Popular Posts

Sunday, October 9, 2011

अजून बाकी ...!



सांज जाहली, ओढ लागली पण

ती येणे अजून बाकी ,


खुप बोलली, लाजून हासली पण

मन कळणे अजून बाकी ..!




लग्न झाले, मुले झाली पण

प्रेम करणे अजून बाकी ,


दिन गेले, वय सरले पण

जीवन जगणे अजून बाकी ..!




लढे झाले, स्वातंत्र मिळाले पण

भरभराट होणे अजून बाकी ,


नेते जाहले, पक्ष निघाले पण

'जन-नेता' येणे अजून बाकी ..!




घोषणा गाजल्या, सत्ता मिळाल्या पण

वाली जनतेचा अजून बाकी ,


उपोषणे गाजली, आशा जागली पण

भ्रष्टाचार रयतेचा अजून बाकी ..!




शोध लागले, सुखसोयी आल्या पण

सुख लाभणे अजून बाकी ,


इंटरनेट आले, जग जवळी आले पण

मने दुरावणे अजून बाकी ....!!



---संजय कुलकर्णी .

No comments:

Post a Comment