहीत ,

एकाकी मनात
काही केल्या ...सताविल्याशिवाय रहात नाहीत ..!!



--- संजय कुलकर्णी .

वाट तुझी पाहताना ...


वाट तुझी पाहताना ...



वाट तुझी पाहताना ..
भान वेळेचं रहात नाही ,
कितीही उशीर झाला
तरी तुला भेटल्याशिवाय ...पाय निघत नाही !!



वाट तुझी पाहताना ..
आसावांस रोखता येत नाही ,
लोकांत हसे झाले
तरी तुला पाहिल्याशिवाय ... आसवे थांबत नाही !!



वाट तुझी पाहताना ..
क्षण भेटीचे आठवत राही ,
व्याकुळले तनमन कितीही
तरी तहान मीलनाची ... तृप्त होत नाही !!


--- संजय कुलकर्णी .

तुजला का स्मरते ...?



तुजला का स्मरते ...?



मी हसुनि सर्वांस पाहते
तरी दु:ख्खी जनांस का वाटते ..?


मी स्वत:स किती समजाविले
तरी मनी तुजला का स्मरते ..?


मी रोखते बंध भावनांचे
तरी नयनांतून पूर कसे वाहते ..?


मी ढाळते अश्रू मूकपणे
तरी सारया जगास कसे कळते ..?


मी टाळते वाट विरहाची
तरी पाऊल तिकडे का वळते ..?


-- संजय कुलकर्णी .

Sunday, November 6, 2011

ती प्रिया मनमोहिनी ....!!





ती हळवी हसरी ,
ती मनस्वी गाणारी ..!

ती स्वप्नाळू मायाळू ,
ती ती प्रेमाळू लाजाळू ..!

ती खोडकर बंडखोर ;
ती संशयखोर भांडखोर .. !

ती चांदण्यात विहरणारी,
ती पावसात बहरणारी .. !

ती भावनांनी भिजलेली,
ती आवेशांनी फुललेली .. !

ती बोलण्यात धारदार
ती ज्वलंत निखार .. !

ती प्रीतीचा आविष्कार
ती क्रांतीचा चमत्कार .. !

ती मदभरी बेधुंद
ती सौंदर्याने बेबंध .. !

सहवास तिचा हवाहवासा,
तनमनावर मोरपीस जसा ...!

ती प्रिया मनमोहिनी
ती कविता मनस्विनी ... !!


---संजय कुलकर्णी.




प्रेमापेक्षा श्रेष्ट मैत्री असते
एकमेकांच्या भावना जाणून
त्या प्रमाणे वागण्याची
सवय मैत्रीत लागते ...!


सुख दु:ख्खात नकळत
एकमेकां जवळ येवून
त्या शेअर करण्याची
प्रवृत्ती मनास लागते ...!


एकमेकांशिवाय करमेनासे वाटून
हळू हळू दोघांत
जीवनभर साथ देण्याची
इच्छा निर्माण होते ...!


आवड निवड समजून
मैत्रीत मन जुळून येते ,
मैत्री प्रेमात बदलून
नाते जन्मभर टिकते ....!!


--- संजय .

अनोखे नाते ...!!





ऋणानुबंध तुझे माझे
अतूट अखंड असे ,
जाणून तुझ्या मनीचे
बोलतो तुला हवेहवेसे ..!!


आठवांनी माझ्या जसे
पाणावती डोळे तुझे ,
निमिषार्धात जाणून कसे
ओघळती अश्रू माझे ..!!


कोसो अंतरावरूनही सखये
प्रेमबंध जुळले कसे ?
पाहून नात्यास अपुले
राधा-कृष्ण मनोमनी हासे ...!!


--संजय कुलकर्णी .



शब्द उनके

दिलको छू लेते है
और बार-बार सुनने
के लिए मन तरसते है ...!!

नजर उनकी
शरमा कर झुक जाती है
और बार-बार देखने
को आँखे तरसते है ...!!


