Popular Posts

Wednesday, February 23, 2011

कृष्ण... मम प्रियसखा !



हे लाडक्या कृष्णसख्या,

गोप गोपिकांच्या सुहृदया !

देवकी नंदाच्या परमानंदा

राधेरमणा 'वसुदेव-यशोदा' नंदना !


कितीही युगे जरी लोटली,

हे कन्हैया तुजला अवतारुनी !

जन्म झाले किती माझेही,

साथ मानतो तुझी जन्म-जन्मांतरीची !


येवोत दिन कसेही ह्या जीवनी,

साथ तुझीच रे मला अंतरी !

पूजा, कर्म-कांड मी ना करी ,

केवळ प्रेम करतो मी तुजवरी !


परी पेंद्या-सुदाम्याची जशी,

"सख्य-भक्ती" माझी तशी !

देवू नको मला तू काहीही,

अंतरु नकोस मज कधीहि... !!!

---संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment