प्रदर्शन प्रेमाचे तू करू नकोस ...!
मनस्वी अपुल्या प्रेमाची वाच्यता
सगळीकडे तू करू नकोस !
उत्कट सुंदर प्रेम अपुले
उफाळून ओठांवरी आणू नकोस !!
शब्दातूनच कळते का रे
मज प्रेम तुझ्या मनातले ?
नयनातून मला जे जाणवले
प्रेमळा, जगजाहीर करू नकोस !!
हळुवार स्पर्शाच्या धुंद समाधीतून
अचानक असे जागवू नकोस !
सात्विक निर्मळ तुझ्या सहवासातून ,
वासनिक भडकता आणू नकोस !!
शुद्ध आनंदी प्रेमास अपुल्या,
वाचाळूनी दृष्ट लावून घेवू नकोस !
मधुर मधाळ अपुल्या मनोमिलनाचे
उगाच प्रदर्शन करू नकोस... !!!
--- संजय कुलकर्णी.
No comments:
Post a Comment