हसकर वो
हमेशा चले जाते है
और बार बार मिलने
को इन्तजार करवाते है ...!!


याद से वो
हमको हरपल सताते है
और बार-बार सपनोमे आकर
मिलने की आस लगाते है ..!!


संजय कुलकर्णी.
प्रिया स्वप्नावून गेली ...!!





आठवणीत तुझिया
रंगून सांज गेली ,
अंगांग मोहरवून
प्रीत आठवून गेली ..!!


जरी चंद्रापलीकडे
असले घर माझे ,
परी चांदणीकडे
असते मन माझे ..!!


अशा सांजवेळी
रातराणी गंधवून गेली ,
अशा एकांतवेळी
प्रिया स्वप्नावून गेली ...!!


-- संजय.



सुंदर दिसतेस तू
मोहक हसतेस तू
कसे टाळू पाहण्याचे तुला
चित्त माझे चोरलेस तू ...!!


लाघट बोलतेस तू
लाजत पाहतेस तू
कसे सांगु स्पष्ट तुला
मन माझे जिंकलेस तू ...!!


मुलायम स्पर्षतेस तू
हळुवार चुंबतेस तू
कसे सांगु हाल तुला
तन माझे मोहरतेस तू ...!!


रात्रभर तळमळवतेस तू ...
दिनभर झुरवतेस तू
कसे सांगु प्रेम तुला
जाणूनही कसे विचारतेस तू ...?


--संजय कुलकर्णी .


आगंतुक पाउस ...!




शिरशिरी यावी अंगांगात
रात्रीच्या आगंतुक पावसाने ,
निमित्त साधून साजणाने
बाहुपाशात घ्यावे आवेगाने !


झंकारावे तन मन
सुगंधित गडगडाच्या पावसाने ,
रोम-रोम उन्मदावे वार्यासम
मधाळ रसभर्या चुंबनाने !


भिजवून जावे मुक्तपणे
उन्मादून सोसाट्याच्या पावसाने
तहानलेल्या धरतीस तृप्तवावे
पहाटेस थांबलेल्या पावसाने ...!!


---संजय कुलकर्णी.

स्वप्नांचा गाव ....



अजूनही साजणे सारे आहे तुझे
प्रेम माझे तू जाणले कुठे ..?


विश्वास हाच खरा प्रेमाचा पाया
तुझ्याशिवाय नाही मी कुणाचा राया ..!

राणीशिवाय असतो का कुणी राजा
उगा दु:ख्खाचा का करतेस गाजावाजा ..?


गेली नाही सखये वेळ अजून
धावत ये प्रिये संशयास टाळून ..!


अर्धा राहिलेला पूर्ण करू डाव
सत्यात साकारू दोघांच्या स्वप्नांचा गाव ..!!


--- संजय कुलकर्णी .

Monday, October 10, 2011

प्रेम करणे न्हवे गुन्हा ...





प्रेम करणे न्हवे गुन्हा ,
भावना लपविणे खरा गुन्हा !


प्रेम कधी ना हरते ,
प्रेम कधी ना संपते !


प्रेम परमेश्वरी निर्मळ भावना ,
बोलण्यास मुक्तपणे का डरतो मना ?


विघ्ने प्रेमात आणणारे ,
कालही होते सदैव असणार ते !


परिणामांना जो अंतरी घाबरतो ,
तो प्रेम कसा करू शकतो ?


विश्वास असेल जर तुझ्या प्रेमावर ,
सहाय्य होईल नियती प्रेम जिंकण्यावर ...!!!


-- संजय कुलकर्णी .

Sunday, October 9, 2011

कातरवेळी ...






कातरवेळी एकाकी मनी
वार्या संगे धुंद रातराणी ,
आणती तुझ्या आठवणी
असशील तशी ये धावुनी ..!



विरह तुझा साजणी
सांग कसा साहू मी ?
तुझ्याशिवाय ह्या जीवनी
नाही कोणी मम हृदयी ..!



