Popular Posts

Sunday, May 5, 2013

एकाकीपण.. 

जगते आहे मी, का ? काय मिळविण्यासाठी 
कुठे जाते मी, कशाला ? काय शोधण्यासाठी ?


दु:ख्खानो, करू नका घाई, मला भेटण्यासाठी
सुखेच मला पुरेशी, हासून हसविता रडण्यासाठी !


नको मला कुणाची सहानुभूती, क्षणभर रिझविण्यासाठी
माझे एकाकीपण आहे पुरेसे, आयुष्यभर रमविण्यासाठी !


त्याने सख्य देवू केले, मला स्वप्नी झुलवण्यासाठी
त्यास हृदयही मी दिले, खेळणे समजून तोडण्यासाठी !


मम भावविश्वास खुलवीत होते, सर्वांस सुखविण्यासाठी
त्याने मस्करी केली भावनांशी, सर्वांसमोर दुखविण्यासाठी !


तू घडलेले नाकारून, मला विसरूनही जाशील
अनुभव नसे थोडका, मला जीवनभर आठवण्यासाठी !


इथे ढोंगीपणा पुढे जोतो पायघड्या घाली
सच्चाईने वागणारा मात्र धडपडतो, अस्तित्व टिकविण्यासाठी !!

--- संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment