Popular Posts

Thursday, June 2, 2011

एक प्रवास प्रेमळ नात्यांचा ...!




एक प्रवास प्रेमळ नात्यांचा ,

तुझ्या माझ्या सुंदर सख्याचा !

जसा प्रचंड उकाड्यानंतर येणाऱ्या ,

तनमन सुखावणार्या पावसाच्या सरींचा !


पावसाची सर मंद पडून जावी ,

मातीचा सुवास धुंद दरवळून जावी !

पाउस संपल्यावर पुन्हा गरमी वाढावी ,

जशी सहवासाची पुन्हा गरज भासावी ...!


एक प्रवास अकस्मात घडणार्या भेटीचा ,

कौलांवर टपटप पडणार्या गारांच्या नादांचा !

नजरेने भडाभड एकमेकांस मनातील सांगणारा ,

न बोलता स्पर्शता; संपू नये वाटणारा ...!


एक प्रवास सुप्त प्रेमळ भावनांचा ,

सहवासातून मनात अलगद प्रेम फुलविण्याचा !

बोलण्यातून एकमेकांचा नकळत स्वभाव जाणण्याचा ,

भावला तर संसार अन्यथा मैत्री करण्याचा ...!!


---संजय कुलकर्णी.

No comments:

Post a Comment