
नादावून कोण गेली ..?
अप्सरीय सौंदर्यात मज, खुळवून कोण गेली
कमनीय बांध्यात मन, गुंतवून कोण गेली ? = धृ =
पाहणे तिचे नाशिले, लाजणे हि रसिले
बोलक्या गूढ नजरेने, खुणवून कोण गेली ?
अप्सरीय सौंदर्यात मज, खुळवून कोण गेली ? = १ =
मदभरे ते स्मितहास्य, आव्हान जसे प्रीतीचे
मनमोहक खोल खळीत, बुडवून कोण गेली ?
अप्सरीय सौंदर्यात मज, खुळवून कोण गेली = २ =
वाटून दिवास्वप्न मनीचे, विसरलो मी तेव्हाच
वळून मागे पाहण्यात, नादावून कोण गेली ?
अप्सरीय सौंदर्यात मज, खुळवून कोण गेली = ३ =
--- संजय कुलकर्णी .
No comments:
Post a Comment