Popular Posts

Friday, March 23, 2012

वर्षाव असावा ...


वर्षाव असावा ...



प्रेमाचा डाव, बहाणा असावा
तरी भावनेचा का ओलावा असावा ?


तुझ्या मनी, सदैव विचार माझा
हृदयीचा खरा ध्यास असावा !


तुला गाठून पुसावा अर्थ तेव्हा ,
तुझा अबोल निरगस हावभाव असावा !


" मजशिवाय किती सखया तुला ? "
तुझा मैत्रीआडून प्रेमाचा प्रस्ताव असावा !


तुझ्या बोलण्यातल्या निर्मळ भावनांचा
सदैव जीवनात वर्षाव असावा ...!!


---- संजय कुलकर्णी .

का रडत रहावे ...?


का रडत रहावे ...?



मनाप्रमाणे ना लाभूनही, सुखात मी जगतो आहे
मनासारखे ना मिळाले म्हणुनी, मी का सलतो आहे ?



बहुतांश प्रेम-प्रकरणे अयशस्वी होतात, ठाऊक मला आहे
स्वत:हून खड्ड्यात पडण्यासाठी अजूनही, मी का तळमळतो आहे ?



आनंदात पाहुनि मला मनात , जो-तो जळतो आहे
हातचे सोडून पळत्यामागे तरीही , मी का धावतो आहे ?



जीवन म्हणजे सतत बदल, तत्व मजला ठावे
दु:ख्ख येता अकस्मात निराशुनी, मी का हताश व्हावे ?



जन्मासी येता मरण अटळ, भ्रमण आत्म्याचे जाणावे
ऋणानुबंधाचे भेटणे वियोगणे समजूनही, मी का रडत रहावे ...?


--- संजय कुलकर्णी .

रहस्य ... आनंदी जीवनाचे !


रहस्य ...
आनंदी जीवनाचे !



जीवनाच्या अगम्य प्रवासात
पाहिले काही स्वप्नांचे भास ,

नकळत जुळले आयुष्यात
बंध जन्मांतरीचे प्रेमाचे खास ..!!



एकटा होतो सारया जगात
वाटले कसे माझे निभावणार ?

लुटता सच्च्या प्रेमास जनात
साथीदार कसे ना मिळणार ...?



नि:शंक मनाने निरपेक्ष हेतूने
मैत्र हृदयीचे सर्वात जपता ,

सौख्याच्या आशेने प्रेमाच्या ओढीने
मैफिल ऋणानुबंधाची जीवनी घडतां ..!!



-- संजय कुलकर्णी .

तुझी अदा ...


तुझी अदा ...



नजरेस तुझ्या शिस्त लाव जरा
पाठलाग माझा ते सदोदित करतात ,

नजरेस माझ्या भिडल्यावर का उगाच
खरा भाव नजरेतला साळसूदपणे बदलतात ...!!



हसण्यास तुझ्या लगाम घाल जरा
गालात हासून खळ्यामध्ये मला गुंतवतात ,

तारीफ तयांची केल्यावर का उगाच
भाव भोळा चेहऱ्यावर निरागसतेचा आणतात ..!!



लाजण्यास तुझ्या आवर घाल जरा
मोहिनी सोज्वळतेची माझ्या मनावर घालतात ,

जिंकलेस मला म्हंटल्यावर का उगाच
अबोलपणात तुझ्या मला प्रेमात पाडतात ..!!


--- संजय कुलकर्णी.

ओढ ...


ओढ ...



आनंदात असतो सदैव हसतो माझ्या सुखी संसारात
काही कमी तरीही वाटते का मला जीवनात ?


मित्र मैत्रिणी नातेवाईकांना कमतरता नाही गोतावळ्यात
उणीव कुणाची सतत भासते असतो जेव्हा एकांतात !


प्रत्येक क्षण आस लावतो फुलवितो स्वप्नास मनात
साकारली जरी सत्यात तरीही खंत उरते अंतरात !


जे ना इच्छिले ते मिळाले मला जरी प्रत्यक्षात
अजून मिळावे असे वाटते तरीही क्षणो क्षणात


भोग भोगले जीव शिणला संपला जन्म मिळविण्यात
ओढ आत्म्यास तरीही लागते का पुनर्जन्म घेण्यात ..?


--- संजय कुलकर्णी .

सत्यस्वरूप स्वप्न ..!!!


सत्यस्वरूप स्वप्न ..!!!



आनंदाने आज मी बहरून गेलो
रामप्रहरी तुजला आठवून गेलो ..


