
प्रेमाचा विश्वास देते ...!!
मंत्रमुग्ध सहवास देते, सर्वस्व माझे तुला देते
असशील जेथे सखया, मम प्रेमाचा विश्वास देते !! = धृ =
शांत शीतल उत्तररात्री, हळुवार तुझ्या स्वप्नात येते
मोहरवून हरेक गात्री, मी तुझ्यात एकरूप होते,
प्रीतीच्या पावलांनी सहयात्री, होऊन तुला साथ देते
असशील जेथे सखया, मम प्रेमाचा विश्वास देते ..!! = १ =
जन्मांतरीचे संग अपुले, अंतरी तू समजून घे
आतुरलेले मन माझे, वेढूनि बाहूत उमजून घे,
अमृतपान जीवनाचे करते, प्रेमानंद उत्स्फूर्त तुला देते
असशील जेथे सखया, मम प्रेमाचा विश्वास देते ..!! = २ =
कुठेही तू असलातरी, तुझ्यात मी खात्री देते
कुठेही मी वसलेतरी, मनात तू वचन देते,
कुणालाही हेवा वाटेल, अशा प्रेमाची साक्ष देते
असशील जेथे सखया, मम प्रेमाचा विश्वास देते ..!! = ३ =
मंत्रमुग्ध सहवास देते ,सर्वस्व माझे तुला देते
असशील जेथे सखया, मम प्रेमाचा विश्वास देते ..!!
--- संजय कुलकर्णी .
No comments:
Post a Comment