Popular Posts

Thursday, December 15, 2011


समाधी ...!



वेगळ्याच इशार्यांनी डोळ्यांनी खुणवताना

हसले गालातून खळ्यात गुंतवताना

लाजले विनाकारण मिठीत जाताना

हर्षले अंतरातून ओठांस जुळताना ..!!




शिरले कुशीत रोमांचित होताना

अबोल शब्दांनी स्पर्षांनी बोलताना

अधीर मनाने बंद-कवाड खुलताना

आरक्त तनांनी उन्मत्त झोंबताना ..!!




रती तालावर मदन डोलताना

वेणू सुरावर एकत्र झुलताना

कापूर कायांनी शांतवून विरताना

लागली समाधी कोंबडा आरवताना ...!!



--- संजय कुलकर्णी .

No comments:

Post a Comment