पहाटे दिसलीस तू स्वप्नात माझ्या
रोमांचित स्पर्षंगंधात भारून गेलो ..


तू हुरहूर मनास लावून गेली
मी अतृप्त तहानलेला राहून गेलो ..


आठवांत दिनभर मी बुडून गेलो
सर्वांच्या नजरेत मी स्वप्नवेडा झालो ..


अकस्मात सांजवेळी तू येवून पुसले
विसरलास का मज स्वप्नातील राजकुमारा ?


अविश्वासुनी सत्यास मी स्वप्नात गेलो
मंजुघोषा वृत्तात सहजी बरसू लागलो ..!!!


--- संजय कुलकर्णी .

माझा छंद ..!!


माझा छंद ..!!



हळव्या मनावरी प्रेमाचा प्रभाव आहे
प्रेमात राहण्याचा माझा स्वभाव आहे !


सामान्यांतही मला असामान्यत्व दिसते आहे
सौंदर्यास वाखाणण्याचा माझा गुणधर्म आहे !


अपयशांची गाठ नियमित होत आहे
चुकांतून सुधारण्याचा माझा प्रयास आहे !


भडीमार दु:ख्खांचा माझ्याही जीवनात आहे
दु:ख्खात हासण्याचा मला नाद आहे !


स्वप्नवत जीवनास सत्यात भोगत आहे
स्वप्नात रमविण्याचा मला छंद आहे !!


--- संजय कुलकर्णी .


स्मृतीतून सर्वांच्या वसावे ..!!


स्मृतीतून सर्वांच्या वसावे ..!!



निसर्गास नम्रतेस नमावे
भविष्यास स्वप्नी पहावे,
प्रयत्नांस ना टाळावे
आव्हानांसी सदैव झेलावे ..!


चुकांपासून सतत शिकावे
स्तुतीसुमनांनी ना हुरळावे,
टीकेस सकारात्मक पहावे
अपयशास ना घाबरावे ..!


सौंदर्यास मुक्तपणे वाखाणावे
कुरुपतेस ना हिणवावे,
प्रत्येकातील चांगले स्वीकारावे
दोषांस कटाक्षाने दुर्लक्षावे ..!


सर्वांसी प्रेमाने बोलावे
सर्वांत मिसळूनी असावे,
मनमोकळे सर्वांशी वागावे
आनंदास इतरात लुटावे ..!


हवेहवेसे प्रत्येकास वाटावे
माणसांत देवास भेटावे,
सुखास्तव इतरांच्या झटावे
स्मृतीतून सर्वांच्या वसावे ..!!


--- संजय कुलकर्णी.

एकांत ...


एकांत ...



मी अन माझा एकांत
साथीला असते मन प्रशांत,
जगास वाटते बसला निवांत
अंतरी विचारांचा सागर अशांत ..!


मी अन माझा एकांत
साथीला तुझा सहवास छान,
रमतो आठवांत होऊन सुशांत
विसरून स्थळकाळ दुनियेचे भान ..!!


मी अन माझा एकांत
साथीला तुझे स्पर्शगंध तुषार ,
भिजतो अमृतानंदात विसरून दु:ख्खांत
वाहतो नयनांतून मोत्याची अश्रूधार ..!!!


-- संजय कुलकर्णी .

जीवन ...


जीवन ...



भाव आहे सूर आहे
संगीत आहे जीवन !


आस आहे ध्यास आहे
प्रयास आहे जीवन !


स्वप्न आहे ध्येय्य आहे
विश्वास आहे जीवन !


अपयश आहे अवहेलना आहे
खडतर आहे जीवन !


स्वप्नभंग आहे विरह आहे
दु:ख्ख्मय आहे जीवन !


योगायोग आहे ऋणानुबंध आहे
पुनर्मिलन आहे जीवन !


सुंदर आहे कुरूप आहे
वैविध्यमय आहे जीवन !


आज आहे उद्या न्हवे
अनिश्चित सारे जीवन !


जन्म आहे मृत्यू आहे
अमर आत्मप्रवास जीवन ..!!!


-- संजय कुलकर्णी .

नादमय स्वरानंद गझल ... !!



भावनांचा उन्माद गझल !
उत्स्फूर्त आनंद वर्षाव गझल ..!!


वेदनेची आर्त साद गझल !
दु:ख्खाचा शिडकाव गझल ..!!


ज्वलंत आशयघन गझल !
मुर्दाडास जीवन प्राण गझल ..!!