तुझ्या सहवासात सखी
होतो तनमनी मी आनंदी ,
फुलबाग प्रीतीची फुलविणारी
राधाराणी ' प्रिया ' ह्या कृष्णाची ..!!


---संजय.

मनमोहिनी ...






दूर जेव्हा तू जातेस

तेव्हा मूर्ती तुझी

माझ्या मनात वसते

' सुहास्य-वदने ' तुला स्मरण्याचे

छंद जीवाला लागते

मूर्तीस तुझ्या पाहताना

आश्चर्यचकित होऊन जाते

मूर्तीतून मला बघुनी

लाजून तू हासतेस

अन का हसलीस

ह्या विचारात दिनभर

मन माझे हरवते ..!!


---संजय कुलकर्णी.

मैत्रीस कधी ना अंतरणार मी ..!!






मैत्रीत सुद्धा खरं प्रेम असतं
मनमोकळं मैत्रीत बोलायचं असतं ,
एकदा आपलं मानल्यावर मनातलं
सारं काही सांगायच असतं ..!



होऊन भावानातूर वाटले तुला कधी
मिठीत शिरून मनास शांत करण्याची ,
शांतवीन तुजला मी हृदयीच्या प्रेमानी
फिकीर न करता बेदरकार समाजाची ..!



खात्री बाळग तू माझी नेहमी
सखी मानतो ग तुजला मी ,
गैरफायदा मैत्रीचा कधी ना घेणार मी
विश्वासभंग तुझा कधी ना करणार मी ..!



कुठल्याही नात्यात असणार नाही
असे प्रेम माझ्या मैत्रीत देईन तुला मी ,
साथ तुझी आयुष्यात कधी ना सोडणार मी
अनमोल मैत्रीस कधी ना अंतरणार मी ...!!


--- संजय .

स्वप्नसुंदरी प्रियंवदा ...!!






पहाटेस स्वप्नी तू भेटून जा
प्रीत स्वप्नातील जीवनी उतरवून जा ,


धुंद श्वासांनी स्वप्नात मोहरवून जा
झिंग स्पर्शाची भेटून उतरवून जा ,


बोल प्रेमाचे स्वप्नी पढवून जा
युगुलगीत सांजवेळी मुक्याने गाऊन जा ,


मदभर्या अदांनि तुझ्यां मंत्रवून जा
तुषार्त तनमनास एकवार तोषवून जा ,


अप्सरेसम यौवनाने स्वप्नात दर्शवून जा
स्वप्नसुंदरी मम प्रियंवदा होऊन जा ..!!


--- संजय कुलकर्णी .

तुझ्यासवे असेन मी ..






उदास होता निमिषात
येऊन तुझ्या मनात
साहून व्यथा हृदयात
तुझ्यासवे रडेन मी ...!



एकाकी वाटता जीवनात
जागवून जुन्या आठवांत
मोहरवून तुजला क्षणात
तुझ्यासवे हसेन मी ...!



बोलावेसे तुला वाटता
लेखणी होऊन हातात
मनमोकळे करून काव्यात
तुझ्यासवे व्यक्तेन मी ...!!



--संजय कुलकर्णी .

दिखावा आहे ...!




गर्दीत असलेला प्रत्येक जण एकटा आहे

सर्वांमध्ये रमणारा मनातून मात्र पोरका आहे ...!



सभोवताली सुंदर कागदी फुलांचा ताटवा आहे

नात्यांच्या फाफट पसार्यात प्रेमाचा दिखावा आहे ...!



कुणाला सांगायचे जो तो मागणारा आहे

चेहरा हसरा पण डोळे पाणावलेला आहे ...!



म्हणायला हे जीवन आनंदाचा मेळा आहे

हसत हसत दु:ख्खे भोगण्याचा सोहळा आहे ...!



