काही नाही मनात तर ..
मागे वळून पाहतेस कशी ?
मला पाहून गालावरील तुझी
सुंदर खळी खुलतेच कशी ?
काही नाही मनात तर ..
रुमाल मागे टाकतेस कशी ?
त्याच वेळी,त्याच ठिकाणी
दुसर्या दिवशी तू येतेस कशी ?
काही नाही मनात तर ..
हाक मारावी म्हणून थांबलीस कशी ?
ओळख वाढावी म्हणून मग
रुमाल देताना नाव पुसतेस कशी ?
काही नाही मनात तर ..
माझ्यासवे नाक्यावरील 'कटिंग' प्यायलीस कशी ?
' पुन्हा कधी भेटणार ? ' जाताना पुन्हा
'शेक-हेन्ड' करत विचारतेस कशी ?
काही नाही मनात तर ..
'मोबाईल नंबर' ची देवाण-घेवाण केलीस कशी ?
तिन्ही त्रिकाळ मेसजेस अन
फोनवर तासनतास बोललीस कशी ?
काही नाही मनात तर ..
दूरवर फिरायला आलीस कशी ?
कुणी विचारल्यावर 'माझा बेस्ट फ्रेंड'
खोटे असे बोललीस कशी ?
काही नाही मनात तर ..
नजरेचे इशारे करतेस कशी ?
जवळ येवून माझ्या पुन्हा
नको तेव्हा लाजतेस कशी ?
काही नाही मनात तर
घट्ट हात धरून ठेवतेस कशी ?
तहान लावून 'इश्श्य' म्हणत
मान दुसरीकडे फिरवतेस कशी ?
काही नाही मनात तर ..
भेटलो नाहीतर चिडतेस कशी ?
भेटल्यावर मी दुसर्या दिवशी
अबोला रागावून धरतेस कशी ?
काही नाही मनात तर ..
' सॉरी' म्हंटल्यावर मिठीत शिरतेस कशी ?
'जन्मभर अशीच साथ दे ' म्हणत
डोळ्यात आसवे आणतेस कशी ...?
---संजय कुलकर्णी .
No comments:
Post a Comment