Popular Posts

Sunday, March 27, 2011

मैत्री ... " सहजीवनाचं " घरटं ...!


मैत्री तशी सर्वांशी

नेहमी करतो आपण,

तयांतील एखादीच व्यक्ती

जाणते आपले मन !

लपंडाव खेळणार्या श्रावणातल्या

सरींप्रमाणे अकस्मात भेटून,

मुक्तपणे तयाच्या प्रेमात

भिजवून आनंदवते तनमन !


मैत्री म्हणजे न्हवे

एकमेकांना सतत भेटणं,

मैत्री म्हणजे न्हवे

तिन्ही-त्रिकाळ "हाय हेलो" करणं !

मैत्री म्हणजे भावना

एकमेकांच्या स्वत:हून जाणणं,

मैत्री म्हणजे सुख-दु:ख

एकमेकांची स्वत:हून वाटणं !


जाणतो खरे स्वत:ला

मैत्री मुळे आपण,

अन मुक्त करतो

कोषातलं बंदिस्त मन !

मैत्रीतून जन्मते कधी

निखळ प्रेमाचं रोपटं,

जीवनात फुलविते दोघांच्याही

नकळतपणे " सहजीवनाचं " घरटं ...!!

--- संजय कुलकर्णी.

2 comments:

  1. धन्यवाद माधुरी !
    अशीच माझ्या ह्या ब्लॉग ला अशीच वारंवार भेट देत जा आणि
    माझ्या कविता वाचून तुझे अभिप्राय अवश्य दे कारण
    त्यामुळे मला अधिक चांगल्या कविता
    लिहिण्याची स्फूर्ती मिळते !
    माझ्या "फोलोअर" मध्ये सामील होशील का प्लीज ?
    पुन्हा एकदा मनापासून आभार तुझे !

    ReplyDelete