
जो-तो उठतो ,
मला नावे ठेवतो ...!
यशास पाहून ,
सतत बोटे मोडतो ... !
असे असावे ,
तसे व्हावे म्हणतो ...!
नाजुक, भावूक ,
का असावे वदतो ...!
ज्वलंत, आक्रमक ,
का नसावे सांगतो ...!
अन्यायास तोंड ,
कधीतरी फोडावे बोलतो ...!
मान्य करून ,
एकदा ऐकले सर्वांचे ...!
त्वेषाने उठून ,
अंजन घातले सत्याचे ...!
नुसते स्तवले ,
क्षणिक टाळ्या वाजवून ...!
विसरून कवना ,
पुन्हा मुर्दाड मनागत ...!
फरक काही न
ना त्यांच्या वागण्यावर ...!
चार प्रेमाचे
गुणगान मी करता ...!
वर्णन प्रेमिकेच्या
सुंदर तनमनाचे करता ...!
व्यस्त कामातून
प्रत्येकजण पुन्हा-पुन्हा पाहतो ...!
आंतरिक उत्सुकतेने
मजला नीट न्याहाळतो ...!
अलगद चेहऱ्यावर
मधुर सुहास्य पसरवतो ...!
नकळत उत्स्फूर्ततेने
वा, सुंदर ! म्हणतो ...!
प्रसन्न होऊनी
उज्वल स्वप्ने पाहतो ...!
मान्य मला
स्वप्ने काय कामाची ...!
सत्यात आणण्या
त्यास गरज कष्टाची ...!
एक विसरती
मात्र सर्व जण ...!!
स्वप्ने जागवती
आस सुंदर भविष्याची ...!
व्यथित कष्टीत
जनास आनंदाने जगण्याची ...!
अशाच स्वप्नातून
उज्वल भारत घडवण्याची ... !!
---संजय कुलकर्णी.
No comments:
Post a Comment