Popular Posts

Sunday, March 27, 2011

आनंदकंद मम काव्याचा ... तू !


आनंदकंद मम काव्याचा ... तू !

मनमोहना कृष्णसख्या मनरंजना ... तू

जिवलगा मम आत्मानंदा ... तू

नयनाच्या निरंजना परमानंदा ... तू

सुखनिधान मम जीवनानंदा ... तू !


मम हृदयीच्या अंतरात ... तू

अफाट विस्तीर्ण अंतराळात ... तू

चंचल मनाच्या गाभार्यात ... तू

विराट विश्वाच्या पसाऱ्यात ... तू !


मात-पिता सर्व बांधवात ... तू

मम आप्त स्वकीयात ... तू

प्रेमळ मित्र गणात ... तू

मम प्रिय सख्यात ... तू !


कार्य प्रेषिता मजला ... तू

'कर्ता-करविता' मम कार्याचा ... तू

शिकविणारा गुरु मजला ... तू

यशवंता मम भाग्याचा ... तू !


मम काव्यातील भावनात ... तू

उत्स्फूर्त निर्मळ प्रेमरसात ... तू

प्रेमसुगंध तयांतून फुलविणारा ... तू

आनंदकंद मम काव्याचा ... तू !!!


---संजय कुलकर्णी

No comments:

Post a Comment