Popular Posts

Sunday, October 9, 2011

प्रिया ... माझी कविता !!






कधी ना वाटले लिहीन कविता
तुला भेटता बघ वाहिली शब्द-सरिता ..!



कवीता माझी प्रिये तुजसाठी लिहिलेली ,
अबोल प्रीत मी तयांत वर्णलेली ..!



शब्द जरी होते यमकानुरूप पेरलेले
भाव मात्र मम प्रेमस्वरूप दडलेले ...!



कविता माझी स्वप्नील, प्रेमात रंगलेली ,
सौंदर्य खुणांनी प्रियेच्या ओतप्रोत सजलेली ...!



कविता माझी शृंगारात नखशिखांत भिजलेली,
मधुर अमृतप्रेमाने स्वर्गीय सुखात नाहलेली ...!!



--- संजय कुलकर्णी .

No comments:

Post a Comment