
गर्दीत असलेला प्रत्येक जण एकटा आहे
सर्वांमध्ये रमणारा मनातून मात्र पोरका आहे ...!
सभोवताली सुंदर कागदी फुलांचा ताटवा आहे
नात्यांच्या फाफट पसार्यात प्रेमाचा दिखावा आहे ...!
कुणाला सांगायचे जो तो मागणारा आहे
चेहरा हसरा पण डोळे पाणावलेला आहे ...!
म्हणायला हे जीवन आनंदाचा मेळा आहे
हसत हसत दु:ख्खे भोगण्याचा सोहळा आहे ...!
जन्मापासून मरणापर्यंत सतत आकांक्षांचा पाठपुरावा आहे
आत्म्यास विसरून शाररीक आकर्षणाचा बोलबाला आहे ...!
---संजय कुलकर्णी .
No comments:
Post a Comment