Popular Posts

Sunday, March 27, 2011

निघून गेलो मी, तर काय करशील ?


सांग उठसुठ का मजसी भांडशी ?

हट्टीपणा तू किती ग करशी ?

सहन न होवून तुझे असे वागणे

निघून गेलो मी तर काय करशील ?


दिनरात तू कुणास ग स्मरशील ?

पाहून आरशात कसे ग लाजशील ?

वाट सारखी कुणाची मग बघशील ?

लाडात येवून कुणाशी ग बोलशील ?


एकाकीपण सारखे तुज खायला उठेल,

कातरवेळी आभाळ जसे भरून येईल !

वीज पावसाळ्यात गडगडासह जशी चमकेल

घाबरून तेव्हा सांग कुणास बिलगशील ?



चांदण्यारात्री पौर्णिमेच्या हासर्या चंद्रास पाहुनि

मधुर आठवांत कुणाच्या ग जाशील ?

स्मरून अपुल्या त्या धुंद भेटींना

आसवे एकटीच तेव्हा ढाळत बसशील !


उणीव मम प्रेमाची तुज सतत भासेल

बोल हे माझे तेव्हा तुजला पटतील

गीत नकळत माझे तू जसे गाशील

'प्रेम शब्दातून जाणवून माझे, भेटण्यास व्याकूळ होशील ...!!

---संजय कुलकर्णी.

2 comments:

  1. asach asata na prem! hurhur lavnara!ani najresamor naslyavar vyakul karnara!

    ReplyDelete
  2. अगदी खरं आहे तुझे म्हणणे माधुरी !
    पण तरीसुद्धा प्रेयसी असा हट्टीपणा व
    अहंकारी पणा का करतात ?
    त्यामुळे प्रियकराला सुद्धा वाईट वाटते
    ह्याची त्यांना अजिबात खंत वाटत नाही का ?
    असो !
    माधुरी, अशीच माझ्या ह्या ब्लॉग ला अशीच वारंवार भेट देत जा आणि
    माझ्या कविता वाचून तुझे अभिप्राय अवश्य देत रहा हि विनंती !
    मनापासून धन्यवाद !!!

    ReplyDelete