दिवास्वप्न... !!!
चालत असता माझ्या वाटेने ,
अचानक ती समोरून आली !
मान वळवून हंसून मजला,
विचारात तिच्या गुंतवून गेली !
का पाहिले? का बरे हंसली ?
काय असे मनात तिच्या ?
अनेक प्रश्न टाकून मजला ,
निमुटपणे ती निघून गेली !
शांत मनी मी जगत असतां,
घोर मनाला लावून गेली !
अमावस्ये परी जीवनात माझ्या
पौर्णिमेचा चंद्र उगवून गेली !
पुन्हा पुन्हा मनी आठवत तिजला
प्रेम कहाणी माझी सुरु झाली !
मिटल्या नयनी आलिंगुनी मज ती
हळूच चुंबूनी दिवास्वप्न दाखवून गेली !!
---संजय कुलकर्णी .
No comments:
Post a Comment