जन्मापासून मरणापर्यंत सतत आकांक्षांचा पाठपुरावा आहे

आत्म्यास विसरून शाररीक आकर्षणाचा बोलबाला आहे ...!


---संजय कुलकर्णी .

भेट ... तिची माझी !!



त्या दिवशी संध्याकाळी

नेहमी प्रमाणे ती उशिरा आली ..!



आल्या आल्या म्हणाली कशी

लवकर जायचेय, थांबायला वेळ नाही ..!



ऐकून तिचे माझी सटकली

वेड लागले अन हिच्यावर लाईन मारली ..!



मीही चिडलो बराच बोललो

आलीस कशाला मग गेलीस उडत ..!



वागण्यावर तिच्या जाम वैतागलो

तोंडे फिरवून दोघेही बसलो धुसमुसत ..!



नाही येणार ती म्हणाली

जाण्याआधी एक 'वचन दे ' गुरगुरली ..!



थांबायला तुला वेळ नाही

अन द्यायला मजकडे राहिलेच नाही !



जास्त नको मला काही

साथ दे प्रेमाने जन्मभरा साठी !



पाहून तिच्या डोळ्यातील पाणी

पारा रागाचा माझाही खाली जाई ..!



दिलेले वचन मोडत नाही

प्रत्येक जन्मात तूच माझी राणी ..!



जवळ येऊन रडू लागली

तुझ्याशिवाय सखया माझे कुणी नाही ..!



निघताना एकत्र ...मनात आले

अरे, भेटण्याचे उद्दिष्ट सफल झाले ...!!



---संजय कुलकर्णी .

अजून बाकी ...!



सांज जाहली, ओढ लागली पण

ती येणे अजून बाकी ,


खुप बोलली, लाजून हासली पण

मन कळणे अजून बाकी ..!




लग्न झाले, मुले झाली पण

प्रेम करणे अजून बाकी ,


दिन गेले, वय सरले पण

जीवन जगणे अजून बाकी ..!




लढे झाले, स्वातंत्र मिळाले पण

भरभराट होणे अजून बाकी ,


नेते जाहले, पक्ष निघाले पण

'जन-नेता' येणे अजून बाकी ..!




घोषणा गाजल्या, सत्ता मिळाल्या पण

वाली जनतेचा अजून बाकी ,


उपोषणे गाजली, आशा जागली पण

भ्रष्टाचार रयतेचा अजून बाकी ..!




शोध लागले, सुखसोयी आल्या पण

सुख लाभणे अजून बाकी ,


इंटरनेट आले, जग जवळी आले पण

मने दुरावणे अजून बाकी ....!!



---संजय कुलकर्णी .

सर आसवांची ...




कातरवेळी सर आसवांची

पापणीतून टचकन वाहत जाई ...



तुझ्या आठवांची माळ मोत्याची

टपटपत घरंगळत ओघळून जाई ...



हळवे क्षण दोघांनी गुंफलेले

मन हेलावून थेंबातून जाई ....



त्याच वृक्षतळी दररोज माझी

पाऊले जशी आपसूक जाई ...



सांजवेळ अशीच सुजलेल्या नयनांनी

जखम तुझ्या विराहाची भळभळून जाई ...!!



-- संजय कुलकर्णी.


मानेल तरी कोण ...?



शब्द गीतातील गुणगुणती सारे जण

पण भाव तयातील ना जाणती कोण ..!



कर्कश्य संगीताच्या ह्या जंजाळात

हरवले गीतातले मम मनीचे बोल ..!



युग युगांपासून लागली सगळ्यांस

अधिक मिळविण्याची न संपणारी ओढ ..!



नित्य नवे करती वैदन्यानिक शोध पण

हरविली मन:शांती न जाणे कुठे कोण ..!



आहे तयाचा एक अंश मी

वसतो माझ्यात जरी तो ..!



दिखाव्यात भ्रमलेल्या प्रत्येकास पण

कळेल कसे अन मानेल तरी कोण ...!!



---संजय कुलकर्णी .