
प्रेमास साकारणे ...!!
छंद आहे मला
प्रेमात तुझ्या पागल होण्याचा ,
सवय आहे तुला
नाकारून मला नादी लावण्याचा !
ना भेटणे लिहिणे
क़ा तरी असे शोधणे ,
पाहिल्यावर एकमेकांसी मात्र
क़ा बरे अनोळखी वागणे !
खट्याळ खोचक नजरेने
मुद्दामून तिरकस तुझे बोलणे ,
गप्प राहिल्यावर ऐकवणे
सहजच चीडविणारे तुझे टोमणे !
नाही म्हणायला समोर आल्यावर
हासून दिलखेचक पाहणे ,
दु:ख्ख मनातले ना सांगणारे
रोखून मनवेधक बहाणे !
रागावल्यावर नेहमीची तुझी
लाडीगोडी अन साखर पेरणी ,
दुराव्यात रुजली माझी
अबोल प्रीतीची अमर कहाणी !
तुला ना कळले मला ना वळले
जगाने मात्र सारे जाणले ,
नाही नाही म्हणत नकळत माझ्यात तू
पाहिले तुझ्या प्रेमास साकारणे ...!!
--- संजय कुलकर्णी .
No comments:
Post a Comment