
तुझी अदा ...
नजरेस तुझ्या शिस्त लाव जरा
पाठलाग माझा ते सदोदित करतात ,
नजरेस माझ्या भिडल्यावर का उगाच
खरा भाव नजरेतला साळसूदपणे बदलतात ...!!
हसण्यास तुझ्या लगाम घाल जरा
गालात हासून खळ्यामध्ये मला गुंतवतात ,
तारीफ तयांची केल्यावर का उगाच
भाव भोळा चेहऱ्यावर निरागसतेचा आणतात ..!!
लाजण्यास तुझ्या आवर घाल जरा
मोहिनी सोज्वळतेची माझ्या मनावर घालतात ,
जिंकलेस मला म्हंटल्यावर का उगाच
अबोलपणात तुझ्या मला प्रेमात पाडतात ..!!
--- संजय कुलकर्णी.
No comments:
Post a Comment