अशी एक सखी असावी,
पाहता क्षणी मनात भरावी
मनात भरुनी आनंदित करावी
जिवलग सखी ती एकमेव असावी
जीवनाची ती एकमेव दिशा व्हावी !
मन तिच्याच भोवती...
सतत फिरत रहाणारी ...
सर्व तिला सांगितल्याशिवाय...
मन माझे हलके न होणारी !
मनकवडी अशी एक सखी असावी !
चुकल्यास मी,
मम कान धरणारी ...
स्वत:च्या चुका
परी कबूल करणारी...
प्रेमाने समजावणारी,
खुलवून मजला चीडविणारी
हास्याची कारंजी
चेहर्यावर माझ्या फुलविणारी !
जिवलग अशी सखी ती असावी !!
भेटलो ना तर,
आतुरतेने वाट पहाणारी ...
भेटल्या वर मज,
मज बोलू न देणारी ...
कितीही बोलली तरी,
कधी न गप्प बसणारी ...
निरोप घेता डोळे पाणावून,
"पुन्हा कधी भेटशील?"
ते वारं वार मज विचारणारी .... !
जिवलग अशी प्रियसखी ती असावी ...!
--- संजय कुलकर्णी.

No comments:
Post a Comment