Popular Posts

Tuesday, August 23, 2011

मनतरंग ...!



मन तरंग , मन तरंग,

कधी न थांबती हे स्वच्छंद !

उठती सागरावरी जसे तरंग ,

गवसू जाता क्षणात गुंग !!


मन तरंग, मन तरंग ...



पाहता हिरवा निसर्ग कुंद ,

मन धावे होऊनी भुंग !

कळी कळी घेओनी चुंब ,

मन विसरी पाश बंध !


मन तरंग, मन तरंग ....



स्वार्थास्तव मोडिती नाती-बंध ,

पाहोनी माणसातील राक्षसी द्वंद !

दिसे नित्य फसवे नाट्य-रंग,

असे कसे हे लागे-बन्ध ?


मन तरंग, मन तरंग ....



गाई मन होउनी धुंद ,

विलापे भोगुनी दु:खी प्रसंग ,

उचंबळे पाहोनी निरागस बाल्यरंग

अनेक अदभूत मानवी रंगढंग !!


मन तरंग, मन तरंग ...



स्मरता तुज बाल मुकुंद ,

जाई गुंगुनी विसरोनी सर्व संग !

कुठूनसे कानी पडती वेणूनाद मंद ,

डोले तनमन गुणगुणत कृष्ण गोविंद !!


मन तरंग, मन तरंग ...




--संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment