Popular Posts

Monday, October 10, 2011

प्रेम करणे न्हवे गुन्हा ...





प्रेम करणे न्हवे गुन्हा ,
भावना लपविणे खरा गुन्हा !


प्रेम कधी ना हरते ,
प्रेम कधी ना संपते !


प्रेम परमेश्वरी निर्मळ भावना ,
बोलण्यास मुक्तपणे का डरतो मना ?


विघ्ने प्रेमात आणणारे ,
कालही होते सदैव असणार ते !


परिणामांना जो अंतरी घाबरतो ,
तो प्रेम कसा करू शकतो ?


विश्वास असेल जर तुझ्या प्रेमावर ,
सहाय्य होईल नियती प्रेम जिंकण्यावर ...!!!


-- संजय कुलकर्णी .

Sunday, October 9, 2011

कातरवेळी ...






कातरवेळी एकाकी मनी
वार्या संगे धुंद रातराणी ,
आणती तुझ्या आठवणी
असशील तशी ये धावुनी ..!



विरह तुझा साजणी
सांग कसा साहू मी ?
तुझ्याशिवाय ह्या जीवनी
नाही कोणी मम हृदयी ..!



तुझ्या सहवासात सखी
होतो तनमनी मी आनंदी ,
फुलबाग प्रीतीची फुलविणारी
राधाराणी ' प्रिया ' ह्या कृष्णाची ..!!


---संजय.

मनमोहिनी ...






दूर जेव्हा तू जातेस

तेव्हा मूर्ती तुझी

माझ्या मनात वसते

' सुहास्य-वदने ' तुला स्मरण्याचे

छंद जीवाला लागते

मूर्तीस तुझ्या पाहताना

आश्चर्यचकित होऊन जाते

मूर्तीतून मला बघुनी

लाजून तू हासतेस

अन का हसलीस

ह्या विचारात दिनभर

मन माझे हरवते ..!!


---संजय कुलकर्णी.

मैत्रीस कधी ना अंतरणार मी ..!!






मैत्रीत सुद्धा खरं प्रेम असतं
मनमोकळं मैत्रीत बोलायचं असतं ,
एकदा आपलं मानल्यावर मनातलं
सारं काही सांगायच असतं ..!



होऊन भावानातूर वाटले तुला कधी
मिठीत शिरून मनास शांत करण्याची ,
शांतवीन तुजला मी हृदयीच्या प्रेमानी
फिकीर न करता बेदरकार समाजाची ..!



खात्री बाळग तू माझी नेहमी
सखी मानतो ग तुजला मी ,
गैरफायदा मैत्रीचा कधी ना घेणार मी
विश्वासभंग तुझा कधी ना करणार मी ..!



कुठल्याही नात्यात असणार नाही
असे प्रेम माझ्या मैत्रीत देईन तुला मी ,
साथ तुझी आयुष्यात कधी ना सोडणार मी
अनमोल मैत्रीस कधी ना अंतरणार मी ...!!


--- संजय .

स्वप्नसुंदरी प्रियंवदा ...!!






पहाटेस स्वप्नी तू भेटून जा
प्रीत स्वप्नातील जीवनी उतरवून जा ,


धुंद श्वासांनी स्वप्नात मोहरवून जा
झिंग स्पर्शाची भेटून उतरवून जा ,


बोल प्रेमाचे स्वप्नी पढवून जा
युगुलगीत सांजवेळी मुक्याने गाऊन जा ,


मदभर्या अदांनि तुझ्यां मंत्रवून जा
तुषार्त तनमनास एकवार तोषवून जा ,


अप्सरेसम यौवनाने स्वप्नात दर्शवून जा
स्वप्नसुंदरी मम प्रियंवदा होऊन जा ..!!


--- संजय कुलकर्णी .

तुझ्यासवे असेन मी ..






उदास होता निमिषात
येऊन तुझ्या मनात
साहून व्यथा हृदयात
तुझ्यासवे रडेन मी ...!



एकाकी वाटता जीवनात
जागवून जुन्या आठवांत
मोहरवून तुजला क्षणात
तुझ्यासवे हसेन मी ...!



