तुझ्याशिवाय मी जगायचे
म्हणजे सदोदित झुरायचे ,
वर्तमानात शरीराने अन
मनाने भूतकाळात रमायचे !
तुझ्याशिवाय जग पहायचे
म्हणजे तुलाच शोधायचे ,
हास्य चेहर्यावर फुलवायचे
बघणार्यांस सदैव फसवायचे !
तुझ्याशिवाय मी जेवायचे
म्हणजे सोपस्कार करायचे ,
आठवणींनी तुझ्या ठ्सकायचे
अन पाण्याने पोट भरायचे !
तुझ्याशिवाय मी निजायचे
म्हणजे बिछान्यावरी तळमळायचे ,
क्षण स्मरीत सहवासाचे
आसवांनी उशास भिजवायचे ...!!
---संजय कुलकर्णी .
khupach sunder..
ReplyDeleteमनापासून धन्यवाद शुभांगी जी !!
ReplyDeleteअशाच माझ्या कविता वाचून तुमच्या बहुमोल
प्रतिक्रिया देत रहा हि विनंती .
-- संजय कुलकर्णी