शोभिवंत साज न्हवे गझल !
मूर्तिमंत शब्दसौंदर्य गझल ..!!


नाजूक शृंगारमय गझल !
तृप्तीचा उन्मत्त चित्कार गझल ..!!


कृष्ण्प्रेमी राधामय प्रेमातूर गझल !
भावभीन मीरेसमान गझल ..!!


भावहीन शाब्दिक-मोट न्हवे गझल
नादमय स्वरानंद गझल ..!!



-- संजय कुलकर्णी .

नादावून कोण गेली ..?


नादावून कोण गेली ..?



अप्सरीय सौंदर्यात मज, खुळवून कोण गेली
कमनीय बांध्यात मन, गुंतवून कोण गेली ? = धृ =



पाहणे तिचे नाशिले, लाजणे हि रसिले
बोलक्या गूढ नजरेने, खुणवून कोण गेली ?


अप्सरीय सौंदर्यात मज, खुळवून कोण गेली ? = १ =



मदभरे ते स्मितहास्य, आव्हान जसे प्रीतीचे
मनमोहक खोल खळीत, बुडवून कोण गेली ?


अप्सरीय सौंदर्यात मज, खुळवून कोण गेली = २ =



वाटून दिवास्वप्न मनीचे, विसरलो मी तेव्हाच
वळून मागे पाहण्यात, नादावून कोण गेली ?


अप्सरीय सौंदर्यात मज, खुळवून कोण गेली = ३ =


--- संजय कुलकर्णी .

प्रेमाचा विश्वास देते ...!!


प्रेमाचा विश्वास देते ...!!



मंत्रमुग्ध सहवास देते, सर्वस्व माझे तुला देते
असशील जेथे सखया, मम प्रेमाचा विश्वास देते !! = धृ =



शांत शीतल उत्तररात्री,
हळुवार तुझ्या स्वप्नात येते
मोहरवून हरेक गात्री, मी तुझ्यात एकरूप होते,

प्रीतीच्या पावलांनी सहयात्री, होऊन तुला साथ देते
असशील जेथे सखया, मम प्रेमाचा विश्वास देते ..!! = १ =



जन्मांतरीचे संग अपुले, अंतरी तू समजून घे
आतुरलेले मन माझे, वेढूनि बाहूत उमजून घे,

अमृतपान जीवनाचे करते, प्रेमानंद उत्स्फूर्त तुला देते
असशील जेथे सखया, मम प्रेमाचा विश्वास देते ..!! = २ =



कुठेही तू असलातरी, तुझ्यात मी खात्री देते
कुठेही मी वसलेतरी, मनात तू वचन देते,

कुणालाही हेवा वाटेल, अशा प्रेमाची साक्ष देते
असशील जेथे सखया, मम प्रेमाचा विश्वास देते ..!! = ३ =



मंत्रमुग्ध सहवास देते ,सर्वस्व माझे तुला देते
असशील जेथे सखया, मम प्रेमाचा विश्वास देते ..!!


--- संजय कुलकर्णी .


रेशीमगांठ ..!!


तुझ्या प्रेमळ साथीचा भरवसा,
मज लाभला जीवनी कृष्णावाणी

तुझ्या प्रेमात नाहिली मी,
अरे जशी राधा प्रेमदिवाणी ..!!



तुझ्या आठवांत रमते मी,
भान हरपून तिन्ही त्रिकाळी

तुझ्या मिलनाच्या गोडीने मी,
विसरून सर्वास लाजते भलत्यावेळी ..!!



अथांग सागरातील नदीचे पाणी ,
वेगळाले करू शकते का कोणी

प्रीत माझी सखया तशी,
सगुण कुडीतील निर्गुण चक्रपाणी ..!!



रीत जगावेगळी प्रेमाची माझी ,
नाकळे तुजवर कशी जडली

नजर भेटीत अचानक तुझी ,
रेशीमगांठ जन्मांतरीची मजसी घडली ..!!


-- संजय कुलकर्णी .

लपविणार किती ...?


लपविणार किती ...?


मनात तुझ्या ..
मीच असशी परी
मनी तुझ्या संशय किती ..?


स्वप्नात माझ्या ..
तूच दिसशी परी
सत्यात भेटण्याचे टाळशी किती .?


तुझ्यात माझा ..
जीव गुंतवीशी परी
खेळवीशी मजला नजरेने किती ?


माझ्या तुझ्या ..
दोन आकृती परी
एकरूपत्व अपुले लपविणार किती ...?


-- संजय कुलकर्णी.