बोलावेसे तुला वाटता
लेखणी होऊन हातात
मनमोकळे करून काव्यात
तुझ्यासवे व्यक्तेन मी ...!!



--संजय कुलकर्णी .

दिखावा आहे ...!




गर्दीत असलेला प्रत्येक जण एकटा आहे

सर्वांमध्ये रमणारा मनातून मात्र पोरका आहे ...!



सभोवताली सुंदर कागदी फुलांचा ताटवा आहे

नात्यांच्या फाफट पसार्यात प्रेमाचा दिखावा आहे ...!



कुणाला सांगायचे जो तो मागणारा आहे

चेहरा हसरा पण डोळे पाणावलेला आहे ...!



म्हणायला हे जीवन आनंदाचा मेळा आहे

हसत हसत दु:ख्खे भोगण्याचा सोहळा आहे ...!



जन्मापासून मरणापर्यंत सतत आकांक्षांचा पाठपुरावा आहे

आत्म्यास विसरून शाररीक आकर्षणाचा बोलबाला आहे ...!


---संजय कुलकर्णी .

भेट ... तिची माझी !!



त्या दिवशी संध्याकाळी

नेहमी प्रमाणे ती उशिरा आली ..!



आल्या आल्या म्हणाली कशी

लवकर जायचेय, थांबायला वेळ नाही ..!



ऐकून तिचे माझी सटकली

वेड लागले अन हिच्यावर लाईन मारली ..!



मीही चिडलो बराच बोललो

आलीस कशाला मग गेलीस उडत ..!



वागण्यावर तिच्या जाम वैतागलो

तोंडे फिरवून दोघेही बसलो धुसमुसत ..!



नाही येणार ती म्हणाली

जाण्याआधी एक 'वचन दे ' गुरगुरली ..!



थांबायला तुला वेळ नाही

अन द्यायला मजकडे राहिलेच नाही !



जास्त नको मला काही

साथ दे प्रेमाने जन्मभरा साठी !



पाहून तिच्या डोळ्यातील पाणी

पारा रागाचा माझाही खाली जाई ..!



दिलेले वचन मोडत नाही

प्रत्येक जन्मात तूच माझी राणी ..!



जवळ येऊन रडू लागली

तुझ्याशिवाय सखया माझे कुणी नाही ..!



निघताना एकत्र ...मनात आले

अरे, भेटण्याचे उद्दिष्ट सफल झाले ...!!



---संजय कुलकर्णी .

अजून बाकी ...!



सांज जाहली, ओढ लागली पण

ती येणे अजून बाकी ,


खुप बोलली, लाजून हासली पण

मन कळणे अजून बाकी ..!




लग्न झाले, मुले झाली पण

प्रेम करणे अजून बाकी ,


दिन गेले, वय सरले पण

जीवन जगणे अजून बाकी ..!




लढे झाले, स्वातंत्र मिळाले पण

भरभराट होणे अजून बाकी ,


नेते जाहले, पक्ष निघाले पण

'जन-नेता' येणे अजून बाकी ..!




घोषणा गाजल्या, सत्ता मिळाल्या पण

वाली जनतेचा अजून बाकी ,


उपोषणे गाजली, आशा जागली पण

भ्रष्टाचार रयतेचा अजून बाकी ..!




शोध लागले, सुखसोयी आल्या पण

सुख लाभणे अजून बाकी ,


इंटरनेट आले, जग जवळी आले पण

मने दुरावणे अजून बाकी ....!!



---संजय कुलकर्णी .

सर आसवांची ...




कातरवेळी सर आसवांची

पापणीतून टचकन वाहत जाई ...



तुझ्या आठवांची माळ मोत्याची

टपटपत घरंगळत ओघळून जाई ...



हळवे क्षण दोघांनी गुंफलेले

मन हेलावून थेंबातून जाई ....



त्याच वृक्षतळी दररोज माझी

पाऊले जशी आपसूक जाई ...



सांजवेळ अशीच सुजलेल्या नयनांनी

जखम तुझ्या विराहाची भळभळून जाई ...!!



-- संजय कुलकर्णी.


मानेल तरी कोण ...?



शब्द गीतातील गुणगुणती सारे जण

पण भाव तयातील ना जाणती कोण ..!



