Popular Posts

Friday, March 23, 2012

ओढ ...


ओढ ...



आनंदात असतो सदैव हसतो माझ्या सुखी संसारात
काही कमी तरीही वाटते का मला जीवनात ?


मित्र मैत्रिणी नातेवाईकांना कमतरता नाही गोतावळ्यात
उणीव कुणाची सतत भासते असतो जेव्हा एकांतात !


प्रत्येक क्षण आस लावतो फुलवितो स्वप्नास मनात
साकारली जरी सत्यात तरीही खंत उरते अंतरात !


जे ना इच्छिले ते मिळाले मला जरी प्रत्यक्षात
अजून मिळावे असे वाटते तरीही क्षणो क्षणात


भोग भोगले जीव शिणला संपला जन्म मिळविण्यात
ओढ आत्म्यास तरीही लागते का पुनर्जन्म घेण्यात ..?


--- संजय कुलकर्णी .

No comments:

Post a Comment