कर्कश्य संगीताच्या ह्या जंजाळात

हरवले गीतातले मम मनीचे बोल ..!



युग युगांपासून लागली सगळ्यांस

अधिक मिळविण्याची न संपणारी ओढ ..!



नित्य नवे करती वैदन्यानिक शोध पण

हरविली मन:शांती न जाणे कुठे कोण ..!



आहे तयाचा एक अंश मी

वसतो माझ्यात जरी तो ..!



दिखाव्यात भ्रमलेल्या प्रत्येकास पण

कळेल कसे अन मानेल तरी कोण ...!!



---संजय कुलकर्णी .


मैत्रीत हे गैर नाही .. !!



रोजच दोघांनी भेटावे

असे काही नाही ..!



पण दिसल्यावर तू गप्प रहावे

असे काही नाही ..!



गळ्यात गळे घातले पाहिजे

असे काही नाही ..!



पण अनोळख्याप्रमाणे तू वागावे

असे काही नाही ..!



सुख दु:ख्ख्च फक्त वाटावे

असे काही नाही ..!



भेटल्यावर काहीच न बोलावे

असे काही नाही ..!



मैत्रीण आहे म्हणून सारखे भांडावे

असे काही नाही ..!



अपेक्षा मनमोकळे बोलण्याची बाळगावी

मैत्रीत हे गैर नाही ..!!



--- संजय कुलकर्णी .


प्रिया ... माझी कविता !!






कधी ना वाटले लिहीन कविता
तुला भेटता बघ वाहिली शब्द-सरिता ..!



कवीता माझी प्रिये तुजसाठी लिहिलेली ,
अबोल प्रीत मी तयांत वर्णलेली ..!



शब्द जरी होते यमकानुरूप पेरलेले
भाव मात्र मम प्रेमस्वरूप दडलेले ...!



कविता माझी स्वप्नील, प्रेमात रंगलेली ,
सौंदर्य खुणांनी प्रियेच्या ओतप्रोत सजलेली ...!



कविता माझी शृंगारात नखशिखांत भिजलेली,
मधुर अमृतप्रेमाने स्वर्गीय सुखात नाहलेली ...!!



--- संजय कुलकर्णी .

कुणा कसे कळावे ...?




तुझ्या असण्यात माझे पंचप्राण होते
एकत्व काय असते , शब्दात काय वर्णावे ..!


तुझ्या भावविश्वात मीच सदैव होते
मनोमिलन काय असते, जगास काय सांगावे ..?


गुलाबी स्पर्शांचे गालिचे पसरले होते
मदधुंद गात्र होते, पुरावे काय दावावे ..?


बेधुंद श्वासांचे तुफान उठत होते
बेहोष आसमंत सारे, स्वर्गसुख काय असावे .. ?


जवळ तू नसूनी आठवांत रमावे
प्रेम अमर असते , कुणा कसे कळावे .. ?


---संजय कुलकर्णी .

Friday, October 7, 2011

प्रिया ... जिवलग अशी असावी ...!




सखी मज अशी असावी ,
पाहता क्षणी मनात भरावी
हास्य वदने आनंद फुलविणारी
जीवनाची एकमेव दिशा व्हावी !

जिवलग एकमेव ती असावी !



दिनरात मम मनी वसणारी
आस भेटण्याची जिची लागावी
गुज अंतरीचे सांगितल्या शिवाय
चैन मनास कधी ना वाटणारी !

मनकवडी अशी ती असावी !!



चुकल्यास मम कान धरणारी
चुकल्यास स्वत: क्षमा मागणारी
समजावून प्रेमाने आधार देणारी
मस्करीत कधी मज चीडविणारी !

आनंदमयी जीवनाची प्रेरणा व्हावी !!



आतुरतेने माझी वाट पाहणारी
भेटताच प्रश्नांची सरबत्ती लावणारी
बोलण्यात मजला गप्प करणारी
निरोप घेता डोळे पाणावून,
" पुन्हा कधी भेटशील ? " प्रेमाने मज विचारणारी


जिवलग माझी ' प्रिया ' ती असावी ...!!



--- संजय कुलकर्णी.